पाकिस्तान भारताचा शेजारी देश आणि शत्रूही…भारताला सतत त्रस्त करणा-या या देशाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. अगदी परदेशातही पाकिस्तानची पत पार रयाला गेली आहे. अशात पाकिस्तानला वॉशिंग्टनमधील दूतावास विकण्याची वेळ आली आहे(Embassy of Pakistan) आणि हे दुतावास घेण्यासाठी पाकिस्तानचे दोन शत्रू देश पुढे आले आहेत. त्यापैकी एक भारत असून दुसरा इस्त्रायल आहे. विशेष म्हणजे इस्त्रायल कडून पाकिस्तानी दुतावासासाठी (Embassy of Pakistan) अधिकची बोली लावण्यात आली आहे. हा व्यवहार यशस्वी झाला तर इस्त्रायल या पाकिस्तानी दुतावासाच्या इमारतीमध्ये ज्युं धर्मियांचे प्रार्थनास्थळ करण्याच्या प्रयत्नात आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टनस्थित पाकिस्तानच्या दूतावासाचा (Embassy of Pakistan) मोठा भाग विकला जाणार आहे. त्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. या पाकिस्तानी दूतावासाच्या संरक्षण विभागाच्या खरेदीसाठी मिळालेल्या दोन सर्वात मोठ्या बोली भारत आणि इस्त्रायल या दोन्ही पाकिस्तानच्या शत्रू मानल्या जाणा-या देशांच्या आहेत. इस्रायलच्या ज्यू समूहाने या दुतावासासाठी 6.8 दशलक्ष डॉलर्सची बोली लावली आहे. दुसरा सर्वाधिक बोली लावणारा भारतीय आहे. भारतीय रिअल इस्टेट एजंटने US$5 दशलक्ष (रु. 41.38 कोटी) ची दुसरी बोली लावली आहे. तर पाकिस्तानी व्यापारीही हा आपल्या देशाचा दुतावास खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र त्याची बोली तिस-या क्रमांकावर आली आहे. पाकिस्तानी रिअल इस्टेट एजंटने US$4 दशलक्ष (रु. 33.18 कोटी) ची तिसरी बोली लावली आहे. पाकिस्तानी दूतावासाची वॉशिग्टनमधील ही इमारत विकल्याची माहितीही पुढे येत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने याबाबत माहिती दिली आहे. दुतावासातील अधिका-यांच्या मते या बोलीमध्ये सर्वाधिक बोली इस्त्रायलतर्फे लावण्यात आली आहे आणि भारतामधील व्यापारी दुस-या क्रमांकावर आहे. लिलावात जो जास्त किंमतीची बोली लावतो, त्याच्या ताब्यात ती वास्तू दिली जाते. पण त्या वास्तूचा कसा वापर होणार यावरही विक्री अवलंबून असते. त्यामुळेच इस्त्रायलच्या ताब्यात दुतावास (Embassy of Pakistan) देण्याबाबत पाकिस्तानी अधिका-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इस्त्रायल या दुतावासाला धार्मिक स्थळांच्या रुपात वापरणार आहे. याचा पाकिस्तानमध्ये कसा परिणाम होईल याची चाचपणी करण्यात येत असल्याचे दुतावासातील अधिका-यांनी सांगितले.
पाकिस्तानचे हे वॉशिंग्टनमधील दुतावास पाकिस्तानच्या अधिका-यांचे आणि राजकारण्यांचे हक्काचे निवासस्थान आहे. गेल्या आठवड्यात बिलावल भुट्टो वॉशिंग्टनच्या या दूतावासात उपस्थित होते. तेव्हापासूनच ही लिलावाची प्रक्रीया सुरु झाली आहे. जर ज्यू समूहाने हा दूतावास विकत घेतला तर ते येथे ज्यूंचे प्रार्थनास्थळ म्हणजेच सिनेगॉग होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी दूतावासाचा जो विभाग विकला जात आहे तो सुमारे 20 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे. हे संरक्षण विभाग म्हणजेच पाकिस्तानी लष्कराचे कार्यालय म्हणून वापरले जात होते. या दुतावासाबरोबरच पाकिस्तान सरकारची आणखी एक मालमत्ता, रुझवेल्ट हाऊस विकण्याचीही तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या अधिका-यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार ही इमारत जुनी असून त्याच्या दुरुस्तीसाठी जास्त खर्च होत आहे. तो करण्यापेक्षा इमारत विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी दुतावास (Embassy of Pakistan) इस्त्रायलच्या ताब्यात जाण्याची बातमी जेव्हा आली, तेव्हा या दोन देशांमधील अंतरही अनेकांनी जाणण्याचा प्रयत्न केला. इस्रायल हा एक देश म्हणून 1948 मध्ये अस्तित्वात आला. तर पाकिस्तानची स्थापना त्याच्या वर्षभरापूर्वी म्हणजेच 1947 मध्ये झाली. असे असले तरी पाकिस्तानने अद्याप इस्रायलला मान्यता दिलेली नाही. इस्रायलने पॅलेस्टाईन आणि मुस्लिमांवर अनेक अत्याचार केले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आता याच इस्त्रायलच्या ताब्यात वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दुतावास जाणार आहे. त्यामुळेच याबाबत पाकिस्तानच्या जनतेच्या काय प्रतिक्रीया असतील हे जाणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.(Embassy of Pakistan)
======
हे देखील वाचा : कश्मीरी पंडित इकबाल यांनी मुस्लिमांसाठी नव्या राष्ट्राची का मागणी केली होती?
======
पाकिस्तानकडे सध्या परकीय चलन साठा किंवा परकीय चलन साठा आहे फक्त $6.7 अब्ज आहे. यापैकी 2.5 अब्ज डॉलर सौदी अरेबियाकडून, 1.5 अब्ज डॉलर यूएई आणि 2अब्ज डॉलर चीनचे आहेत. हे निधी सुरक्षा ठेवी आहेत, याचा अर्थ शाहबाज शरीफ सरकार ते खर्च करू शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तानवर अशा दिवाळखोरीची वेळ आली आहे. आणि परदेशातील महत्त्वाची अशी मालमत्ता विकण्याची वेळ या देशावर आली आहे. परदेशात पाकिस्तानची मालमत्ता विकण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानच्या या दिवाळखोरीची त्यांचे मित्र म्हणवणा-या तालिबाननंही खिल्ली उडवली आहे. अलीकडेच तालिबान कमांडर जनरल मोबीन खानने पाकिस्तानची खिल्ली उडवत पाकिस्तान कोणाला हवा आहे, आम्हाला नको. कारण तसे झाल्यास पाकिस्तानचे कर्ज आम्हाला फेडावे लागेल. असे म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या दिवाळखोरीवरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
सई बने