कपड्यांमध्ये सर्वाधिक वापर आपण जीन्सचा करतो. जीन्स या अन्य कपड्यांच्या तुलनेत थोड्या महाग असतात आणि त्याची स्पेशल केअर सुद्धा करण्याची गरज असते. तर तुम्ही जीन्स दररोज धुत असाल तर त्याचा रंग वेगाने उडू शकतो. दोन किंवा तिसऱ्या धुलाईतच ती नवी कोरी जीन्स जुनी दिसेल. अशातच तुम्हाला नवी जीन्स दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल तर पुढील काही टीप्स जरुर तुमच्या कामी येऊ शकतात. (Jeans washing tips)
जीन्स अशी करा स्वच्छ
-जर तुमची जीन्स अस्वच्छ झाली नसेल तर ती कमीत कमी धुण्याचा प्रयत्न करा. दररोज जीन्स धुवू नका. मात्र जर ती अधिक अस्वच्छ झाली असेल तर एका बादलीत थंड पाणी घेऊन त्यात लिक्विड डिटेर्जेंटचा वापर करा. आता तुम्ही त्यात तुमची जीन्स भिजण्यासाठी थोडावेळ ठेवा आणि नंतर धुवू शकता.
-जीन्स कधीच पिळण्याची किंवा जोरजोरात घासण्याची गरज नसते. तुम्ही ती स्वच्छ पाण्यातून काढू शकता. यासाठी एका बादलीत तुम्ही स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात कमीत कमी एक कप व्हाइट विनेगर टाका. त्यात आता तुमची जीन्स भिजवा आणि नंतर थोड्यावेळाने ती स्वच्छ धुवा.
-जीन्स मधून अतिरिक्त पाणी जरुर काढा. ती घट्ट पिळण्याऐवजी वॉशरुममधील एखाद्या नळाव ठेवा जेणेकरुन त्यामधील पाणी हळूहळू निघेल. आता ती हँगरला टांगा आणि हवेशीर ठिकाणी सुकण्यासाठी ठेवा. यामुळे तुमचा रंग सुद्धा लगेच निघणार नाही.
-खरंतर व्हाइट विनेगर हे रंग पक्का करण्याचे काम करते. ते नॅच्युरल सॉफ्टनर प्रमाणे सुद्धा काम करेल. अशा प्रकारे जीन्स धुताना त्याचा वापर केल्यास तुमची जीन्स दीर्घकाळ नवी कोरी दिसेल.
वॉशिंग मशीन मध्ये अशी धुवा
-जीन्स उलटी करून त्याची झीप लावा
-अशा डिटर्जेंटचा वापर करा जे गडद रंगासाठी तयार केले आहेत. यामुळे जीन्सचा रंग फिका होणार नाही. व्हाइट डिस्टिल्ड विनेगरचा तुम्ही वापर करू शकता
-दोन पेक्षा अधिक जीन्स एकाचवेळी मशीनमध्ये धुण्यास टाकू नका (Jeans washing tips)
-जीन्स मशीनच्या ड्रायरमध्ये सुकवण्याऐवजी खुल्या हवेशीर ठिकाणी सुकवा. जेणेकरुन त्याचे फॅब्रिक खराब होणार नाही
हेही वाचा- पावसाळ्यात घाला असे कपडे
जीन्स धुताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
-जीन्स अधिक वेळा धुण्यापासून दूर रहा
-जीन्स नेहमीच उलट्या बाजूने धुवा
-जीन्स धुतल्यानंतर लगेच ती उन्हात सुकवण्यासाठी टाकू नका
-जर तुम्हाला त्याला इस्री करायची असेल तर त्यात न्यूजपेपर टाकून इस्री करा