एखाद्या व्यक्तीचा द्वेष इतका करावा की, त्याला थेट मानसिक त्रास होतोय हे सुद्धा पहायचे नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘युनिट ७३१’. या युनिटमध्ये व्यक्तींवर असे जीवघेणे प्रयोग केले जायचे की, त्याबद्दल आपण कधीच विचार करु शकत नाही. खरंतर ही एक लॅब होती त्याबद्दल जाणून घेण्यासाठी सुद्धा लोकांचा थरकाप उडतो. युनिट ७३१ चा दुसऱ्या महायुद्धाशी संबंध आहे. ही जगातील अतिशय भयंकर प्रयोगशाळेपैकी एक होती. (Japan Unit 731)
जापानच्या सैन्याकडून केले जायचे संचालन
युनिट ७३१ ला जापानी सैन्याने तयार केले होते. या लॅबमध्ये जीवंत व्यक्तींवर खुप भयंकर प्रयोग केले जायचे. खरंतर ही लॅब चीनच्या पिंगफांग जिल्ह्यात होती. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर याचे संचालन जापानच्या सैन्याकडून केले जाऊ लागले. असे ही सांगितले जाते की, जापानी सैन्याने जैविक हत्यारे बनवण्यासाठी युनिट ७३१ ची लॅब तयार केली होती. आज सुद्धा या लॅबच्या कथा लोकांच्या मनात भीती निर्माण करतात.
३००० हून अधिकांचा मृत्यू
जापानी सैन्याच्या युनिट ७३१ मध्ये शत्रूंना ठेवायचे. त्यांच्यावर विविध प्रयोग ते करायचे. येथे जीवंत व्यक्तीच्या शरिरात अत्यंत भयंकर वायरस आणि केमिकल्स टाकायचे. येथे चीन, अमेरिका आणि ब्रिटन सारख्या देशांतून पकडलेल्या लोकांवर जनावरांसारखे प्रयोग केले जायचे. प्रयोगादरम्यान काही लोकांचा तडफडून मृत्यू व्हायचा.याच दरम्यान, जे जीवंत रहायचे त्यांना सुद्धा ठार केले जायचे. पण तो जीवंत कसा राहिला हे पाहण्यासाठी सुद्धा त्यांची चिरफाड केली जायची. असे सांगितले जाते की, येथे प्रयोग केल्याने ३ हजारांहून अधिक लोकांना मृत्यूच्या दारात ढकलले गेले.
थंडीची चाचणी
युनिट ७३१ मध्ये फ्रॉस्टबाइट टेस्टिंग नावाच्या एका प्रयोगात व्यक्तीच्या हातापायांवर पाणी टाकले जायचे. पाणी टाकल्यानंतर जमा झालेल्या हातापायांना गरम पाण्यात वितळवले जायचे. याच्या माध्यमातून असे शोधून काढले जायचे की, विविध तापमानात व्यक्तीच्या शरिरावक कसा प्रभाव पडतो. युनिटच्या लोकांना असे जाणून घ्यायचे होते की, अखेर व्यक्ती किती थंडावा सहन करु शकतो. एक्सपेरिमेंटच्या दरम्यान लोकांना कपड्यांशिवाय बर्फाच्या डोंगरावर उभे केले जायचे. येथील तापमान मायनस ३० ते ४० डिग्री सेल्सियस दरम्यान असायचे.
वायरस आणि गन फायर टेस्ट
युनिट ७३१ मध्ये व्यक्तीच्या शरिरात धोकादायक व्हायरस टाकला जायचा. त्यानंतर त्याचा परिणाम झालेल्या शरिराचा भाग कापून टाकाचे जेणेकरुन तो आजाराचे संक्रमण होते की नाही ते पाहिले जायचे. या खतरनाक प्रयोगात काही लोकांचा मृत्यू व्हायचा. मात्र जे जीवंत राहायचे त्यांच्यावर गन फायर टेस्ट केली जायची. याच्या माध्यमातून बंदूकीतून निघालेली गोळी व्यक्तीच्या शरिराला किती नुकसान पोहचवते हे पाहिले जायचे. (Japan Unit 731)
प्रेशर चेंबर प्रयोग
युनिट ७३१ मध्ये सर्वाधिक धोकादायक प्रयोगांपैकी एक म्हणजे प्रेशर चेंबर एक्सपेरिमेंट. या मध्ये कैद्याला कंटेनरच्या आतमध्ये टाकले जायचे.त्यानंतर त्या कंटेनरमध्ये हवेचा दाब ऐवढा वाढवला जायचा की, त्याचे शरिर फाटून बाहेर यायचे. ऐवढेच नव्हे तर येथे सेक्शुअल इंफेस्टेशन एक्सपेरिमेंट ही केला जायचा.
हे देखील वाचा- अमेरिकेतील पहिल्या ट्रांसजेंडर महिलेला दिली जाणार मृत्यूदंडाची शिक्षा, नक्की काय आहे प्रकरण
युनिट ७३१ व्यतिरिक्त आणखी लॅब
चीनच्या पिंगफांग मध्ये असलेल्या युनिट ७३१ अशा प्रकारचे धोकादायक प्रयोग करण्यामध्ये एकमेव लॅब नव्हती. तर चीनमध्ये आणखी काही लॅब होत्या ज्यामध्ये लिंकोउ, मुडनजियांग, सुनवु आणि हॅलर (ब्रांच ५३३) चा समावेश होता. दरम्यान, दुसऱ्या महायुद्धानंतर या प्रयोगशाळांमध्ये खतरनाक प्रयोग करणे थांबले. आता तर यापैकी काही ठिकाणी फिरण्यासाठी सुद्धा जातात.