बुरी डायकोन, शिओयाकी सकाना, कात्सुओ-नो-टाटाकी, सनमा-नो-नित्सुके, मिसो-झुके सॅल्मन, नानबान-झुक, अजी फुराई, शिरासू डोनबुरी, टेकचिरी, नामेरू, हिमोनो ही कसली नावं आहेत, हा प्रश्न पडला असेल तर ही नावं आहेत, जपानमधील खाद्य पदार्थांची. जपानमध्ये माशांचा वापर करुन हे पदार्थ बनवले जातात.
हे सर्वच पदार्थ जपानच्या सर्वच भागात प्रसिद्ध आहेत. विशेषतः यातील काही पदार्थ हे व्हेल माशाच्या मासांपासून तयार केले जातात. जगातील सर्वात मोठ्या माशांमध्ये या व्हेल माशाचा समावेश होतो. हा मासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानला जातो. जन्माच्या वेळीही, निळा व्हेल इतर प्राण्यांपेक्षा मोठा असतो. फक्त हा मासाच काय पण या ब्लू व्हेल माशाचे पिल्लूही सर्वात मोठे असते, त्याचे वजन ८८०० पौंड म्हणजेच चार हजार किलोच्या आसपास असते. (Japan Whale Fish)
या एवढ्या अवाढव्य व्हेल माशाच्या मासांचे पदार्थ जपानमध्ये एवढे खाल्ले जात आहेत की, समुद्रातील हा सर्वात मोठा मासाच नष्ट होईल की काय ? अशी भीती पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. जपानमध्ये या व्हेल माशाच्या मासांचे पदार्थ मोठ्याप्रमाणात विकले जातात. त्यासाठी जपान सरकारनं काही मशीनही लावल्या आहेत. यामुळे रस्तोरस्ती व्हेल माशाच्या मासांपासून बनवलेले पदार्थ मिळत आहेत. परिणामी समुद्रातील या मोठ्या माशाच्या अस्तित्वावर संकट आले आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या जीवावर जपानच्या खाद्यप्रेमी नागरिकांमुळे संकट आले आहे. फिन व्हेलच्या व्यावसायिक शिकारीमध्ये जपानचा प्रथम क्रमांक लागला आहे. यामुळे हे मोठे जीव अगदी हातावर मोजण्याइतके रहातील असा इशारा पर्यावरण संस्थांतर्फे देण्यात आला आहे. पर्यावरणालाच धोक्यात आणणा-या या शिकारीचा उल्लेख निसर्गाला संपवणारे भयंकर पाऊल असे करण्यात आले आहे. (Japan Whale Fish)
पण जपाननं या सर्वच सूचनांकडे दुर्लक्ष करीतच व्हेल माशांची शिकार करण्यात वाढ केली आहे. शिवाय व्हेल माशांचे खाद्यपदार्थ अधिक सुलभरित्या मिळावे यासाठी मशिन्सही तयार केल्या आहेत. या मशिन्समुळे व्हेल माशाला कापणे अधिक सुलभ झाले आहे. जपानने फिन व्हेलच्या शिकारीला मान्यताही दिली आहे. जपानी सरकारी अधिकाऱ्यांनी अलीकडेच घोषणा केली आहे की, फिन व्हेलची शिकार ही व्यावसायीक दृष्टीकोनातून करण्यासाठी अधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
यातून व्हेल माशांचा माग काढणे अधिक सोप्पे होणार आहे. या घोषणेचा पर्यावरणतज्ञांनी विरोध केला आहे. ब्राइड व्हेल, सेई व्हेल, मिंके व्हेल या व्हेल माशांच्या प्रजाती आहेत. सागरी संवर्धन संस्था Ocean Care च्या मते, जपानच्या या निर्णयानं सागरी जीवन चक्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यातही फिन व्हेलचे अस्तित्वच संपण्याच्या स्थिती आले आहे. (Japan Whale Fish)
१९८२ मध्ये, व्हेल माशासंदर्भात संशोधन करणा-या संस्थेने व्यावसायिक व्हेलिंगवर म्हणजेच, व्हेल माशांच्या शिकारीवर बंदी घातली. ८० पेक्षा जास्त देशांनी या करारावर स्वाक्षरी केली. नॉर्वे, डेन्मार्क, ग्रीनलँड, रशिया, आइसलँड आणि जपान यासारख्या अनेक देशांनी वैज्ञानिक संशोधनाच्या नावाखाली व्हेल माशांची शिकार करणे बंदीचे कायम उल्लंघन केले. जपानने तर २०१९ मध्ये या करारातून माघार घेतली. उत्तर-पॅसिफिक महासागरातील देशाच्या प्रादेशिक मर्यादी सागरीसीमेपर्यंत व्हेल माशाची शिकार सुरु केली. याच संघटनेनं जपाननं किती मोठ्या प्रमाणात व्हेल माशांची शिकार केली आहे, हे जाहीर केले आहे.
=============
हे देखील वाचा : वयाच्या पंन्नाशीतही हेल्दी आणि फिट रहायचेय? फॉलो करा या 5 सवयी
=============
जपानने २०२२ मध्ये २५ सेई व्हेल, १८७ ब्रायड व्हेल आणि ५८ मिंक व्हेलची शिकार केली. एवढी व्हेल माशांची शिकार करुनही जपानमधील व्हेल माशांच्या मासांची मागणी कमी झाली नाही. तर गेल्या वर्षी जपाननं आइसलँडमधून फिन-व्हेलचे मांस आयात केले आहे. जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री योशिमासा हयाशी यांनी व्हेल माशांचे मांस हे जपानी नागरिकांच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले आहे. (Japan Whale Fish)
त्यामुळे जपानमध्ये मोठ्या प्रमाणात व्हेल माशांची शिकार होत असून पकडलेल्या व्हेलचे मांस साठवण्यासाठी आधुनिक अशी कोल्ड स्टोअरजची मागणी वाढत आहे. जपानमधील काही मोठ्या शहरांमध्ये व्हेंडिंग मशीन्स देखील बसवल्या जाऊ लागल्या आहेत. येथे नागरिक व्हेल माशांच्या मासांपासून तयार केलेले पदार्थ खरेदी करतात. जपन सरकार या मशीनची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यातून जपानकडून होणारी व्हेल माशांची शिकार ही थांबण्याची शक्यता नाही. जगातील या सर्वात मोठ्या माश्याचे अस्तित्वच त्यामुळे नष्ट होण्याचा मार्गावर आहे.
सई बने