जापान हा अनोख्या देशांपैकी एक आहे. येथील संस्कृती आणि परंपरा ही अन्य देशांपेक्षा वेगळी आहे, येथील जापानी लोक त्यांची मेहनत आणि नियमांसाठी फार प्रसिद्ध आहेत. परंतु येथील सांस्कृतिक परंपरा या जगातील अन्य लोकांना हैराण करतात. काही जापानच्या परंपरा या फॅशन संदर्भात ही फार विचित्र आहेत. वेलेंटाइन वीक बद्दल जापानमध्ये काही अनोखी परंपरा आहे. यावेळी एक शर्टाचे दुसरे बटण मागण्याची परंपरा आहे. (Japan Strange Tradition)
प्रेमाची कबुली देण्याची पद्धत
खरंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरतात. परंतु जापान मध्ये प्रेमाची कबुली देण्यासाठी येथील सांस्कृतिक परंपरा आहे. जापानमध्ये शाळा किंवा कॉलेजमध्ये फेअरवेल होते तेव्हा त्या कॉलेज किंवा शाळेतील तरुणी सीनियर तरुणांकडून त्यांच्या शर्टाचे दुसरे बटण मागतात.
बटण देणे किंवा न देणे
ज्युनियर तरुणी केवळी सीनियर तरुणाच्या शर्टाचे दुसरे बटण मागणे फार पसंद करतात. या तरुणी केवळ प्रेमाची कबुली देण्यासाठी याचा वापर करत नाही. तरुण आपले बटण देत नाहीत याचा सुद्धा काही अर्थ आहे. जर तरुणाला त्या तरुणीला आपल्या शर्टाचे दुसरे बटण देऊ इच्छितो तर तो तिला पसंद करत असतो.
दुसरे बटणच का?
ही गोष्ट अनोखी वाटते की, जापान मध्ये अशा प्रकारची परंपरा आहे. दुसरे बटण मागण्यामागे काही कारण आहे. त्यानुसार हे बटण हृदयाच्या जवळ असते. तरुणी दुसरे बटण मागते याचा अर्थ असा होतो की, ती त्याच्याकडे त्याचे हृदय मागते. आजकाल ही परंपरा जापानमध्ये खुप प्रसिद्ध झाली आहे.(Japan Strange Tradition)
एकत्रित खुप वेळा मागणी केली जाते
जापानच्या शाळा कॉलेजमध्ये ही परंपरा खासकरुन ग्रॅज्युएशन डे किंवा फेअरवेलच्या दिवशी नव्हे तर वेलेंटाइन वीक मध्ये सुद्धा दिसते. काही वेळा असे होते की, आवडीच्या मुलाला एकाच वेळी खुप तरुणी त्याच्या शर्टाचे दुसरे बटण मागतात. परंतु त्याला जी आवडत असते तो तिला देऊ शकतो.
आता चॉकलेट देण्याचा अर्थ
या व्यतिरिक्त जापानमध्ये वेलेंटाइन डे दिवशी चॉकलेट देण्याची परंपरा आहे. येथील महिला आपल्या प्रियजनांना खासकरुन चॉकलेट भेट म्हणून देतात.ते मित्र, नातेवाईक, ऑफिस मधील सहकाऱ्यांना चॉकलेट देतात. मात्र जर चॉकलेट आपल्या हाताने तयार केले असेल तर त्याच्या प्रति विशेष प्रेम दिसते.
हे देखील वाचा- भारतातील पिणी गावात महिला कपडे घालत नाहीत, ‘या’ कारणास्तव सुरु झाली ही परंपरा
त्यानंतर व्हाइट डे
या व्यतिरिक्त जापान मध्ये वेलेंटाइन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी नंतर एका महिन्यानंतर व्हाइड डे साजरा केला जातो. या दिवशी पुरुष मंडळी महिलांना गिफ्ट देतात, ज्यांनी त्यांना वेलेंटाइन दिवशी चॉकलेट दिले होते. हे एक प्रकारचे रिटर्न गिफ्ट आहे. परंपरेनुसार हे गिफ्ट सफेद रंगाचे असावे. त्यामुळेच त्याचे नाव व्हाइट डे असे आहे. परंपरा अशी आहे की, पुरुषांना त्यांना मिळालेल्या गिफ्टपेक्षा तिप्पट अधिक महागडे रिटर्न गिफ्ट द्यावे लागते.