जगभरातील अनेक देशांमध्ये मुस्लिम स्थलांतरितांचा प्रश्न चिंताजनक होत आहे. फ्रान्स, जर्मनी, इंग्लड सारख्या देशात तेथील मुळ नागरिकांपेक्षा आता या स्थलांतरितांची लोकसंख्या वेगानं वाढू लागली आहे. लोकसंख्या वाढल्यावर त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीचा भार तेथील सरकारवर पडत आहे. यातूनच स्थानिक आणि स्थलांतरित असा संघर्ष होत आहे. ब-याच देशात स्थलांतरित मुस्लिम त्यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आक्रमक होत असल्याचेही चित्र आहे. मात्र अशा आक्रमक स्थलांतरितांना जपाननं रोखठोक उत्तर दिलं आहे. गेल्या काही वर्षात जपानमध्येही स्थलांतरित मुस्लिमांची लोकसंख्या वाढू लागली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या गरजाही आता वाढू लागल्या आहेत. त्यातील मुख्य गरज म्हणजे, दफनभूमी, अर्थात कब्रस्थान. मुस्लिम रितीनुसार मृतदेहाचे दफन करण्यात येते. हे दफनविधी कब्रस्थानमध्ये होतात, आणि त्यासाठी मोठ्या जमिनीचा भाग राखीव ठेवावा लागतो. (Japan)

जपानमध्येही आता अशाच मोठ्या कब्रस्थानाची मागणी मुस्लिम समुदायाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी तिथे आंदोलनही झाले. प्रकरण एवढे वादग्रस्त झाले की, त्याबाबत थेट संसदेत आवाज उठवण्यात आला. पण या सर्वात जपानी मंत्र्यांनी घेतलेली भूमिका ही जगभरातील देशांचे डोळे उघडणारी आहे. शिवाय स्थलांतरित मुस्लिम समुदयालाही यामुळे चपराक बसली आहे. जपानी मंत्र्यांपुढे जेव्हा मृतदेह दफन करण्यासाठी अतिरिक्त जागा मागण्यात आली तेव्हा त्यांनी खड्या स्वरात, जर मुस्लिमांना त्यांचे मृतदेह दफन करायचे असतील तर त्यांनी ते त्यांच्या देशात घेऊन जावे, जपानमध्ये रहायचे असेल तर जपानी पद्धतीनुसारच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतील, असे सांगतिले. जपानी मंत्र्यांच्या या उत्तरामुळे जपानमध्ये रहाणा-या मुस्लिम समुदायानं नाराजी व्यक्त केली असली तरी आमचा देश, आमचा नियम, हे जपानी मंत्र्यांनी स्पष्ट करत यापुढे अशा विषयावर आंदोलन केल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. (International News)
जपान हा देश जगभरात त्याच्या सांस्कृतिक मूल्यांसाठी ओळखले जातो. जपान हा जेवढा आधुनिक देश आहे, तेवढीच जपाननं आपली संस्कृती जपासली आहे. जगभरातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर देश म्हणून जपानचे नाव घेतले जाते. याच जपानमध्ये सध्या मुस्लिम दफनभूमीवरुन वाद सुरु झाला आहे. जपानमध्ये गेल्या काही वर्षापासून मुस्लिम स्थलांतरितांची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे येथील मुस्लिमांनी त्यांच्यासाठी एक स्वतंत्र दफनभूमी करण्याची मागणी केली होती. (Japan)
अनेक महिने ही मागणी मान्य न झाल्यानं मुस्लिम समाजानं निदर्शने सुरु केली. काही ठिकाणी याबाबत झालेली आंदोलने हिंसकही झाली. त्यामुळे मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न थेट संसदेपर्यंत पोहचला. यावेळी खासदार मिझुहो उमेमुरा यांच्यापुढे हा प्रश्न मांडण्यात आला. खासदार उमेमुरा यांनी संसदीय अधिवेशनात देशातील मुस्लिम दफनभूमीच्या विस्ताराची मागणी स्पष्टपणे नाकारली. हे सांगताना त्यांनी जपानी पद्धतीने मृतदेहावर कसे अंत्यसंस्कार होतात, हे स्पष्ट कले. जपानमधील ९९ टक्क्यांहून अधिक लोक आपल्या कुटुंबातील प्रियजनांचे निधन झाल्यावर त्यांच्या मृतदेहाचे पारंपारिकपणे दहन करतात. हिच जपानी संस्कृती असून मुस्लिम दफनभूमीची मागणी अस्वीकार्य आहे. जपानमध्ये अंत्यसंस्कार ही परंपरा आहे. (International News)

आमच्या देशातील मुस्लिमांना हा मार्ग योग्य वाटत नसेल तर त्यांनी त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह त्यांच्या मूळ देशात पाठवावेत, आणि तिथे त्यांचे दफन करावे, असे सांगितले. खासदार उमेमुरा एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी दफनविधीमुळे पाण्याची गुणवत्ता खराब होते. जपानसारख्या देशाला पाण्याचे स्त्रोत दूषित झालेले परवडणार नाही, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत दफनभूमीसाठी अतिरिक्त जागा देणार नाही, असे स्पष्ट केले. जपानी मंत्रीमंडळानं घेतलेल्या या रोखठोख भूमिकेमळे दफनभूमीसाठी आंदोलन करणा-या मुस्लिम समुदायावरही वचक बसला असून त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची यांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. जपान फर्स्ट धोरणासाठी साने ताकाची ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही परदेशी कामगारांचे स्वागत आहे, परंतु त्यांनी जपानी कायदे आणि परंपरांचे पालन केले पाहिजे, ही भूमिका मांडली आहे. जपानमध्ये सध्या तरी १० मुस्लिम स्मशानभूमी आहेत. (Japan)
========
हे देखील वाचा : Pakistan : वेटींग लिस्टवर मुनीर !
========
तथापि, वाढत्या मुस्लिम लोकसंख्येमुळे, अतिरिक्त स्मशानभूमींची मागणी होत होती. जपानमध्ये सध्या सुमारे ३,५०,००० मुस्लिम लोकसंख्या आहे. २०१० मध्ये, १,१०,००० मुस्लिम होते. २०१५ मध्ये ही संख्या १,५०,००० पर्यंत वाढली, २०२० पर्यंत जपानमध्ये २,३०,००० मुस्लिम होते. याचा अर्थ असा की जपानमध्ये दहा वर्षांत मुस्लिम लोकसंख्या ५३% ने वाढली आणि २०२५ पर्यंत ही लोकसंख्या अंदाजे ३,५०,००० पर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. फ्रान्स, इटली, जर्मनी, इंग्लड सारख्या देशातही अशाच प्रकारे मुस्लिम लोकसंख्या झपाट्यानं वाढली आणि आता तेथील स्थानिक प्रशासनावर त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा दबाव आहे. मात्र जपाननं घेतलेली भूमिका ही या युरोपीय देशांना धडा देणारी आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
