जपानचे शाही घराणे हे जगातील सर्वात जुने राजघराणे आहे. या राजघराण्याची सध्याची धुरा सम्राट नारुहितो यांच्याकडे आहे. मात्र या राजघराण्याचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. याला मुख्य कारण म्हणजे, राजघराण्याच्य वारशासंदर्भात असलेले किचकट नियम. जपानच्या शाही घराण्याच्या कायद्यानुसार, फक्त पुरुषच राजा होऊ शकतो. जर राजाला मोठी मुलगी असेल तर तिचा अधिकार राजगादीवर मान्य केला जात नाही. (Prince Hisahito)
शिवाय शाही कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सामान्य व्यक्तीशी लग्न केल्यावर त्या व्यक्तिला असलेले शाही अधिकार संपुष्टात आणण्यात येतात. यामुळे जपानच्या राजघराण्यातील राजकुमारी आणि एक राजकुमार शाही अधिकाराबाहेर झाले आहेत. अशा परिस्थितीत या शाही राजघराण्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घराण्याच्या सर्व आशा आता राजकुमार हिसाहितो, याच्यावर आहेत. राजकुमार हिसाहितो, हा नुकताच 19 वर्षाचा झाला असून त्याला शाही अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. भविष्यात राजकुमार हिसाहितो हा जपानचा सम्राट होण्याची शक्यता आहे. (International News)
जपानच्या राजघराण्यात गेल्या काही महिन्यात एक उत्सव साजरा करण्यात आला. जपानचा सर्वात तरुण राजकुमार हिसाहितो हा 19 वर्षाचा झाल्यामुळे हा उत्सव साजरा झाला. असा उत्सव या राजघराण्यात जवळपास 40 वर्षांनी साजरा झाला. जपानचे सम्राट नारुहितो यांच्यानंतर राजसिंहासन कोणाकडे जाणार याची कायम चर्चा होते. आता त्यात राजकुमार हिसाहितो यांचे नाव समाविष्ट झाले आहे. जपानमध्ये 2 राजपुत्राचा सिंहासनावर दावा आहे. त्यात राजकुमार हिसाहितो हे पहिले उत्तराधिकारी मानले जातात. राजकुमार हिसाहितो हे आता 19 वर्षांचे झाल्यामुळे त्यांच्यावर आता शाही अधिकाराची जबाबदारी देण्यात आली आहे. (Prince Hisahito)
राजकुमार हिसाहितो हे सम्राट नारुहितो यांचे पुतणे आहेत. सम्राटाचे भाऊ क्राउन प्रिन्स अकिशिनो आणि राजकुमारी किको यांचे ते चिरंजीव आहेत. राजकुमार हिसाहितो यांना दोन मोठ्या बहिणी आहेत. मात्र जपानच्या राजघराण्यात बहिणींना राजगादी मिळत नसल्यामुळे मोठ्या असूनही त्यांना कोणतेही शाही अधिकार मिळणार नाहीत. त्यातही हिसाहितो यांची एक बहीण माको हिने एका सामान्य व्यक्तीशी लग्न केल्यानंतर तिचा राजकुमारी ही किताबही काढून घेण्यात आला आहे. राजकुमार हिसाहितो यांना यामुळेच राजघराण्यात अधिक महत्त्व आले आहे. त्यांना 19 वर्ष पूर्ण झाल्यावर अवघे राजघराणे एक झाले होते. महिनाभर त्यांच्या या वाढदिवसाचा उत्सव साजरा झाला. त्यात अनेक धार्मिक विधीही झाले आणि भावी सम्राटाला दिर्घआयु मिळावे यासाठी प्रार्थना करण्यात आल्या. (International News)
जपानमध्ये 40 वर्षांपूर्वी म्हणजेच 1985 मध्ये, क्राउन प्रिन्स अकिशिनो 18 वर्षांचे झाले तेव्हा राजघराण्यात त्यांच्यासाठी असाच एक उत्सव आयोजित करण्यात आला होता. आता असाच उत्सव त्यांच्या मुलासाठी साजरा करण्यात आला आहे. जपानच्या राजघराण्याच्या परंपरा अत्यंत क्लिष्ठ आहेत. मात्र सध्या या परंपरा नव्या पिढीला सोबत घेऊन साजरे करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळेच राजकुमार हिसाहितो हे 18 वर्षाचे झाल्यावर असा समारंभ करण्यात येणार होता. मात्र हिसाहितो यांनी या समारंभास नकार दिला. त्यावेळी राजकुमार आपल्या विद्यापीठाच्या परीक्षांची तयारी करण्यात व्यस्त होता. म्हणून हा समारंभ वर्षभर लांबवण्यात आला. आता हा समारंभ साजरा होताना, जपानचे भावी सम्राट म्हणून हिसाहितो यांना शिक्षण चालू करण्यात येणार आहे. सध्या जपानच्या राजघराण्यात वारस म्हणून 16 सदस्य आहेत. मात्र त्यात 14 महिलांचा समावेश आहे. (International News)
========
KP Sharma Oli : नेपाळ सरकारला हादरा देणारे सुदान गुरुंग
========
महिलांना जपानच्या राजघराण्याचा वारस होता येत नाही, असा राजेशाही कायदा आहे, त्यामुळे राजकुमार हिसाहितो आणि त्यांचे वडिल राजकुमार आकिशिनो हे दोनच वारसदार आहेत. त्यातही आकिशिनो यांचे वय झाल्याने हिसाहितो यांच्याकडेच सम्राट पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. या सर्वात जपानच्या राजघराण्यासंदर्भात कायदे बदलण्याचा प्रस्तावही आहे. भविष्यात राजकुमार हिसाहितो यांच्यासोबत काही अनुचित प्रकार झाला किंवा त्यांना मुलगा झाला नाही तर राजशाही संपुष्ठात येणार आहे. अशा परिस्थितीत राजेशाही कायम रहावी यासाठी या कायद्यात बदल करण्याचा विचार चालू आहे. त्यात राजघराण्यातील महिलांना सिंहासनासाठी पात्र घोषित करण्याबाबत आणि महिलांना दूरच्या नातेवाईकांमधील पुरुष सदस्यांना दत्तक घेण्याचा अधिकार देण्याबाबत विचार सुरु आहे. (Prince Hisahito)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics