Home » जपानचा प्रिन्स चार्मिंग

जपानचा प्रिन्स चार्मिंग

by Team Gajawaja
0 comment
Japan Population Effect On Royal Family
Share

जपानमध्ये गेल्या काही वर्षात कमी होणारी जनसंख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. जपानची लोकसंख्या गेल्या दशकातील सर्वात कमी लोकसंख्या म्हणून नोंदवली गेली आहे. जपानमध्ये कमी होत असलेल्या या लोकसंख्येमुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. मात्र जपानमधील लोकसंख्या कमी होण्याची ही समस्या फक्त सर्वसामान्यांपूर्ती मर्यादीत नाही, तर जपानच्या राजघराण्यालाही या समस्येचा फटका बसला आहे. जपानचे राजघराणे वेगानं वृद्ध होत आहे. या राजघराण्यात गेल्या 18 वर्षापूर्वी एका राजकुमाराचा जन्म झाला होता. चार दशकानंतर जन्माला आलेला हा राजकुमार आता 18 वर्षाचा होत आहे. या राजकुमाराचा हा 18 वा वाढदिवस लवकरच साजरा होणार असून जपानच्या भावी राजघराण्याच्या या वारसाला लवकरच शाही जबाबदा-या स्विकाराव्या लागणार आहेत. (Japan Population Effect On Royal Family)

जपानचे राजघराणे हे जगातील मानाचे राजघराणे समजले जाते. इम्पीरियल हाऊस मध्ये मोठ्या प्रमाणावर परंपरांचा पगडा आहे. या राजघराण्यात फक्त पुरष वारसाला सिंहासनावर बसण्याची परवानगी आहे. त्यामुळे फक्त जपानमध्ये राजकुमारच राजघराण्याचा भावी वारस होऊ शकतो. याच जपानच्या राजघराण्याचा भावी वारस हिसाहितो 18 वर्षांचा झाला आहे. चार दशकांनंतर राजघराण्यातील एक राजकुमार प्रौढ झाला आहे. त्यामुळे राजघराण्यात आनंदोत्सव साजरा होत आहे. जपानी सम्राट नारुहितो यांचे पुतणे असलेले प्रिन्स हिसाहितो हे यांच्या या 18 व्या जन्मदिवसाचा आनंद सर्व जपानमध्ये साजरा होत आहे. जपानचे राजकुमार हिसाहितो 6 सप्टेंबर रोजी 18 वर्षांचे झाले.

गेल्या चार दशकांत प्रौढत्व गाठणारा ते राजघराण्यातील एकमेव पुरुष सदस्य आहेत. 17 सदस्यीय राजघराण्यात फक्त 4 पुरुष आहेत. यात तिघांनी वयाची साठी ओलांडली आहे. वाढत्या वयाचा आणि घटत्या लोकसंख्येचा सामना करत असलेल्या जपानमध्ये राजघराण्यालाही याच समस्येचा सामना करावा लागत आहे. इम्पीरियल हाऊस हे जपानचे राजवंश आणि शाही कुटुंब आहे. या घराण्याने शेकडो वर्षे जपानवर राज्य केले. जपानी राजेशाही ही जगातील सर्वात जुनी आणि वंशपरंपरागत राजेशाही आहे. या राजघराण्याला कोणतेही नाव नाही. बहुधा हे जगातील एकमात्र नाव नसलेले राजघराणे आहे. त्यामुळेच राजघराण्याच्या सदस्यांना कुटुंबाची नावे नाहीत. त्यांना इम्पीरियल हाऊस असे बोलण्यात येते. याच इम्पीरियल हाऊसमध्ये प्रिन्स हिसाहितो 18 वर्षाचे झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (Japan Population Effect On Royal Family)

हिसाहितो हे जपानचे क्राऊन प्रिन्स अकिशिनो आणि क्राऊन प्रिन्सेस किको यांचे चिरंजीव आणि जपानचा सम्राट नारुहितो यांचे पुतणे आहेत. सम्राट नारुहितो आणि युवराज अकिशिनो यांच्यानंतर प्रिन्स हिसाहितो हे जपानच्या सिंहासनाचे वारस असतील. 39 वर्षांनंतर राजघराण्याचा सदस्य प्रौढ झाला झाल्यानं प्रिन्स हिसाहितो यांचा वाढदिवस समारंभ विशेष असणार आहे. प्रिन्स हिसाहितोच्या वाढदिवस आधी 1985 मध्ये असाच वाढदिवस त्यांच्या वडिलांचा साजरा झाला होता. त्यावेळी राजघराण्यातील प्रौढत्वाचे वय 20 वर्षे होते. नंतर राजकुमारांचे प्रौढत्वाचे वय 18 वर्षे करण्यात आले.
प्रिन्स हिसाहितो हे टोकियोमधील त्सुकुबा विद्यापीठातील तृतीय वर्षाच्या वरिष्ठ हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. (Japan Population Effect On Royal Family)

पुढील वर्षी मार्चमध्ये ते हायस्कूलमधून उत्तीर्ण होतील. त्यांच्या शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांचा वाढदिवस समारंभ हायस्कूल पदवीनंतर साजरा होणार आहे. यासंदर्भात प्रिन्स यांनी आपल्याला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचे आहे, अशी विनंती केली होती. तसेच वेळ इतक्या लवकर निघून गेला, हे कळलेच नाही. अलीकडेच बालवाडी आणि कनिष्ठ शाळेत प्रवेश घेतला आहे, असे जावणत असल्याचेही प्रिन्सनं आपल्या पत्रात लिहिले आहे. शिवाय प्रिन्स हिसाहितोने त्याचे आई-वडील आणि बहीण माको कोमुरो यांचे आभार मानले आहेत. राजकुमारी माको कोमुरोने एका सामान्य कुटुंबातील मुलाबरोबर लग्न केले. त्यामुळे तिला तिच्या शाही अधिकारांपासून वेगळे व्हावे लागले आहे. (Japan Population Effect On Royal Family)

==============

हे देखील वाचा : जपानमध्ये महिलांची संख्या वाढवण्यासाठी पैशांचे वाटप

===============

जपानमध्ये सिंहासनावर फक्त राजघराण्यातील पुरुषांचाच अधिकार आहे. 1947 मध्ये यासाठी कायदा करण्यात आला. 1947 नंतर कोणतीही महिला जपानची शासक होऊ शकत नाही असा नियम करण्यात आला. याआधी 1762-1771 दरम्यान साकुरामाची ही जपानची राणी होती. सध्या जपानच्या राजघराण्यात 17 सदस्य आहेत. यापैकी पाच राजकन्यांनी वर न मिळाल्याने लग्न केले नाही. या घराण्यात1965 ते 2006 पर्यंत एकही मुलगा जन्माला आला नाही. 2006 मध्ये, प्रिन्स हिसाहितोचा जन्म झाला. हिसाहितो आणि क्राउन प्रिन्स अकिशिनो व्यतिरिक्त, सम्राटाचे 88 वर्षीय निपुत्रिक काका, प्रिन्स हिटाची, क्रायसॅन्थेमम सिंहासनाचे दुसरे वारस आहेत. (Japan Population Effect On Royal Family)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.