Japan Poop Themed Shop- जगभरात एकापेक्षा एक सर्रास अशा काही गोष्टी आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का त्याच संख्येने जगात विचित्र सुद्धा काही गोष्टी पहायला मिळतात. खरंतर विविध थीमवर बनवण्यात आलेले पार्क, रेस्टॉर्ट आणि मनोरंजनाच्या जागा सुद्धा आपण पाहतो. मात्र तुम्ही कधी अशा थीमवरील ठिकाण पाहिले आहे का जेथे व्यक्तीच्या खालील भागाला टार्गेट केले जाते. त्याच भागावरुन चक्क रेस्टॉरंट ते म्युझियम सुद्धा उभारण्यात आलेय ते सुद्धा जापानमध्ये.
होय, हे खरंय की जापानमध्ये एक विचित्र पद्धतीचे दुकान आहे. त्याबद्दल तुम्हाला प्रथम हसू येईल पण तितकाच किळसवाणा तो प्रकार वाटेल. मात्र त्या दुकानातील अशा काही गोष्टी आहेत ज्या व्यक्तीच्या दररोजच्या आयुष्यात वापरण्यात येतात आणि त्यावर पॉटीचे डिझाइन करण्यात आले आहे. थोडक्यात काय शी-शी चे डिझाइनच म्हणावे लागेल.
जापान मधील पॉटीचे थीम असणारे दुकान
जापानमधील योकोहामा मध्ये असलेले Unco Shop संपूर्ण देशात आपल्या विचित्र थीममुळे ओळखले जाते. खरंतर जापानी भाषेत Unco चा अर्थ पूप म्हणजेच पॉटी असा होतो. हे दुकान योकोहामा मधील सेन्या वॉर्डात आहे, जे अनको इनकॉर्पोरेशन यांनी सुरु केलेयं. या दुकानात थीमनुसार एकूण ४०० अशा वस्तू विक्री करतात ज्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्यक्तीच्या शरिराच्या खालाच्या भागाशी संबंधित आहेत. येथे टी-शर्ट, स्निकर्स, ज्वेलरी आणि एक्सेसरीजवर सुद्धा पॉटीचे डिझाइन करण्यात आले आहे. आता असा विचार करु नका ही या दुकानातील गोष्टी कोण घेतात. खरंतर येथील एनफ्लुयएंसर्स ते बड्या व्यक्ती सुद्धा या प्रोडक्ट्सची खरेदी करतात.(Japan Poop Themed Shop)
हे देखील वाचा- ‘या’ अरब देशामध्ये महिलांसाठी आहेत विचित्र नियम
का सुरु करण्यात आले हे दुकान?
या दुकानाचे फाउंडर अकिहिको नोबाता यांचे असे म्हणणे आहे की, ते पॉटीला घाणेरडे नव्हे तर मजेशीर पद्धतीने बवनू पाहत होते. त्यांची कंपनी खुप वर्षांपासून सेन्या वॉर्डात पुरुषांसाठी कपडे बनवतात आणि विक्री करते. आता त्याच कपड्यांवर पॉटीचे डिझाइन प्रिंट केले जाते. लोक सुद्धा आवडीने ते पसंद करतात. त्यांनी २०४ मध्ये हे असे करणे सुरु केले आणि त्याला लोकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांच्या मते ही थीम लोकांना विचित्र वाटण्यासह मजेशीर सुद्धा वाटते.