जपान हा कष्टाळू लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. तंत्रज्ञानात या देशानं केलेली प्रगती ही कोणत्याही देशाला हेवा वाटेल अशीच आहे. संस्कृती, परंपरा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठीही जपानची ओळख आहे. अमेरिकेने जपानवर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जपानचे अस्तित्व पुसले जाईल, अशी भीती होती, मात्र जपानी नागरिकांनी शिस्तबद्ध परिश्रम करत आपल्या देशाचा विकास केला आहे. पण याच जपानमध्ये गेल्या काही वर्षापासून एक विचित्र ट्रेण्ड व्हायरल होत आहे. (Japan)
या ट्रेण्डचे नाव आहे, जोहात्सु. जोहात्सु म्हणजे, गायब होणे. गेल्या काही वर्षापासून जपानी नागरिक रातोरात गायब होत आहेत. ही काही भुताटकी नसून, कुटुंब, समाज आणि अन्य घडामोडींना कंटाळून जपानी नागरिक जोहात्सु होत आहेत. आपले कुटुंब, सार्वजनिक जीवन सोडून ही मंडळी रातोरात घरातून गायब होतात. अशा कुटुंबालाही त्याची माहिती नसते. नोकरी गमावणे, लग्नात अपयशी किंवा वाढते कर्ज अशा कुठल्याही कारणामुळे जपानी तरुण गायब होत आहेत. हे तरुण आपली सर्व ओळखही आपल्यामागे पुसून टाकतात. (International News)
यातही थक्क करणारी माहिती म्हणजे, असे गायब होण्यासाठी मदत करणा-या कंपन्याही जपानमध्ये चालू झाल्या आहेत, नाईट मुव्हर्स नावाच्या या कंपन्या एका रात्रीत या गायब होणा-या माणसाचा सर्व रेकॉर्ड पुसून टाकतात. अगदी सोशल मिडियावर एक फोटोही बाकी ठेवला जात नाहीत. ही गायब झालेली व्यक्ती मग काम-धंदा-नोकरी सोडून कुठल्याश्या खेड्यात वा देशाच्या टोकाला जाऊन राहते. त्यांच्या कुटुंबियांना ते कधीच मिळत नाहीत. जपानी गोपनीयता कायद्यातही नागरिकांना त्यांचा ठावठिकाणा गुप्त ठेवण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे पोलीसही या व्यक्तींचा शोध घेऊ शकत नाहीत. अशा जोहात्सु झालेल्या व्यक्तींचे पुढे काय झाले, याची माहिती येत नसली तरी, या व्यक्तींच्या कुटुंबाची अवस्था मात्र अतिशय दयनीय झालेली आहे. जपानमध्ये सध्या असे अनेक आई-वडिल आपल्या तरुण मुलांचा फोटो घेऊन देशाचा कोनाकोपरा शोधत असल्याचे विदारक दृश्य दिसत आहे. (Japan)
तंत्रज्ञानामध्ये प्रगत असलेला जपान देश सध्या अनेक सामाजिक समस्यांच्या विळख्यात अडकलेला दिसत आहे. जपानची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. त्यामुळे या देशाचे अस्तित्व पुढच्या काही वर्षात नष्ट होणार की काय, ही भीती व्यक्त होत आहे. अशातच जपानमधील जोहात्सु या ट्रेण्डची दाहकताही समोर येऊ लागली आहे. जपानमध्ये जेवढी तांत्रिक प्रगती झाली आहे, तेवढाच तिथे कामाचा ताणही वाढला आहे. जोडीला सामाजिक प्रश्न, कर्ज, दिवाळखोरी, नात्यातील फसवणूक असे प्रश्नही येथे वाढले आहेत. यामुळे जपानी तरुण पिढी ही डिप्रेशनमध्ये जात आहे. यातून हे तरुण जोहात्सु सारखा ट्रेण्ड जपळ करत आहेत. आपली सर्व ओळख पुसून जपानी तरुण गेल्या काही वर्षापासून गायब होत आहेत. या तरुणांना नाईट मूव्हर्स नावाच्या कंपन्या त्यांची ओळख नष्ट करायला मदत करतात. यातून त्यांचे सर्व सार्वजनिक रेकॉर्ड पुसले जातात. (International News)
सोशल मिडिया अकाउंटही बंद केले जाते. त्यातील डेटाही डिलिट मारला जातो. त्या व्यक्तिचा एक फोटोही कुठे दिसत नाही, एवढी काळजी घेतली जाते. यासोबतच पासपोर्ट, अन्य सरकारी पेपर, बॅक अकाऊंटही नष्ट केले जाते. हे सर्व एका रात्रीच होते, आणि त्याचरात्री ही व्यक्ती गायब होते. ब-याचवेळा या नाईट मूव्हर्स कंपन्या अशा व्यक्तींना त्या जिथे रहात आहेत, त्यापेक्षा दूरच्या अंतरावरील शहरात स्थायिक होण्यासाठी मदतही करतात. मात्र हे काम कमी वेतनाचे असते. येथे काहीवेळा घर आणि अन्य सुविधाही याच कंपनीतर्फे दिल्या जातात. या सर्वांवर फ्रेंच लेखक आणि छायाचित्रकार जोडी लेना मौगर आणि स्टेफन रेमेल यांनी “द व्हॅनिश्ड: द जोहात्सु जपान इन स्टोरीज अँड फोटोग्राफ्स” हे पुस्तकही लिहिले आहे. (Japan)
=============
हे देखील वाचा : War : अखेर इराण आणि इस्राएलमधील युद्ध थांबले; ट्रम्प यांनी केली युद्धबंदीची घोषणा
=============
या पुस्तकात अशा अनेक जोहात्सु झालेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबाची माहिती सांगण्यात आली आहे. यासाठी लेना मौगर आणि स्टेफन रेमेल यांनी 2008 पासून अवघ्या जपानचा दौरा केला. या त्यांच्या दौ-यातून दरवर्षी जपानमध्ये तब्बल 100000 नागरिक जोहात्सु होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या सर्वात जे गायब होतात, त्यांच्या कुटुंबाची अवस्था अतिशय विदारक आहे. अनेक तरुणांचे आईवडिल मुलाला शोधण्यासाठी देशभर फिरत आहेत, तर काही घरात वडिल जोहात्सु झाल्यामुळे एकट्या आईवर मुलांची जबाबदारी आली आहे. या घटना वाढू लागल्यामुळे जपान सरकार आता त्यांच्या कायद्यातही बदल करण्याचा विचार करीत आहे. जपानी गोपनीयता कायद्यात नागरिकांना त्यांचा ठावठिकाणा गुप्त ठेवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस या व्यक्तींना शोधू शकत नाहीत. मात्र आता कायदा बदलल्यास असे जोहात्सु शोधता येणार आहेत. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics