जापानचे (Japan) सरकार आता तेथील नागरिकांना मुलं जन्माला घालण्यासाठी आणि त्यांच्या परिवाराची वाढ होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान देणार आहे. त्यानुसार आई-वडिलांनी मुलाला जन्म दिल्यानंतर ४२०,००० येन म्हणजेच जवळजवळ २ लाख रुपयांपेक्षा अधिक चाइल्डबर्थ अॅन्ड चाइल्डकेयर ग्रांटच्या रुपात दिले जात आहे. एका रिपोर्टनुसार, येथील सरकार आता मुलाला जन्म घालण्यासाठी मदतीच्या रुपात देण्यात येणाऱ्या रक्कमेत वाढ करणार आहे.
मुलं जन्माला घालण्यासाठी ५ लाख येन देणार
जापानचे आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्री कात्सुनोबू काटो ती रक्कम वाढवून ५०००,००० येन करु शकतात. गेल्या आठवड्यात त्यांनी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गेल्याच आठवड्यात जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत भेट घेतली होती. आता अशा मागणीला २००३ मध्ये आर्थिक वर्षासाठी स्वीकृत आणि कार्यान्वित करण्याची अपेक्षा केली जात आहे. जापानचे आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालय काही काळासाठी ढासाळलेला जन्म दर वाढवण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करत आहे.
जेवढे जन्मलेले नाही त्यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
सरकार अशी अपेक्षा करत आहे की, यामुळे लोकांना मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. जापानच्या सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये जापानमध्ये आतापर्यंत सर्वात कमी मुलं जन्माला आली. आकडेवारीनुसार, जापानमध्ये गेल्या वर्षात ८,११.६०४ मुलांचा जन्म झाला, तर या वर्षातील मृतांचा आकडा १४ लाखांपेक्षा अधिक होता. जन्मदरात सुधार होण्यासाठी सरकार खुप प्रयत्न करत आहे.
मुलांचे पालनपोषण करण्यासाठी होतोय अधिक खर्च
जापानमध्ये (Japan) मुलं जन्माला न येण्यामागे काही प्राथमिक कारणं आहेत. भले सरकार एका मुलासाठी ५ लाख येन देण्याची योजना करत आहे. मात्र ते पर्याप्त नाही. एका रिपोर्टनुसार, मुलाच्या जन्मादरम्यान, सर्व खर्चानंतर मुश्किलने ३०,००० येनच शिल्लक राहतात. ज्या आई-वडिलांसाठी मुलाचे पालनपोषण करणे पर्याप्त नाही. हे २००९ नंतर पहिल्यांदा होत आहे की, जेव्हा सरकार थेट ८०,००० येनची वाढ करत आहे.
हे देखील वाचा- पाकिस्तानातील ‘हे’ विचित्र नियम तुम्हाला माहितेय का?
लग्न करण्यासाठी सुद्धा मिळणार पैसे
जापानचे सरकार फक्त मुलं जन्माला घालण्यासह लग्नासाठी सुद्धा प्रोत्साहित करत आहेत. एका रिपोर्टनुसार, सरकारने लग्न करण्यासाठी इच्छुक जोडप्यांना सहा लाख येन जवळजवळ ४.२५ लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन राशि देण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण सुद्धा घटता जन्मदर सुद्धा आहे. जन्म दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांनी लग्न करुन मुलं जन्माला घालावीत असे सरकारला वाटते. जेणेकरुन वेगाने ढासळणाऱ्या जन्मदरावर नियंत्रण मिळवता येईल.