आजचा दिवस खूपच खास आहे. एकत्र आज देश आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, तर दुसरीकडे आज आपल्या नटखट कान्हाची जयंती आहे. सगळीकडे स्वातंत्र्यदिनाचा आणि कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर आता सगळेच जन्माष्टमीच्या तयारी लागले आहेत. आजच्या दिवशी कृष्ण मंदिरांसोबतच घरोघरी देखील मोठ्या उत्साहाने जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. (Janmashtami)
जन्माष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते. यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमीचा उत्सव दोन दिवस असणार आहे. पंचांगानुसार, १५ ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल आणि १६ ऑगस्टला रात्री ०९ वाजून ३४ मिनिटांनी संपेल. त्यामुळे १५ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल. वैष्णव लोक १६ ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता. त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते. (Marathi News)
जे लोकं घरी जन्माष्टमीची पूजा करणार आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची हे सांगणार आहोत. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी, वृषभ राशी, रोहिणी नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, हर्षण योग आणि जयंती योग या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. रोहिणी नक्षत्राची वेळ यंदा १७ ऑगस्टच्या पहाटे ४:३८ वाजता सुरू होऊन १८ ऑगस्टच्या पहाटे ३:१७ वाजता संपेल. अनेक भक्त अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगानुसार उपवास करतात, तर काहीजण तिथी संपल्यानंतर व्रत पार पाडतात. (Todays Marathi Headline)
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा कशी करावी?
रात्री १२ वाजता, श्रीकृष्ण किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान करा. जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही त्याद्वारे देखील स्नान करू शकता. पंचामृत स्नान झाल्यानंतर देवाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्यानंतर श्रीकृष्णाला नवीन कपडे घालावे, कृष्णाला चंदनाचा टिळा, अत्तर लावावे. त्याच्याजवळ मोरपंख, बासरी आणि तुळशीची पाने ठेवावी. कृष्णाला पाळण्यात बसवा आणि पाळणागीत गावे. जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला लोणी-साखर, पंजीरी, फळे, मिठाई आणि तुळशीची पाने अर्पण करा. भगवान श्रीकृष्णाची आरती करा आणि कृष्णाच्या नावाचा जप करा. जर तुम्ही उपवास केला असेल, तर पूजा केल्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडा. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:४७ नंतर उपवास सोडला जाईल. दुसऱ्या दिवशी, १७ ऑगस्ट रोजी, सूर्योदयानंतर पहाटे ०५:५१ वाजता उपवास सोडता येतो. (Top Trending News)
जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. त्यामुळे या वयात कृष्णाला दुधाचे सर्वच पदार्थ खूप आवडायचे. कृष्णाला नैव्यद्यमध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेले पंचामृत अर्पण करावे. जन्माष्टमीला पंचामृतासोबतच खिरीचा नैवेद्य देखील दाखवणे शुभ मानले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री काकडी कापून त्यांचा नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेच्या व्यतिरिक्त पीठ किंवा धणे पंजिरी आवडते. यामुळे तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी प्रसादामध्ये पीठ किंवा धणे पंजिरीचा समावेश करावा. (Top Marathi News)
==============
हे देखील वाचा : Dahihandi : जन्माष्टमीनंतर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी सणाचे महत्व
Janmashtami : जन्माष्टमी विशेष : भारतातील प्रसिद्ध कृष्णमंदिरं
===============
जन्माष्टमीच्या पूजेवेली तुम्ही कृष्णाला आवडणारी फुले देखील वाहू शकता. श्रीकृष्णाला कमळाचे फूल खूप आवडते. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला नेहमी वैजयंतीच्या फुलांचा हार घालतात. हे फूल त्यांना विशेष प्रिय आहे. ते सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते. शिवाय पारिजात देखील देवाला आवडते. मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने ते स्वर्गातून पृथ्वीवर आणले. असे म्हटले जाते की, श्रीकृष्णाच्या नावावरुन कृष्ण कमल फुलांचे नाव ठेवण्यात आले आहे. तसे बघायला गेल्यास रचनेमध्ये कृष्ण, राधा आणि पांडवांची प्रतीकात्मक रूपे दिसतात. हे फूल श्रीकृष्णाला अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. (Social News)
(टीपः हा लेख/ ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आम्ही या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)