Home » Jamun Side Effect: जांभूळ खाल्ल्याने होणारे ‘हे’ दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का? आताच सावध व्हा  

Jamun Side Effect: जांभूळ खाल्ल्याने होणारे ‘हे’ दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का? आताच सावध व्हा  

जांभूळ हे एक हंगामी फळ आहे, जे खाण्यास चवदार तसेच पोषक तत्वांनी समृद्ध असते.

0 comment
Jamun Side Effect
Share

पावसाळ्यात येणारी खास फळ आपल्यातील प्रत्येकाला आवडतात. पावसाळ्यातीलच एक फळ म्हणजे जांभूळ जे लोक अगदी आवडीने खातात. जांभूळ हे एक हंगामी फळ आहे, जे खाण्यास चवदार तसेच पोषक तत्वांनी समृद्ध असते. जांभूळच्या सेवनाने आरोग्याला मोठा फायदा होतो. गडद जांभळ्या आणि काळ्या रंगाचे जांभूळ रसाळ, गोड आणि आंबट असतात. हे फळ सहसा कच्चे खाल्ले जाते. आणि याचा उपयोग रस तयार करण्यासाठी केला जातो किंवा मिठाई करण्यासाठी सुद्धा केला जातो.जांभूळ सेवन केल्याने होणारे अनेक फायदे तुम्ही आतापर्यंत ऐकले असतील जसे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच याच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित इतर ही अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. कारण जांभूळ मध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कार्ब, प्रथिने, चरबी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि फॉलिक अॅसिड समृद्ध असतात, जे शरीरनिरोगी ठेवण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की जांभूळ खाण्याचे जसे फायदा आहेत तसे त्याचे तोटे ही आहेत. आजच्या लेखात आपण जांभूळ खाल्याने होणाऱ्या नुकसानबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.(Jamun Side Effect)
Jamun Side Effect

Jamun Side Effect

 
जांभळाच्याआत आम्ल आढळते, ज्यामुळे दातांचे इनेमल खराब होऊ शकते. अशा वेळी ज्या लोकांचे दात संवेदनशील आहेत किंवा ज्यांना पोकळीची समस्या आहे त्यांनी जास्त प्रमाणात जांभळाचे सेवन करणे टाळावे. तसेच जांभूळ खाल्ल्यानंतर स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
 
– जर तुम्ही जास्त प्रमाणात जांभळूचे सेवन केले तर यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
 
जांभळामध्ये थंड गुणधर्म असतात आणि कधीकधी ते खोकला आणि सर्दी वाढवू शकतात. त्यामुळे खोकला आणि सर्दीचा त्रास असणाऱ्यांनी जांभळाचे सेवन करू नये.
 

जांभळाच्या आत टॅनिन असतात, म्हणून त्याचे जास्त सेवन केल्याने पोटाच्या अस्तरावर दबाव वाढतो आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये जळजळ होऊ शकते. याशिवाय जांभळाच्या अतिसेवनामुळे व्यक्तीला पोटदुखी, ऍसिडिटी, उलट्या अशा लक्षणांनाही सामोरे जावे लागू शकते.

==============================

हे देखील वाचा: Benefits of Karela: कडु कारल्याचे ‘हे’ गुणकारी उपयोग तुम्हाला माहीत आहेत का?

==============================
जांभळामध्ये ऑक्सलिक अॅसिड असते, जे यकृत रोगाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. अशा रुग्णांनी जांभूळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
– जास्त जांभूळा खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीस पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जांभळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. पण जर फायबरचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्या व्यक्तीला पोटात सूज येणे, गॅस होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
– ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी आहे त्यांनी अधिक जांभळाचे सेवन करणे टाळावे.
 
लक्षात घ्या काही फळ फक्त ठराविक ऋतुमध्येच मिळत असले तरीही कोणत्याही गोष्टीचा प्रमाणापेक्षा केलेले सेवन हे घातकच असू शकते. त्यामुळे आपल्याला एखादे फळ कितीही आवडत असले तरीही त्याचे प्रमाणात सेवन करावे. 
 
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील कोणताही उपाय करण्याआधी डिक्टरांचा सल्ला घ्या. )

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.