Jalfal Benefits : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मसाले पदार्थांची चव वाढवतात. त्याचसोबत आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. याच मसाल्यांपैकी एक म्हणजे जायफळ. जायफळ आकाराने लहान असले तरीही याच्यामधील गुणधर्मांमुळे आरोग्याला मोठा फायदा होतो. आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होऊ शकतात.
जायफळची पावडर काढा अथवा चहामध्ये मिक्स केली जाते. याशिवाय काही डेजर्ट्ससाठी देखील जायफळच्या पावडरचा वापर केला जातो. जायफळमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात. यामुळे काही आरोग्यासंबंधित समस्यांवर घरगुती उपाय म्हणून जायफळचा वापर केला जाऊ शकतो. जाणून घेऊया जायफळचे फायदे आणि नुकसान सविस्तर…
झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा
ज्यांना रात्रीची झोप लागत नाही त्यांनी झोपण्याआधी कोमट गरम दूधात जायफळची पावडर मिक्स करावी. यामुळे तणाव, थकवा दूर होतो. याशिवाय जायफळच्या तेलाने मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो.
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो
जायफळ लहान मुलांसाठी फायदेशीर ठरते. मुलांना जर सर्दी-खोकला झाल्यास त्यांना आईच्या दूधात जायफळचा वापर करू शकता. हेच दूध मुलाला प्यायला द्या.
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर रहाल
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते त्यांनी जायफळचे सेवन करावे. जायफळची पावडर कोमट पाण्यातून दररोज सकाळी प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. पोटात होणारा गॅस आणि अपचानाची समस्याही कमी होऊ शकते. (Jalfal Benefits)
या गोष्टींची घ्या काळजी
जायफळचे सेवन ऋतूनुसार करावी. पण तेव्हा देखील मर्यादेत जायफळचा वापर करावा. जर एखादे औषध घेत असल्यास अथवा प्रेग्नेंसीमध्ये जायफळचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.