जगात ऐवढे कठोर आयुष्य, खाणे-पिण्यावर संयम आणि नियंत्रण हे एखाद्या धर्मातील साधु, संत किंवा साध्वी सुद्धा करत नसतील ते जैन धर्मात दिसते. जैन मुनि आणि साध्वींचे आयुष्य खुप खडतर असते ते पाहून सर्वजण हैराण होतातच. जैन साधु दिवसातून केवळ एकदाच भोजन आणि पाणी पितात. त्यानंतर संपूर्ण दिवस काहीच खात-पित नाहीत. भोजनासाठी ते एखादी थाळी, कटोरी किंवा ग्लास मधून पाणी सुद्धा पित नाहीत. (Jain Sadhu-Sadhvi)
जैन साधु हाताचाच खाण्यापिण्यासाठी वापर करतात. म्हणजेच ते हातावरच जेवतात आणि पाणी सुद्धा त्यानेच पितात. त्याचसोबत ते कधीच स्वत:हून भोजन बनवत नाहीत. केवळ घरात असलेले शाकाहारी, सात्विक आणि शुद्ध भोजन खातात. अलबत्ता साध्वी जरुर आपल्यासोबत लाकडाचे भांडे ठेवतात, त्यात ते जेवण घेतात.
काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये साध्वी सामनी प्रतित्रा प्रज्ञा यंनी बीबीसीच्या एका मुलाखतीत असे म्हटले होते की, त्या किंवा त्यांच्यासारख्या साध्वी एक जोडीच वस्र ठेवतात. या व्यतिरिक्त मुख्यरुपात त्यांच्याकडे हाताने बनवण्यात आलेली लाकडाची तीन भांडी असतात. त्यात ते जेवण एकत्रित करतात आणि खातात.
जैन भिक्षु सर्व प्रकारचे भौतिक संसाधानांचा त्याग करतात. परंतु अत्यंत साधेपणाने ते आयुष्य जगतात. ऐवढेच नव्हे तर परदेशात राहणारे जैन साधू आणि साध्वी सु्द्धा अशा प्रकारचे कठीन आयुष्य जगतात. राहण्याचे आश्रय आणि खाणं सुद्धा जैन समुदायाकडून दिले जाते. अथवा जैन धर्मासंबंधित मंदिरातील मठात राहतात.
जैन धर्मात आहारासंदर्भात कठोर भोजनशैलीवर विश्वास ठेवतात. ते पूर्णपणे शाकाहारी असतात आणि मुळं असलेल्या भाज्या, काही फळं सुद्धा खात नाहीत. काही जैन वेगन असतात ते फक्त हिरव्या रंगाच्या भाज्या खातात. यामागे कारण असे की, त्यांना असे वाटते की, मुळांमध्ये सुक्ष्म जीव असतात. यामुळे त्यांची हत्या होऊ शकते.(Jain Sadhu-Sadhvi)
हे देखील वाचा- महिला नागा साध्वींचे ‘असे’ असते आयुष्य
जैन साधू आणि साध्वी कमी व शुद्ध सात्विक भोजन खातात. यामागे त्यांचे असे मानणे आहे की, जर खाणं कचरा डब्यात टाकला तर त्यात मायक्रोऑर्गेनिज्मचे सूक्ष्म जीव निर्माण होतील. त्याचप्रमाणे जैन आपले संध्याकाळचे भोजन सुर्यास्तापूर्वी करतात आणि दुसऱ्या दिवशीच्या सुर्यास्तापर्यंत काहीच खात-पित नाहीत.
दरम्यान, जैन दोन प्रकारचे असतात आणि दोन्ही पंथांमध्ये साधू-साध्वीया दीक्षा घेतल्यानंतर कठोर आयुष्य जगतात. तर श्वेतांबर साधु-साध्वीया केवळ एक पातळ सूती वस्र परिधान करतात. दिगंबर साधु तर वस्र धारण करत नाही पण साध्वी एक सफेर वस्राची साडी नेसतात. हैराण करणारी गोष्ट अशी की, त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर कधीच अंघोळ करत नाहीत. असे मानले जाते की, जर त्यांनी स्नान केले तर सूक्ष्म जीवांचे आयुष्य धोक्यात पडू शकते. यामुळेच ते अंघोळ करत नाहीत आणि तोंडावर नेहमीच सफेद कपडा लावून ठेवतात. जेणेकरुन सूक्ष्म जीव त्यांच्या तोंडाच्या वाटेने शरिरात जाऊ नये.