प्रत्येकाचे एक स्वप्न असते, मोठे झाल्यावर एक चांगला जॉब आणि गलेगठ्ठ पगाराची एकदम भारी नोकरी. सोबतच एक छान घर आणि एक आलिशान गाडी बस्स. आजच्या घडीला जर लोकांना विचारले की, जास्त पगार म्हणजे किती अपेक्षित आहे, तर सगळ्यांचे उत्तर १ लाखाच्या आसपासचे असेल. कारण लाखोंमध्ये पगार हे सगळ्यांचेच स्वप्न झाले आहे. यासाठी प्रत्येक जणं अफाट मेहनत घेत असतो. (Salary)
मात्र प्रत्येकालाच असा पगार मिळतो असे नाही. मात्र आज अचानक पगाराबद्दल लिहण्याचे कारण एक खास कारण आहे. आम्ही जर तुम्हाला विचारले की, या जगात सर्वात जास्त पगार घेणारी व्यक्ती कोण असेल आणि तिला महिन्याला किती पगार असेल? तर यावर अनेकांचे उत्तर असेल एलन मस्क, काहींचे उत्तर असेल बिल गेट्स तर काहींचे उत्तर असेल मुकेश अंबानी. मात्र यापैकी कोणीच ती व्यक्ती नाहीये, जी सर्वाधिक पगार घेते. (Marathi News)
जगभरात सर्वात जास्त पगार हा CEO नोकरी करणाऱ्या व्यक्तीला मिळतो. सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत सत्या नडेला, सुंदर पिचाई आणि एलॉन मस्क या दिग्गजांची नावे येतात. मात्र यापैकी कोणीच सर्वाधिक पगार घेत नाही. जगात सर्वात जास्त पगार घेणारी व्यक्त एक भारतीय आहे. हे ऐकून अभिमान वाटलं असेल ना…? हो जगात सर्वात जास्त पगार घेणारी व्यक्ती भारतीय असून तिचे नाव आहे, जगदीप सिंग. बऱ्याच लोकांसाठी हे नाव नवीन असेल. मात्र जगदीप हेच जगात सर्वात जास्त महिन्याला पगार घेतात. मग नक्की कोण आहे जगदीप आणि त्यांना असा किती पगार एका महिन्याला मिळतो चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
जगदीप सिंग यांचे नाव मधल्या काही काळापासून कमालीचे चर्चेत आहे. जगातील सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे. भारतीय वंशाचे जगदीप सिंग यांचा दररोजचा पगार हा तब्बल ४८ कोटी रुपये आहे. अर्थात त्यांचा वार्षिक पगार १७,५०० कोटी रुपये इतका आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई हे देखील या यादीत मागे आहेत. पिचाई यांचा एप्रिल २०२३ पर्यंतचा वार्षिक पगार १६६३ कोटी रुपये होता. मात्र जगदीप सिंग यांचा पगार पिचाई यांच्यापेक्षा १० पटींनी अधिक आहे. (Top Stories)
कोण आहे जगदीप सिंग?
जगदीप सिंग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून एमबीए पूर्ण केले आहे. क्वांटमस्केपची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी १० वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले होते. यामुळे त्यांना बॅटरी तंत्रज्ञानातील क्रांतिकारी प्रगतीची संधी समजून घेण्याची संधी मिळाली आहे. जगदीप सिंग यांनी २०१० मध्ये कंपनीची स्थापना केली. त्यांची कंपनी क्वांटमस्केप नवीन पिढीतील सॉलिड-स्टेट रिचार्जेबल लिथियम मेटल बॅटरी बनवते. या बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (ईव्ही) वापरल्या जातात. फोक्सवॅगन आणि बिल गेट्ससारख्या दिग्गजांनीही त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. क्वांटमस्केप कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. (Top Marathi Headline)
क्वांटमस्केप ही कंपनी २०२० पासून अमेरिकन शेअर बाजारात लिस्टेड आहे. त्यांच्या कंपनीला गुंतवणुकदारांची चांगली साथ मिळाली. जगदीप सिंग यांच्या पगाराच्या पॅकेजमध्ये २.३ बिलियन डॉलर्सच्या शेअर्सचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांचा वार्षिक पगार सुमारे १७,५०० कोटी रुपये झाला. (Latest Marathi News)
========
Giorgio Armani : ज्योर्जियो अरमानी जगातला सर्वात ग्रेट फॅशन ब्रँड कसा झाला !
========
जगदीप सिंग नाविन्यतेसाठी ओळखले जातात. त्यांच्या कंपनीत बनवलेल्या सॉलिड-स्टेट बॅटऱ्या सामान्य बॅटऱ्यांपेक्षा खूप पुढे आहेत. ते केवळ दीर्घकाळ वीज देत नाहीत तर त्वरीत चार्ज देखील होतात. या कारणास्तव, ते ईव्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. सध्या ईव्ही क्षेत्रात भरभराट होत असल्याने त्यांची कंपनीही नवीन उंची गाठत आहे. (Top Trending News)
जगदीप सिंग यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी कंपनीची जबाबदारी शिवा शिवराम यांच्याकडे सोपवली होती. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. सध्या ते ‘स्टेल्थ स्टार्टअप’चे सीईओ आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics