Home » India : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, जाणून घ्या या पदाची निवड प्रक्रिया

India : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, जाणून घ्या या पदाची निवड प्रक्रिया

by Jyotsna Kulkarni
0 comment
India
Share

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे जगदीप धनखड यांनी सांगितले. राजीनामा देताना जगदीप धनखड यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत. जगदीप धनखड यांचा ऑगस्ट २०२८ पर्यंत कार्यकाळ होता. मात्र त्याआधीच जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देणारे धनखड हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती ठरले आहेत. (Marathi News)

दरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे वय ७४ असून त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला होता. याआधी ते एक ज्येष्ठ वकील आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांचा पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारसोबत अनेक वेळा वाद झाला. त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार, प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणि अलोकशाही वर्तन आदी अनेक मुद्द्यांवरून टीका केली होती. (JAgdeep Dhankhad)

मात्र आता धनखड यांच्या राजीनाम्यांनंतर नवीन उपराष्ट्रपती कोण होणार याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच तमिळनाडूचे राज्यपाल रवी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता भारताचे नवीन उप्राष्ट्रपरी कोण होतील हे पाहणे महत्वाचे असेल. तत्पूर्वी आपण भारताच्या उपराष्ट्रपती या पदाची निवडीची माहिती जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

India

भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांच्यावर राज्यसभेचे कामकाज पार पाडण्याची आणि कायदे बनविण्याची सर्वात मोठी जबाबदारी असते. जर काही कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती हे त्यांची जबाबदारी सांभाळतात. मात्र आता उपराष्ट्रपती पदी कोण येणार हे पाहणे महत्वाचे असेल. त्यापूर्वी भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवड कशी होते हे आपण जाणून घेऊया. (Top Trending News)

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करता. यात नामांकित सदस्यांचाही समावेश असतो. उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी तो व्यक्ती भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला १५००० रुपयांचे डिपॉझिट भरावे लागते. निवडणूक प्रक्रिया विद्यमान उपराष्ट्रपतींची मुदत संपण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. (Top Marathi HEadline)

घटनेच्या अनुच्छेद ६६ मधील तरतुदींनुसार, उपराष्ट्रपतीची निवड निर्वाचक सदस्यांद्वारे केली जाते. अर्थात दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य यासाठी मतदान करतात. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यसभेचे २३३ निवडून आलेले खासदार, राज्यसभेचे १२ नामनिर्देशित खासदार आणि लोकसभेचे ५४३ खासदार मतदान करू शकतात. यामध्ये एकूण ७८८ लोक मतदान करू शकतात. घटनेच्या अनुच्छेद ६८ मध्ये असे नमूद केले आहे की, हे खासदार पसंती क्रमानुसार मतदान करतात. मतदाराला प्राधान्य क्रमाने मतदान करावे लागते. मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीला १, दुसऱ्या पसंतीसाठी २ असा क्रमांक लिहावा लागतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या नियम १९७४ च्या नियम ८ नुसार, निवडणुकीची निवडणूक संसद भवनात घेतली जाते. (Latest Marathi News)

==============

हे देखील वाचा : 

Maya Dolas लोखंडवाला शूटआउट आणि खरं सत्य!

The Maya Mystery : २०१२ ची भविष्यवाणी करणारी रहस्यमयी माया जमात

===============

मतमोजणी कशी होते ?
उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयासाठी एक निश्चित आकडा गाठावा लागतो. सर्वात आधी मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या दोनने भागली जाते आणि नंतर त्यात १ जोडला जातो. ७२० खासदारांनी मतदान केले तर त्याला २ ने भागले जाते. उत्तर ३६० मिळेल, यात १ जोडल्यानंतर ३६१ आकडा होईल जो निवडणूक जिंकण्यासाठी गाठावा लागतो. (Top Stories)

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. जर यात एखाद्या उमेदवाराला ३६१ पेक्षा जास्त मते मिळाली तर त्याला विजयी घोषित केले जाते. मात्र कोणीही जिंकले नाही तर पुन्हा मतमोजणी केली जाते. दुसऱ्या वेळी सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला वगळले जाते. त्यानंतर त्याची मते इतरांना वितरित केली जातात. त्यानंतर विजयी उमेदवाराची घोषणा केली जाते. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.