Home » जगन्नाथ मंदिराची कथा

जगन्नाथ मंदिराची कथा

by Team Gajawaja
0 comment
Jagannath Puri Temple
Share

ओडिसातील प्रसिद्ध अशी जगन्नाथ पुरी मंदिराची रथयात्रा आता सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवघी राहीला आहे. जगन्नाथ रथयात्रा ७ जुलैपासून सुरू होईल. या यात्रेसाठी पुरीमध्ये अंतिम टप्प्यातील तयारी सुरु आहे. यात्रेमध्ये सामिल होण्यासाठी देशाच्या कानोकोप-यातून लाखोंच्या संख्येनं भाविक पुरीमध्ये दाखल झाले आहे. ही यात्रा हिंदू धर्मियांसाठी मानाची समजली जाते. जगन्नाथ रथयात्रेत भाग घेतल्याने १०० यज्ञ करण्याएवढे फळ मिळते, अशी भावना भगवान जगन्नाथांच्या भक्तांमध्ये आहे.

जगन्नाथ पुरीच्या या मंदिरात जाऊन भगवान जगन्नाथातंचे दर्शन घेण्यासाठीही लाखो भाविक उत्सुक आहेत. यातील अविवाहित जोडप्यांना मात्र मंदिरात प्रवेश दिला जात नाही. जगन्नाथ पुरीच्या मंदिरासंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. अविवाहित जोडप्यांसदर्भातही एक कथा सांगितली जाते. त्या कथेचा संदर्भ थेट राधाराणींबरोबर जोडण्यात आलेला नाही. जगन्नाथ पुरी येथील प्रसिद्ध रथयात्रा आत सुरु होणार आहे. (Jagannath Puri Temple)

सनातन धर्मात जगन्नाथ रथयात्रा हा मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. ९ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात आषाढ महिन्याच्या दुसऱ्या दिवसापासून होते. यावेळी यात्रा ७ जुलैपासून सुरु होत आहे. यात्रा सुरु झाल्यावर भगवान जगन्नाथाचा रथ त्यांच्या मावशीचे घर असलेल्या गुंडीचा मंदिरात नेला जातो. येथे जगन्नाथ भगवान ८ दिवस मुक्काम करून ९व्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला जगन्नाथ मंदिरात परत येतात. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ यांच्यासह त्यांचे मोठे बंधू बलराम आणि बहिण सुभद्रा यांचेही रथ असतात. या रथयात्रेदरम्यान अवघी पुरी यात्रामय होऊन जाते. भगवान जगन्नाथ पुन्हा मंदिरात गेल्यावर लाखो भक्त जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात. मात्र जगन्नाथांचे हे मंदिर खूप वेगळे आहे.

भारतातील बहुतांश मंदिरामध्ये भगवान कृष्ण राधाराणीसोबत असतात, तसेच काही मंदिरामध्ये रुक्मिणीमातेचीही मुर्ती आहे. मात्र या मदिंरात राधाराणी किंवा रुक्मिणीमातेची मुर्ती नाही.फरक काय रथयात्रेतही भगवान जगन्नाथासोबत राधा आणि रुक्मिणी माता उपस्थित नसतात. तसेच जगन्नाथ पुरीच्या मंदिरात अविवाहित जोडप्यांना प्रवेशही नाकारण्यात येतो. त्यामागे राधाराणीचा शाप असल्याची अख्यायिका सांगण्यात येते. मंदिराशी संबंधित अनेक गुढ कथा आहेत. त्यापैकीच ही एक कथा आहे. (Jagannath Puri Temple)

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अविवाहित जोडप्यांना प्रवेश प्रतिबंधित आहे. ज्यांचे लग्न निश्चित झाले आहे पण झाले नाही अशा जोडप्यांनाही या मंदिरात प्रवेशास मनाई आहे. पौराणिक कथेनुसार, एकदा श्री कृष्णाचे जगन्नाथ रूप पाहण्यासाठी श्री राधा राणी पुरीला आल्या. परंतु भगवान जगन्नाथाचे भक्त आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी राधाराणींना दारातच थांबवले. श्री राधा राणीनी त्यांना दारातच थांबवण्याचे कारण विचारले तेव्हा पुजारी म्हणाले की देवी, तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या सख्या आहात. पण तुम्ही विवाहित स्त्री नाहीत.

जर भगवान श्रीकृष्णाच्या बायकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही तर तुम्हाला मंदिरात प्रवेश कसा देणार. हे उत्तर ऐकल्यावर राधाराणींना राग आला. यानंतर श्री राधा राणींनी जगन्नाथ मंदिराला शाप दिला की यापुढे कोणत्याही अविवाहित जोडप्याला या मंदिरात प्रवेश करता येणार नाही. जर त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या आयुष्यात कधीही प्रेम मिळणार नाही. तेव्हापासून जगन्नाथ पुरी मंदिरात अविवाहित जोडप्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे सांगितले जाते. (Jagannath Puri Temple)

================

हे देखील वाचा : जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडारा खुला होणार

===============

चारधाममध्ये समावेश असलेले जगन्नाथ मंदिर भगवान कृष्णाचे जागृत स्थान मानले जाते. भगवान जगन्नाथाच्या मूर्तीच्या भगवान कृष्णाचे ह्दय असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. या मंदिराच्या प्रथा या हजारो वर्षापासून आहेत, तशाच आत्ताही पार पाडल्या जातात. अगदी देवाची नेहमीची पुजाही हजारो वर्ष आधी होत होती, तशीच आत्ताही होते. शिवाय या मंदिरातील प्रसादही खास असतो.

हा प्रसाद फक्त मातीच्या भांड्यात तयार केला जातो. शिवाय तो चुलीवरच होतो. या चुलीसाठी ज्या लाकडांचा वापर होतो, ती लाकडे भगनाव जगन्नाथाचा रथ तयार करण्यासाठी वापरलेली असतात. दरदिवशी हजारो भाविक हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी येतात. तो प्रसाद तेवढ्या भक्तांसाठी होतो. त्यातला एकही कण वाया जात नाही, वा एकही भक्त प्रसादापासून वंचित रहात नाही, असे सांगितले जाते. (Jagannath Puri Temple)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.