जगन्नाथ रथ यात्रा ही भारताच्या अध्यात्मिक संस्कृतीचे मोठे उदाहरण आहे. अतिशय पवित्र असणारी ही ऐतिहासिक परंपरागत असणारी यात्रा म्हणजे हिंदू लोकांसाठी पर्वणीच असते. दरवर्षी आषाढ महिन्यात ओडिशाच्या पुरी नगरीत लाखो भक्त या भव्य दिव्य सोहळ्यात सहभागी होतात. भगवान जग्गनाथ यांची ही यात्रा एकूण १२ दिवस चालते. या रथयात्रेदरम्यान अनेक धार्मिक विधी, पूजा आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. रथयात्रा म्हणजे काय तर भगवान जग्गनाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना मंदिरातून बाहेर काढतात आणि त्यांना मोठ्या लाकडी रथात बसवून संपूर्ण नगरात त्यांना फिरवले जाते. या रथयात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. (Rathyatra)
भगवान जगन्नाथांसोबतच बलभद्र आणि सुभद्रा यांचा देखील भाविक रथ ओढतात. हा रथ ओढण्यासाठी एक विशिष्ट्य प्रकारची दोरी वापरली जाते. या दोरीचे देखील खास वैशिष्ट्य असते. हा रथ सामान्य भाविक देखील ओढू शकतात, मात्र रथ ओढण्यासाठी इतकी गर्दी असते की अनेकांना दोरीला स्पर्श करणे कठीण असते. मात्र रथ जरी ओढत आला नाही तरी या रथयात्रेदरम्यान रथाच्या दोरीला स्पर्श करणे देखील खूप शुभ मानले जाते. आपण जर पाहिले तर जग्गनाथ भगवानांच्या या रथयात्रेच्या प्रत्येक गोष्टीसाठी एक खास नाव आहे. देवांच्या तीन रथांना देखील नाव आहे, तर या पवित्र दोरीला देखील एक नाव असलेच पाहिजे. हो, जगन्नाथ रथयात्रेच्या दोरीला एक खूपच खास नाव आहे. मुख्य म्हणजे भगवान जग्गनाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथाच्या दोरीला वेगवेगळी नावे देण्यात आली आहे. (Marathi News)
रथयात्रेमधील दोऱ्यांची नावे
जगन्नाथ रथयात्रेमध्ये रथ ओढल्या जाणाऱ्या दोऱ्यांना स्वतःची अशी नावे आहेत. त्यातील भगवान जगन्नाथाच्या १६ चाकी नंदी घोष रथाच्या दोरीचे नाव शंखचूड नाडी असे आहे. तर दुसरे बलभद्र यांच्या १४ चाकांच्या रथाला तलध्वज असे म्हणतात. तलध्वज या रथाच्या दोरीला बासुकी या नावाने ओळखले जाते. तिसरा या दोघांच्या बहीणचा १२ चाकी रथ असलेल्या दर्पदलन या रथाच्या दोरीला स्वर्णचुडा नाडी या नावाने देखील ओळखले जाते. या दोऱ्या केवळ रथ ओढण्याचे साधनच नाही तर त्याला स्पर्श करणे म्हणजे भाग्य आहे, असे मानले जाते. (Todays Marathi Headline)
या रथ यात्रेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. कोणताही धर्माचा, कोणत्याही जातीचा, देशाचा, वंशाचा व्यक्ती हा रथ मोठ्या भावभक्तीने ओढू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार, रथाची दोरी ओढणारा व्यक्ती जीवन आणि मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो आणि मोक्षाकडे वाटचाल करतो असे मानले जाते. मात्र एक व्यक्ती हा रथ जास्तवेळ ओढू शकत नाही. मात्र काळजी करू नका जरी तुम्ही रथ ओढू शकला नाही तरी या रथयात्रेमध्ये पवित्र आणि स्वच्छ मनाने सहभागी झाल्याने यज्ञांइतकेच पुण्य मिळते. (Marathi Latest News)
============
हे ही वाचा : Wajid Ali Shah : ‘एक कलाप्रेमी राजा : वाजिद अली शाह’, पण या कारणास्तव राहिला चर्चेत
=============
जगन्नाथ रथयात्रेच्या दोरीला स्पर्श करणे अत्यंत फायदेशीर आणि पुण्यपूर्ण मानले जाते. असे म्हटले जाते की रथाच्या दोरीला स्पर्श केल्याने पापांचे शुद्धीकरण होते आणि भक्तांना जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळते. अशा परिस्थितीत, या रथयात्रेत सहभागी होऊन रथाच्या दोरीला स्पर्श केल्याने जीवनात सौभाग्य मिळते. दरम्यान २७ जून पासून या रथयात्रेला सुरुवात झाली असून, पुढील अजून काही दिवस मोठ्या जल्लोषात ही रथयात्रा चालू असणार आहे. (Social News)