अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्या दिवंगत पत्नी यांचे मृत्यूपत्र आता समोर आले आहे. त्यांचा मृत्यू गेल्या वर्षात जुलै महिन्यात झाला होता. इवाना यांनी संपत्ती आपल्या तीन मुलांमध्ये समान वाटली. त्याचसोबत मुलांची देखभाल करणाऱ्या आयाला सुद्धा ९ कोटींचा बंगला दिला आणि काही हिस्सा आपला पाळीव कुत्रा याच्या नावावर केला आहे. येथे मुख्य गोष्ट अशी की, इवाना यांनी पती डोनाल्ड ट्रंम्प यंना आपल्या संपत्तीतील एक रुपया ही दिला नाही. इवाना ट्रंम्प या डोनाल्ड ट्रंम्प यांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांनी १९७७ मध्ये डोनाल्ड्र ट्रंम्प यांच्याशी लग्न केले होते. पण १९९२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. (Ivana Trump Will)
इवाना यांची एकूण संपत्ती ३.४ कोटी डॉलर होती. ७३ वर्षीय इवाना यांचा मृत्यू आपल्याच घरी पायऱ्यांवरुन कोसळून झाला होता. इवाना यांनी आपल्या मृत्यूपत्रात वॉर्डरोब मधील गोष्टींची सुद्धा विभागणी केली. त्यांनी बहुतांश सामान हे रेड क्रॉस आणि सेल्वेशन आर्मीला दान करण्याची इच्छा त्यात व्यक्त केली आहे. फरचे कलेक्शन आणि दागिने विक्री करुन जे पैसे मिळाले त्याची वाटणी तीन मुलांमध्ये समान करण्याचे मृत्यूपत्रात लिहिले आहे. इवाना ट्रंम्प यांची तीन मुलं डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक आहे.

आयाला मिळाला ९ कोटींचा बंगला
इवानाची असिस्टंट सुजान डोरोथी करी या दीर्घकाळ ट्रंम्प परिवाराशी जोडल्या गेल्या होत्या. यापूर्वी इवानाच्या मुलांची ती आया होती. मुलं मोठी झाल्यानंतर सुजानाला त्यांनी आपली असिस्टंट केली होती. इवानाने मृत्यूपत्रात सुजाना डोरोथी करीला मियमी बीच जवळील अपार्टमेंट देण्याचे म्हटले आहे. याची किंमत ९ कोटी रुपये आहे. तो २००१ मध्ये बनवण्यात आला होता. इवानाने २००९ मध्ये तो एकूण ५.२५ कोटींना खरेदी केला होता. यामध्ये एक बेडरुम, बाथरुम आणि किचन आहे. हा फ्लॅट १ हजार स्क्वेअर फूट आहे.
नॅनीच्या प्रति जाहीर केली होती कृतज्ञता
इवाना ट्रंम्प यांनी २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या एका पुस्तकात असे लिहिले होते की, डोरोथी एक नॅनीचा रुपात अत्यंत कुशल होती. तिनेच मुलांना इंग्रजी प्रार्थना शिकवली होती, जी इवाना यांना माहिती नव्हती. इवाना यांनी आपले पुस्तक राइजिंग ट्रंम्पमध्ये असे ही लिहिले की, मी हे सांगू शकत नाही की धर्म आता माझ्या आयुष्यात एक मोठी भुमिका पार पाडत आहे. परंतु मला आनंद आहे की, माझी मुलं मोठी झाल्यानंतर देवाशी जोडली जातील.(Ivana Trump Will)
हे देखील वाचा- २०१९ रोजी कशा प्रकारे टळले भारत-पाकिस्तान परमाणु युद्ध? अखेरच्या त्या क्षणाची कथा
कुत्र्याला सुद्धा मिळाला हिस्सा
इवानाने आपल्या मुलांच्या संपत्तीसह कुत्र्याला ही संपत्ती दिली आहे. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात असे लिहिले आहे की, माझ्या संपत्तीचा एक हिस्सा माझा पाळीव कुत्रा टाइगर ट्रंम्प आणि त्या सर्व जनावरांच्या नावावर करत आहे जे माझ्या मृत्यूवेळी माझ्यासोबत असतील.