Home » द काश्मीर फाईल्सः काश्मिरी पंडीतांच्या वेदनेची वादग्रस्त कथा…

द काश्मीर फाईल्सः काश्मिरी पंडीतांच्या वेदनेची वादग्रस्त कथा…

by Team Gajawaja
0 comment
The Kashmir Files
Share

1990 च्या दशकात काश्मिर मधून हजारो काश्मिरी पंडीतांना पलायन करावे लागले. हजारोंवर अत्याचार झाले. अनेक महिलांवर बलात्कार झाले. 1990 सालातील ही जखम तमाम काश्मिरी हिंदूच्या मनावर कायम ओली आहे. हीच जखम ‘द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files)’ या चित्रपटतून मोठ्या पडद्यावर येत आहे.  

विवेक अग्निहोत्री लिखीत आणि दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files)’ हा चित्रपट 11 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शीत होत आहे. काश्मिरी पंडीतांचे पलायन, त्यांच्यावर झालेले अत्याचार, आपल्याच देशात आश्रीत म्हणून जगणे आणि या सर्वात झालेले राजकारण अशी ‘द काश्मीर फाईल्स’ची कथा आहे. त्यातील राजकीय रंगामुळे प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादाच्या फेऱ्यात अडकला आहे.  

अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files)’ चित्रपटाची घोषणा जेव्हा विवेक अग्निहोत्री केली तेव्हापासूनच चित्रपट अनेक कारणांनी गाजला. एकतर कोरोनाचं ग्रहण होतचं, पण विवेक अग्निहोत्री यांना या चित्रपटाचे शुटींग काश्मिर येथे करतांना विरोधाचा सामनाही करावा लागला.  

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द ताश्कंद फाइल्स’  चित्रपटही असाच वादात अडकला होता. १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतरावर व्यापक संशोधन करण्यासाठी विवेक अग्निहोत्री काही काळ अज्ञातवासात होते. याच काळात त्यांनी द काश्मीर फाईल्सची स्क्रिप्ट पूर्ण केली. 

14 ऑगस्ट 2019 रोजी अग्निहोत्री यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मिडीयावर जाहीर केले आणि हा चित्रपट सर्वात मोठ्या मानवी शोकांतिकेचा एक प्रामाणिक तपास असेल असे सूचक ट्विटही केले.  तेव्हापासून ‘द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files)’ चित्रपट आणि वाद असे समीकरण झाले.  

अभिनेता अनुपम खेर यांनी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली म्हणून अग्निहोत्रींचे आभार मानले आणि आपल्या मनातील वेदना व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. त्यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अभिनेता योगराज सिंग यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनात हिंदूंच्या विरोधात केलेल्या भाषणानंतर चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागी पुनीत इस्सारला घेण्यात आले.  पण यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.  

====

हे देखील वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’चा ट्रेलर प्रदर्शित तर चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

====

त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती पोटाच्या संसर्गामुळे आजारी झाले. चित्रपटाच्या क्रूमधील एका सदस्यानं आत्महत्या केली. हे सर्व कमी होते की काय शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात दिग्दर्शक अग्निहोत्रीचा पाय फ्रॅक्चर झाला. कोरोनामुळे येत असलेले अडथळे दूर करुन चित्रपटाचे शुटींग खूप लांब खेचले गेले.  त्यातही अग्निहोत्री यांना काश्मिरमध्ये शुटींग करण्यासाठी काही स्थानिकांनी विरोध केला होता. हे सर्व वाद गाजत असताना आता चित्रपट पूर्ण झाल्यावरही हे वाद नव्या स्वरुपात चालूच आहेत.  

कपिल शर्मानं द काश्मीर फाईल्सचे प्रमोशन त्याच्या शो मध्ये करण्यास नकार दिला. या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नसल्याचे कारण कपिलनं पुढे केलं. त्यावरुनही कपिल सोशल मिडीयावर ट्रोल झाला.  विवेक अग्निहोत्रींनीतर याचा संबंध थेट सलमान खान बरोबर लावण्यात आला.  

====

हे देखील वाचा: विद्या बालन आणि शेफाली शाह, ‘जलसा’चा ट्रेलर प्रदर्शित; १८ मार्चला होणार विशेष प्रीमियर

====

यात चित्रपटातील कलाकार अनुपम खेर यांनीही उडी मारली आहे. सोशल मिडीयावर त्यांनी एक कविता शेअर केली आहे. प्रसिद्ध कश्मिरी कवी डॉ. शशी शेखर तोशकानी यांची फैलेगा हमारा मौन ही कविता शेअर करत अनुपम खेर यांनी “27 साल बाद भी हम कश्मिरी पंडित अपने देश में रिफ्यूजी है…” असे कॅप्शनही दिले. त्यामुळे सोशल मिडीयावर बॉलिवूड विरुद्ध बॉलिवूड असे वातावरणही तयार झाले आहे.  

सध्या या चित्रपटाचा प्रोमो सोशल मिडीयावर गाजत आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या या चित्रपटाचा काश्मीर पंडीतांसाठीही एक शो झाला. त्यावेळच्या त्यांच्या भावना अतिशय बोलक्या आहेत. चित्रपटात कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पुष्कर नाथ पंडितच्या भूमिकेत अनुपम खेर, निवेदिता मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, फारुख अहमद दार (बिट्टा कराटे) च्या भूमिकेत आहे.  याशिवाय चिन्मय मांडलेकर, प्रकाश बेलवाडी, पुनीत इस्सार, भाषा सुंबळी, सौरव वर्मा, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव, पृथ्वीराज सरनाईक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.