ITR Documents- जर तुम्हाला एखाद्या प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल आणि तुमच्याकडे आयटीआर कागदपत्र नाहीत तर तुम्ही काय कराल? त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही आयटीआर कागदपत्रांशिवाय अगदी सहज कर्ज बँकेकडून घेऊ शकता. जेव्हा एखादा व्यक्ती कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा कर्ज देणारी बँख किंवा आर्थिक संस्था ते देण्यापूर्वी अर्जाच्या फॉर्मचे मुल्यांकन करते. त्याचसोबत जमा करण्यात आलेली कागदपत्र सुद्धा तपासून पाहते. बँक काही कागदपत्रांपैकी एक असलेले इनकम टॅक्स रिर्टनची सुद्धा मागणी करते. नोकरी करणारा व्यक्ती हा आयटीआर कागदपत्र अगदी सहज उपलब्ध करुन देऊ शकतो.
खरंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातून टॅक्स कापला जातो. मात्र जे लोक नोकरी करत नाही, टॅक्स जमा करत नाहीत अशा लोकांना कर्जासाठी अर्ज करतेवेळी इनकम प्रुफ किंवा आयटीआर सारखी कागदपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी समस्या येते. अशातच त्यांनी कर्ज घेण्यासाठी काय करावे किंवा आयटीआयर व्यतिरिक्त कर्ज कसे घेता येईल हे येथे अधिक जाणून घ्या.

पर्सनल लोन
पर्सनल लोक हे एक असुरक्षित कर्ज आहे. अशातच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी एखादी किंवा कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी गहाण ठेवावी लागत नाही. हे कर्ज व्यक्तीचे उत्पन्न आणि कस्टमर डिटेल (KYC) च्या आधारावर मान्य केले जाते. काही बँका किंवा आर्थिक संस्थांमधून पर्सनल लोनसाठी कमीत कमी उत्पन्न आमि क्रेडिट स्कोरनुसार दिले जाते. अशातच ज्या लोकांकडे रेग्युलर आणि स्थायी उत्पन्नाचे माध्यम आहे. त्यांनी कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले नाही, घेतले असले तरी ते वेळेवर फेडले आहे. आणि जर त्यांनी त्या कर्जाच्या परतफेडीचा पुरावा दिला तर त्यांना कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
खासियत अशी की, वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत, मासिक पगाराचा स्त्रोत अनिवार्य असल्याचे सिद्ध होते. या केसमध्ये कर्ज देणारी आर्थिक संस्था देण्यासाठी मान्य होते. खरंतर त्यांना अशा गोष्टींचा विश्वास असतो की, उत्पन्न मिळणाऱ्या कँडिडेटजवल फंड येत राहिल आणि तो कर्जाची रक्कम अगदी सहज फेडू शकतो.(ITR Documents)
आयटीआर कागदपत्र जमा करणे महत्वाचे
जे कर्ज स्वरोजगारच्या माध्यमातून उत्पन्नावर अवलंबून असतात ज्यांना कर्जासाठी अर्ज करतेवेळी आयटीआयर कागदपत्र जमा करणे महत्वाचे आहे. खासकरुन जेव्हा असे कर्ज अधिक रक्कमेसाठठी कर्ज घेण्यासाठी अर्ज करतात. मात्र पगार असलेला व्यक्तीच्या प्रकरणात असे होत नाही. कारण नोकरीदार व्यक्तीकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फॉर्म १६ सारखी कागदपत्र दाखवावी लागतात. स्वयंरोजगार संबंधित लोकांना उत्पन्नावर कर्ज देणारी आर्थिक संस्था संतुष्ट आहे आणि त्या व्यक्तिची आर्थिक हिस्ट्री योग्य आहे तर आयटीआर कागदपत्राशिवाय पर्सनल लोक अगदी सहज मिळू शकतो.
हे देखील वाचा- घर न घेताच रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ‘हे’ आहेत काही स्मार्ट पर्याय
कर्जासाठी सिक्युरिटीचा वापर
कर्ज घेण्यासाठी जर तुम्ही कोलेटेरल किंवा सिक्युरिटीचा वापर करत असाल तर अशातच तुम्हाला कर्ज अगदी सहज मिळू शकते. अशातच कोणत्याही आयटीआर कागदपत्रांशिवाय ही आर्थिक संस्था कर्ज देण्यास राजी होते. अशा प्रकारचे कर्ज घेतल्यावर जोखिम कमी होते. कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीद्वारे केल्या गेलेल्या गुंतवणीकीच्या रुपात एफडी किंवा म्युचअल फंडासारखे कोलेटेरल असतात. अशा प्रकारची सिक्युरिटी कोलेटेरलच्या बदल्यात कर्जाशिवाय आयटीआर मिळू शकते.