Home » आकाशातून आगीचा वर्षाव होण्याची हीच वेळ

आकाशातून आगीचा वर्षाव होण्याची हीच वेळ

by Team Gajawaja
0 comment
World War III
Share

आशिया खंडातील चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये तणाव वाढत आहे.  1949 मध्ये सामुद्रधुनी कराराच्या मदतीने तैवान चीनपासून वेगळे झाले होते.  आता तेच तैवान चीनला पुन्हा ताब्यात घ्यायचे आहे.  दुसरीकडे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त लष्करी कवायतीमुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन एवढा संतप्त झाला की, त्यानं चक्क अणुहल्ल्याचा सराव केला.  कोरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम किनार्‍यावरून समुद्राच्या दिशेने अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. उत्तर कोरियाच्या या निर्णयामुळे शेजारी दक्षिण कोरिया हादरला आहे.  तर रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात रशिया कधीही अणुशस्त्रांचा वापर करेल,  असा इशारा देण्यात आला आहे.  जागतिक स्तरावरील ही युद्धजन्य परिस्थिती म्हणजे, तिस-या महायुद्धाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  त्यासोबत फ्रान्सचे भविष्यवेत्ते नॉस्ट्राडेमस यांची भविष्यवाणी पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.  आकाशातून आगीचा वर्षाव होईल‘, अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडेमस यांनी काही वर्षापूर्वी केली होती.  ही भविष्यवाणी तिस-या महायुद्धासंदर्भात होती, असा कयास अनेकांचा आहे.  ती भविष्यवाणी आता खरी होणार असल्याची चर्चा आहे.  (World War III)

फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ते नॉस्ट्राडेमस यांची अनेक भाकीत आतापर्यंत खरी ठरली आहेत.  1566 पूर्वी नॉस्ट्राडेमस यांनी 6 हजारांहून अधिक भविष्यवाण्या केल्या होत्या.  त्यामध्ये जगाचा अंत केव्हा होईल आणि त्याचे कारण याबद्दलही नॉस्ट्राडेमस यांनी भाकीत केले आहे. दुसरे महायुद्ध, हिटलरचा उदय आणि अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याची भविष्यवाणी नॉस्ट्राडेमस यांनी आधीच केली होती. त्यामुळेच सध्याची परिस्थिती पाहता जगावर तिस-या महायुद्धाची छाया अधिक गडद झाली आहे.  यातून तिस-या महायुद्धाची ठिणगी कधीही पडेल, आणि नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी खरी ठरेल असे मानण्यात येत आहे. (World War III)

नॉस्ट्रॅडॅमस यांनी तिस-या महायुद्धाबाबत अत्यंत विस्तृत अशी भविष्यवाणी केली आहे.  त्यांनी लिहिले आहे की,  तिसरे महायुद्ध हे सात महिन्याच्या कालावधीत होईल.  या सात महिन्याच्या युद्धात अनेक नागरिकांचा बळी जाईल.  रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यावर नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी चर्चेत आली होती.  मात्र हे युद्ध लांबले गेले.  मात्र आता चीन आणि तैवानमधील परिस्थिती शिवाय उत्तर कोरियाचा आतातायीपणा यामुळे युद्ध कधीही सुरु होईल, अशी परिस्थिती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (World War III) 

नॉस्ट्राडेमस यांच्या अनेक भविष्यवाणींवर अभ्यास सुरु आहे.  मानव लवकरच मंगळावर जाणार असेही भाकीत त्यांनी करुन ठेवले आहे. मंगळावर प्रकाश पडत आहे असे नॉस्ट्राडेमसने लिहिले आहे. या भविष्यवाणीचा अर्थ लावत अनेकांनी मानव मंगळावर पाऊल ठेवणार असा केला आहे.   याशिवाय नॉस्ट्राडेमस यांनी याच वर्षात पोपही बदलले जाणार असे भविष्य सांगितले आहे. नॉस्ट्राडेमसने आपल्या भविष्यवाणीत पोप फ्रान्सिस यांचे शेवटचे खरे पोप असे वर्णन केले आहे. (World War III)

नॉस्ट्राडेमसने आणखी एक भविष्यवाणी केली होती, त्यानुसार जगातील दोन महान शक्ती एकत्र येतील आणि एक नवीन युती तयार होईल.  ही अनोखी युती भारत आणि अमेरिकेची असेल असा अंदाज आता लावण्यात येत आहे.  अलिकडे भारताची जागतिक स्तरावर वाढलेली ताकद अमेरिकाही मान्य करीत आहे.  तसेच भारतातील बाजारपेठेला जागतिक स्तरावर मागणी आहे.  यामुळे अमेरिका भारताच्या बाजुने अनेक मुद्दे उठवत आहे.  हे पाहता नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी खरी ठरण्याच्या बेतात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (World War III) 

=============

हे देखील वाचा : 5 अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटी आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री 

=============

16 व्या शतकातील नॉस्ट्राडेमस हे एक चिकित्सक आणि शिक्षक देखील होते. प्लेगसारख्या साथीच्या आजारांवर त्यांनी उपचार केले आहेत.  हिंदू धर्माबाबत त्यांनी अनेक आशादायक भविष्यवाणी केलेली आहे.  तसेच इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होणार,  त्यांची हत्या, राजीव गांधी पंतप्रधान होणार, त्यांची हत्या आदी नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाणीही प्रत्यक्षात आल्या आहेत. हिटलरचा उदय आणि त्यांची हुकुमशाही,  दुस-या महायुद्धाबाबत नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी खरी ठरली आहे.  तसेच अमेरिकेच्या ट्विन्स टॉवरवरील हल्ला ही भविष्यवाणीही खरी ठरली आहे.  त्याचाच आधार घेऊन आता तिस-या महायुद्धाची नांदी पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  

सई बने 

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.