जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याची जशी उत्सुकता असते, तशीच जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणते, हे जाणून घेणेही उत्सुकतेचे असते. आता नुकतीच या श्रीमंत शहरांची यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार जगातील सर्वात श्रीमंत शहराचा मान अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरानं पटकावला आहे. या शहरात एक-दोन नाही तर तब्बल 58 अब्जाधीश राहत आहेत. तसेच करोडपती हे लाखोंनी आहेत. त्यामुळेच न्युयॉर्कला जगातील सर्वात श्रीमंत शहरातचा मुकुट प्राप्त झाला आहे. (Rich City)

नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार, 2023 सालाचा सर्वात श्रीमंत शहराचा (Rich City) मान अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरानं पटकावला आहे. जागतिक संपत्ती ट्रॅकर हेन्ली अँड पार्टनर्सच्या मते, न्यूयॉर्कमध्ये 3,40,000 लक्षाधीश राहत आहेत. तर अब्जाधीशांची संख्याही अधिक आहेत. न्यूयॉर्कच्या पाठोपाठ टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये अनुक्रमे 290,300 आणि 25,000 रहिवासी लक्षाधीश राहत आहेत. या सर्व व्यक्तिंच्या मालमत्ता या मोठ्या असून त्यांची निवासस्थाने ही महालापेक्षा कमी नाहीत. त्यांच्याकडे नोकरांचा मोठा फौजफाटा असून अत्यंत शाही आयुष्य ही मंडळी जगत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत शहरांचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. त्या सन 2023 मध्ये जगभरातील नऊ विभागांमधील 97 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, युरोप, मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया यामधील शहरांचा समावेश आहे. न्यूयॉर्क, द बे एरिया, लॉस आणि शिकागो या चार शहरांसह अमेरिकेने या श्रीमंत शहरांच्या (Rich City) यादीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. या यादीत चीनची बीजिंग आणि शांघाय ही दोन शहरे देखील आहेत. या यादीत शाही राजघराण्यासाठी प्रसिद्ध असलेले लंडन चौथ्या क्रमांकावर घसरले आहे. लंडनमध्ये वाढत्या महागाईचा फटका बहुधा तेथील श्रीमंतानाही बसला आहे आणि या शहरातील अब्जाधिशांची संख्या घटली आहे. या यादीमध्ये सिंगापूर पाचव्या स्थानावर आहे.
या सर्वात विशेष म्हणजे, सन 2020 मध्ये, लंडन हे करोडपतींसाठी जगातील अव्वल शहर होते. पण गेल्या 20 वर्षांत लंडनची ही लोकप्रियता घसरली आहे. राजघराण्यासंबंधी कुटुंबे या शहरात राहतात, मात्र त्यांचीही संपत्ती गेल्या काही वर्षात कमी झाली असून त्याचा फटका शहराला बसला आहे आणि श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये लंडन पाचव्या स्थानावर फेकले गेले आहे. एकीकडे लंडऩ या शहराचा विचार केला तर या शहरापासून नव्या कंपन्याही दूर राहिल्या. त्याऐवजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरानं आपलं रुपडं या बीस वर्षात पूर्णपणे बदललं आहे. आता हे शहर बिग ऍपल सिटी म्हणून ओळखले जाते. न्यूयॉर्कमध्ये आता 3,40,000 लक्षाधीश आणि 58 अब्जाधीशांची घरं आहेत.
========
हे देखील वाचा : मस्कमुळे चंद्रापर्यंत प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार
========
जगातील सर्वात श्रीमंत शहर निवडण्यासाठी एके नियमावली आहे. त्यासाठी प्रत्येक शहरातील सरासरी कौटुंबिक उत्पन्न मोजले जाते. सरासरी कौटुंबिक उत्पन्न वापरून, सर्वात श्रीमंत शहरे ठरवण्यात येत असले तरी त्याचे आणखीही काही निकष आहेत. या शहरांची लोकसंख्या किमान 500 असणे गरजेचे असते. तेथील लोकसंख्येच्या वयानुसार घरगुती उत्पन्नाचीही नोंद घेतली जाते. आता सर्वाधिक श्रीमंत शहर असे बिरुद मिळवलेल्या न्यूयॉर्क शहराची सामान्य वयोमर्यादा 45 ते 64 आहे. या वयोगटातील व्यक्ती सर्वाधिक कमवणा-या असल्याचे आठळून आले आहे. याशिवाय येथील सामान्य शैक्षणिक पातळीचेही मोजमाप करण्यात आले आहे. या शहरात 50 टक्के नागरिक हे पदवीधारक आहेत. तर 41 टक्के नागरिक उच्चविद्याविभूषीत आहेत. तर फक्त 5 टक्के नागरिक यांनी डिप्लोमा वा त्यासारखे अन्य अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. असाच अहवाल अन्य शहरांच्या बाबतीत काढण्यात आला. त्यातून न्यूयॉर्क हे सरस ठरले आणि जगातील सर्वात श्रीमंत शहर होण्याचा मान त्यांनी पटकावला.
सई बने