Home » आयटी क्षेत्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे २०२३ पर्यंत वर्क फ्रॉम होम, सरकारचा मोठा निर्णय

आयटी क्षेत्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे २०२३ पर्यंत वर्क फ्रॉम होम, सरकारचा मोठा निर्णय

by Team Gajawaja
0 comment
Full time part time job
Share

वाणिज्य मंत्रालयाने नुकत्याच विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच एसईझेड मध्ये काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे वर्क फ्रॉम होम किंवा विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेरील कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची परवानगी दिली आहे. सरकराने एसआयझेड मधील आयटी कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत काही नियमांसह घरातून काम करण्यासाठी परवानगी देण्यासाठी एसईझेडच्या नियमांत संशोधन केले आहे. (IT Employees)

एसईझेड कायद्याच्या संशोधित नियम 43A च्या मते, IT आणि सूचना प्रौद्योगिकी सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी, प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह ऑफसाइट काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना ही घरातून काम किंवा कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची परवानगी दिली आहे.

जुलै मध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची दिली होती सूट
जुलैमध्ये केंद्राने एसईझेडच्या ठेकेदाराच्या रुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली होती. तेव्हा त्याला आर्थिक क्षेत्रात अधिकाधिक एका वर्षाचा कालावधी देण्याची परवानगी दिली होती. तर डब्लूएफएचमध्ये अधिक संख्येने लोकांना परवानगी देण्यासाठी एसईझेडच्या विकाय आयुक्तांच्या नियमांत ही काही प्रमाणात सूट दिली होती.

IT Employees
IT Employees

डब्लूएचएफ मघ्ये करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी बनवावी लागणार
वाणिज्य मंत्रालयाने एका अधिसुचनेत असे म्हटले की, एक टक्का आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून किंवा एसईधेडच्या बाहेर कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. नव्या नियमात असे म्हटले आहे की, एक टक्के कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचीच यादी असेल ज्यांना डब्लूएफएच किंवा एसईझेडच्या बाहेर कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची परवानगी आहे आणि गरज भासल्यास ही यादी विकास आयुक्तांना द्यावी लागेल. (IT Employees)

हे देखील वाचा- एखाद्या वेबसाइटवर तुमचा डेटा Save केलायं हे तपासून पाहण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा

कोणत्याही शुल्काशिवाय द्यावे लागेल सामान
या व्यतिरिक्त नव्या नियमात असे सांगितले आहे की, अशा कर्मचाऱ्यांना अस्थायी आधारावर IGST किंवा सेवा कराच्या पेमेंट शिवाय वर्क फ्रॉम होम किंवा विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील कोणत्याी ठिकाणाहून काम करण्यासाठी लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरण ही कोणत्याही शुल्काशिवाय द्यावी लागतील.

दरम्यान, मूडीज ईएसजी सोल्यूशनने वर्ष २०२२ साी आपल्या नव्या मूल्यांकनात अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकोनॉमिक झोनला ट्रांन्सपोर्ट आणि लॉजिस्टिक क्षेत्रात टॉप रँकिंग दिली आहे. मूडीजने ही रँकिंग जागतिक स्तरावर उदयोन्मुख बाजारपेठांचा विचार करून केली आहे. जागतिक स्तरावर अदानी समूहाने प्रथम स्थान मिळवले होते. रेटिंग एजेंसीने कंपनीच्या मुल्यांकनाच्या एका आधारावर केले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.