जगभरात मंदीचा काळ सुरु आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जगातील काही टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना एक्झिटचा मार्ग दाखवत आहेत. अशातच अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या कंपन्यांनी सुद्धा १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, २० जानेवारीला गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला. त्यामध्ये वर्कफोर्स कमी करण्यासाठी गुगल आपल्या कंपनीतील विविध ब्रांच मधील १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.(IT employees layoffs)
हा काळ असा सुरु आहे की, प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला जात आहे. एका डेटानुसार, भारतासह जागतिक स्तरावर प्रत्येक दिवशी ३ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात आहेत. येणाऱ्या काळात ही स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. कारण काही प्रमुख टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची घोषणा केली आहे. अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, अखेर कंपन्या या वेगाने कर्मचाऱ्यांना कामावरुन का काढून टाकत आहे? याचा भारतावर काय परिणाम होणार?
-कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्यांसाठी समस्या
ग्लोबल मंदीच्या शक्यतेमुळे काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढू शकतात. नोकरी जाण्याचा सर्वाधिक धोका कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असतो. कारण त्यांना अस्थाई रुपात आपल्या गरजेनुसार कामावर ठेवले जाते. अशातच कंपनी जेव्हा आर्थिक स्वरुपात समस्येत पडत तेव्हा कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या लोकांना एक्झिटचा मार्ग दाखवला जातो.
का एक्झिटचा मार्ग दाखवला जातोय?
मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीत ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणयामागील कारण हे नोकरी देणे सांगितले. तज्ञांच्या मते, कोरोनाच्या दरम्यान, बहुतांश लोक आजारी पडायचे. याचा परिणाम कामावर पडू नये म्हणून कंपन्यांनी मोठ्या संख्येने लोकांना कामावर ठेवले. या व्यतिरिक्त लॉकडाउनमध्ये काही कंपन्यांनी आपल्या डिजिटल मार्केटिंगवर ही अधिक जोर दिला. यासाठी सुद्धा काही लोक ठेवली गेली.
दरम्यान, काही कंपन्यांमध्ये लॉकडाउन मध्ये ऑनलाईन कामाच्या वाढत्या मागणीमुळे अधिक लोकांना ठेवले गेले. आता मार्केट मध्ये घसरण आल्याने कंपनीला त्यांना सांभाळणे शक्य होत नाही आहे. अशातच ते अतिरिक्त लोकांना कामावरुन काढून टाकत आहेत. कंपन्या वाढत्या आर्थिक मंदीदरम्यान आपला खर्च कमी करण्यासाठी सातत्याने लोकांना कामावरुन काढून टाकत आहे.
यापूर्वी लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होमच्या कारणास्तव कंप्युटर आणि लॅपटॉर सेगमेंटच्या विक्रीत ही खुप वाढ झाली होती. मात्र आता मार्केट घसरले आहे.(IT employees layoffs)
जागतिक मंदी मोठे कारण
जागतिक मंदी हे कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यामागील मोठे कारण सांगितले जात आहे. कोरोना महारोगामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. आता रशिया-युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ही अर्थवस्थेतेत मागणी आणि पुरवठ्यात फार मोठा बदल झाला आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम चीन, ब्रिटेन, अमेरिका, भारत आणि जापानवर पडला आहे.
२०२३ मध्ये किती नोकर कपात झाली
वर्ष २०२३ च्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत १६६ टेक कंपन्यांनी ६५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. मायक्रोसॉफ्टच्या १० हजार कर्मचाऱ्यांना एक्झिट दाखवण्यापूर्वी अॅमेझॉनने १ हजार भारतीय कर्मचाऱ्यांसह ग्लोबली एकूण १८०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले.
हे देखील वाचा- अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट नंतर आता गुगलकडून कर्मचाऱ्यांना दाखवला जातोय बाहेरचा रस्ता
भारतावर काय होणार परिणाम?
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने भारतातील बेरोजगारीचा डेटा जारी केला आहे. त्यानुसार आपल्या देशात बेरोजगारीचा दर २०२२ च्या डिसेंबर महिन्यात वाढून ८.३० टक्क्यांवर पोहचला होता. तोच गेल्या १६ महिन्यांमध्ये सर्वाधिक होता. मोठ्या स्तरावर नोकरीवरुन एक्झिटचा मार्ग दाखवत असल्याने लोकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढले आहे. एका डेटानुसार, भारतासह ग्लोबल स्तरावर प्रतिदिन ३ हजार कर्माचाऱ्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागत आहे.