Home » ISRO कडून सिंगापुरच्या दोन सॅलेटाइटचे प्रक्षेपण, वातावरणाची देणार माहिती

ISRO कडून सिंगापुरच्या दोन सॅलेटाइटचे प्रक्षेपण, वातावरणाची देणार माहिती

by Team Gajawaja
0 comment
ISRO PSLV C55
Share

भारतीय अंतराळ संशोधन म्हणजेच इस्रोने आणखी एक यश गाठले आहे. भारताच्या या अंतराळ संस्थेने नुकतेच दोन सिंगापुरचे उपगृह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. इस्रोने ही माहिती देत असे म्हटले की, दोन सिंगापुर उपग्रह घेऊन जाणारे PSLV C55 रॉकेट हे अंतराळ केंद्रातून बाहेर काढले गेले. हे मिशन न्यूस्पेस इंडिया लिमिडेट यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड ही इस्रोची व्यावसायिक शाखा आहे. (ISRO PSLV C55)

इस्रोने असे म्हटले की, PSLV C55 रॉकेटने प्राथमिक उपग्रह म्हणून TeleOS-2 आणि Lumalite-4 सह-प्रवासी उपग्रह म्हणून उड्डाण केले आहे. यांनी दोन्ही ही सॅटेलाइट हे पृथ्वीच्या खालच्या भागात यशस्वीरित्या स्थापन केले आहेत.

PSLV म्हणजेच पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हिकल भारतीय स्पेस एजेंसी, इस्रो द्वारे डिडाइन करण्यात आलेले एक अत्यंत यशस्वी लॉन्च वाहन आहे.याच्या माध्यमातून सिंगापुरच्या दोन सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आले. सतीश धवन अंतराळ केंद्रात २२.५ तासांची उलट मोजणी केली गेली. मिशन अंतर्गत चेन्नई पासून जवळजवळ १३५ किमी दूर असलेले अंतराळ केंद्रापासून ४४.४ मीटर लांब रॉकेट दोन्ही सॅटेलाइटला घेऊन पहिल्या लॉन्च पॅडवरुन रवाना झाले आणि त्याने दोन्ही सॅटेलाइटला योग्य कक्षेत स्थापन केले.

मिशनची खासियत
सिंगापुरसाठी दोन्ही सॅटेलाइट फार महत्वाचे आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या सॅटेलाइचे उद्देश सिंगापुरच्या ई-नेविगेशन, समुद्राची सुरक्षितता वाढणे आणि जागतिक शिपिंग समुदायाला लाभ मिळवून देणे. दोन्ही सॅटेलाइटचे संयुक्त वजन हे जवळजवळ ७५७ किलोग्रॅम आहे. TeleOS-2 सॅटेलाइटला DSTA आणि ST इंजिनिअरिंग मध्ये झालेल्या करारानुसार तयार केले आहे. सिंगापुर आपल्या सॅटेलाइच्या माध्यमातून हॉटस्पॉटवर लक्ष ठेवणे, विमान अपघातादरम्यान शोध आणि बचाव कार्यांसाठी वापर करणार आहे. (ISRO PSLV C55)

हे देखील वाचा- गुहेत ५०० दिवस घालवणारी बिएट्रिज नक्की आहे कोण?

PSLV C55 ची खासियत
इस्रोच्या मते पीएसएलवी सी-५५ सिंगापुरच्या सॅटेलाइटला अंतराळात पाठवण्यासाठी न्यूस्पेस इंडिया लिमिडेट द्वारे तयार करण्यात आले आहे. हे धुव्रीय उपग्रह प्रक्षेपण वाहन स्वत:त एक खास आहे. याच्या द्वारे डिझाइन या व्हिकला रिमोट ऑपरेशन, नेविगेशन, कम्युनिकेशन आणि मोठ्या अंतराळ मिशनसाठी यशस्वीपणे तैनात करण्यात आले आहे. या व्हिकलचे आंतरराष्ट्रीय बाजारात खुप कौतुक केले गेलेय.कारण याच्या माध्यमातून जगभरातील शेकडो सॅटेलाइट इस्रोने अंतराळात पाठवले आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.