Home » ISRO वनबेव साटेलाइट लॉन्च करणार, इंटरनेट सर्विसला होणार फायदा

ISRO वनबेव साटेलाइट लॉन्च करणार, इंटरनेट सर्विसला होणार फायदा

by Team Gajawaja
0 comment
ISRO OneWeb Mission
Share

इस्रोने सातत्याने आपल्या अभियानात यश मिळवले आहे. अशातच आता येत्या २६ मार्चल वनबेव सेटेलाइट्सच्या दुसऱ्या बॅचला लॉन्च केले जाणार आहे. हे श्रीहरिकोटा येथून LVM-III रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केले जाणार आहे. इस्रोने वनवेबसह सॅटेलाइट्सला लॉन्च करण्यासाठी एक हजार कोटींचा करार केला आहे. (ISRO OneWeb Mission)

इस्रोची ही लॉन्चिंग जर यशस्वी झाल्यास तर भारती एंटरप्राइज समर्थित ब्रिटेन स्थित कंपनी स्पेसमध्ये ६०० पेक्षा अधिक लोअर बर्थ ऑर्बिट सेटेलाइट्ससच्या कान्स्टलॅशनला पूर्ण करणार आहे. ज्यामुळे जगातील प्रत्येक कोपऱ्यात स्पेस आधारित ब्रॉडबँन्ड इंटरनेट सर्विस देण्यासाठीच्या योजनेत मदत होणार आहे.दरम्यान, वनवेबचे असे म्हणणे आहे की या वर्षाच्या अखेर पर्यंत आंतराळातून ब्रॉन्डबँन्ड इंटरनेट सुविधा जगभरात सुरु केली जाईल. सध्या वनवेब ५० डिग्री उत्तर अक्षांशाच्या वर असलेले देश अलास्का, कॅनडा, ग्रीनलँन्ड, ब्रिटेन आणि उत्तर युरोपात आंतराळातून इंटरनेटची सुविधा देतो. वनवेब या वर्षाच्या अखेर पर्यंत भारतात सुद्धा ही सेवा सुरु करण्याचा विचार करत आहे. मात्र यासाठी सर्व नियामक मंजूरीची प्रक्रिया होणे शिल्लक आहे.

इस्रोने नुकत्याच आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, LVM-M3/वनवेब इंडिया-२ मिशन लॉन्च होणार आहे. श्रीहरिकोटा येथून दुसऱ्या लॉन्चिंग पॅड SDSC-SHAR येथून २६ मार्चला याची लॉन्चिंग होणार आहे. वनवेबच्या ३६ सॅटेलाइट्स फ्लोरिडातून १६ फेब्रुवारीलाच भारतात आले होते. श्रीहरिकोटातून होणारी लॉन्चिंग वनबेबच्या १८ व्या लॉन्चिंगमध्ये ३६ सॅटेलाइट्सला सोडले जाणार आहे. तसेच हे सॅटेलाइट्स ब्रिटेनस्थित कंपनीच्या ५८२ सॅटेलाइट येथील ग्रुपमध्ये सहभागी होती. यापूर्वी ९ मार्चला स्पेसएक्सला फाल्कन-९ रॉकेटने ४० वनवेब सॅलेटाइट्सला आंतराळात स्थापित केले होते. भारतीय स्पेस एजेंसी इस्रोने गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात श्रीहरिकोटा आंतराळ केंद्रावरुन वनवेब पूर्वी ३६ सॅटेलाइट्सची यशस्वी लॉन्चिंग केली होती. (ISRO OneWeb Mission)

हे देखील वाचा- कोहिनूर आता प्रदर्शनात दिसणार…

असे मानले जात आहे की, लॉन्चिंगवेळी वातावरण सामान्य असेल तर इस्रोच्या LVM3 वनबेवच्या ३६ सॅटेलाइट्सला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित केले जाईल. असे दुसऱ्यांदा होणार आहे की, जेव्हा वनबेव भारतीय स्पेस एजेंसी इस्रोच्या सॅटेलाइट लॉन्चिंग सर्विसचा वापर करत आहे. गेल्या वर्षात २३ ऑक्टोंबरला वनबेवच्या आधी ३६ सॅटेलाइट्स श्रीहरिकोटा येथून लॉन्च केले होते. इस्रोच्या कर्मशियल फर्म NSIL ने वनबेवच्या ७२ सॅटलाइट्सला दोन टप्प्यात लॉन्च करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. वनबेवचा पहिला बॅच गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात लॉन्च केला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.