१९६० असे दशक होते जेव्हा भारताने आंतराळात आपली ओळख बनवण्याचा प्रवास सुरु केला होता. देशातील महान वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली इंडियन नॅशनल कमेटी फॉर स्पेर रिसर्चची स्थापना करण्यात आली. देशातील पहिला सॅटेलाइट आर्यभट्टच्या रुपात लॉन्च करण्यात आला होता. तेव्हा भारताच्या धरतीवरुन पहिले रॉकेट १९६३ रोजी लॉन्च केले गेले. स्पेस सेक्टरच्या इतिहासात भारतासाठी हे माइल्डस्टोन मानले जात होते. तेव्हापासून ते आतापर्यंत भारताने काही मोठ्या आंतराळ अभियान यशस्वी करण्यासाठी काही उत्तम कामगिरी केली. तसेच आंतराळात काही यशाचे झेंडे ही लावले. भारतीय आंतराळ संघटना (ISRO) चे यामध्ये फार मोठे योगदान राहिले आहे. खासकरुन मिशन गगनयान आणि चंद्रयान. (ISRO Big Achievements 2022)
खरंतर वर्ष २०२२ मध्ये सुद्धा इस्रोने खासगी रॉकेट लॉन्च करण्यासह काही विक्रम प्रस्थापित केले आणि भारताला सर्वशक्तीशाली बनवले आहे.
-सॅटेलाइट EOS-04
१४ फेब्रुवारी २०२२ रोजी इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन आंतराळ केंद्र पीएसएलवी-सीच्या माध्यमातून EOS-04 चे यशस्वीपणे प्रक्षेपण केले होते. त्याचसोबत अन्य दोन लहान राइडशेयर सॅटेलाइट्स INS-2TD आणि INSPIRESat-1 सुद्धा आंतराळात पाठवले गेले. सतीश धवन आंतराळ केंद्राचे हे ८० वे प्रक्षेपण आंतराळ मिशन होते. तर PSLV चे ५४ वे उड्डाण होते.

-Vikram-S रॉकेट लॉन्च
१८, नोव्हेंबर २०२२ रोजी इस्रोने खासगी रुपात विकसित करण्यात आलेले पहिले Vikram-S रॉकेट लॉन्च केले होते. हे देशातील पहिलेच खासगी स्पेस कंपनीचे आंतराळ स्टार्टअप स्काईरुट एयरोस्पेसचे रॉकेट आहे. जे खासगी स्पेस इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी माइल्डस्टोन म्हणून नावारुपाला आला. विक्रम-एस रॉकेट चेन्नईतील शहर सतीश धवन आंतराळ केंद्रातून १८ नोव्हेंबरला सकाळी लॉन्च करण्यात आले होते.
-RH200 चे यशस्वीपणे परिक्षण
२४, नोव्हेंबर, २०२२ रोजी तिरुवनंतपुरम येथील थुंबा तटावरुन RH200 रॉकेटचे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. हे इस्रोचे सातत्याने २०० वे यशस्वी परिक्षण होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या उपस्थितीतील हे परिक्षण ऐतिहासिक होते.(ISRO Big Achievements 2022)
हे देखील वाचा- भारतीय नौसेनेला मिळाले INS Mormugao, जाणून घ्या खासियत
-एकत्रित ९ सॅटेलाइट प्रक्षेपित
इस्रोसाठी २६ नोव्हेंबर २०२२ ची तारीख गौरवशाली इतिहासात दाखल झाली, जेव्हा त्यांनी ९ सॅटेलाइट लॉन्च केले. तमिळनाडूतील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन आंतराळ केंद्रातून PSLV-C54 च्या मदतीने Ocean-Sat 3 व्यतिरिक्त एका उपग्रहासह ८ सॅटेलाइटला यशस्वीपणे लॉन्च केले गेले. EOS-06 मिशन अंतर्गत हे प्रक्षेपण केले गेले. वर्ष २०२२ मधील इस्रोचे हे अखेरचे मिशन होते.