इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायन नंतर सर्व जगातच अणुयुद्धाची भीती व्यक्त होत आहे. इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यात जबर नुकसान झाले आहे. इराणचे सर्वोच्च नेते खोमोनी यांचे सल्लागार, इराणचे सेनाप्रमुख आणि दोन अणुशास्त्रज्ञ या हल्ल्यात मारले गेले आहेत. त्यामुळे चिडलेल्या इराणनं इस्रायलला खून का बदला खून, असा इशारा देत जामकरण मशिदीवर लाल झेंडा लावला आहे. म्हणजेच इराण आता इस्रायलविरोधात बदल्याची कारवाई सुरु करणार आहे. (Israel)
मात्र या सर्वात इराणवर सर्वात मोठा हल्ला करणा-या इस्रायला या सर्वांची कल्पना नसेल का, हा प्रश्न विचारण्यात येणार आहे. इस्रायलनं हा हल्ला गुप्तचर संस्था मोसादच्या सहकार्यांने केला. मोसादनेच या सर्व हल्ल्याचे नियोजन केले. गेल्या वर्षभरापासून यावर काम करण्यात येत होते. अशावेळी एवढामोठा हल्ला झाल्यावर इराण आपल्यावर कारवाई करणार, अशी अटकळही इस्रायला होती. त्यामुळेच या हल्ल्याचा कट तयार करतांना इस्रायलनं स्वतःचा बचाव कसा करायचा याचा प्लॅनही तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. इऱाणनं या युद्धाचा शेवट आम्ही करणार असं सांगितलं असलं तरी त्यांची युद्धक्षमता 25 टक्क्याहून अधिक नष्ट करण्यात आली आहे. यासर्वात मोसादनं केलेल्या कामगिरीमुळे जगभर पुन्हा मोसादचा दबदबा निर्माण झाला आहे. (International News)
इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायन नंतर मोसाद या इस्रायल राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव पुन्हा सर्वोमुखी झाले आहे. गेल्याच आठवड्यात मोसादनं लेबनान मध्ये हिजबुल्लाहवर केलेल्या पेजर अटॅकची माहिती देण्यात आली होती. यासाठी मोसादनं हिजबुल्लाहच्या प्रत्येक सदस्याची बारीक सारीक माहिती गोळा केली होती. यातून जास्तीत जास्त हिजबुल्लाचे सदस्य ठार होतील किंवा गंभीर जखमी होतील, अशी योजना तयार करण्यात आली आणि ती यशस्वीही करण्यात आली. यानंतर मोसादची सर्वात मोठी कामगिरी म्हणून ऑपरेशन रायझिंग लायन या मोहीमेकडे बघितले जात आहे. (Israel)
इस्रायलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली माहिती परदेशातून गोळा करण्याची कारगिरी मोसादकडे असते. पण यासोबतच मोसाद अनेक गुप्त कारवाया देखील करते, ज्यात हेरगिरी, हत्या आणि दहशतवादविरोधी कारवाया यांचा समावेश आहे. देशाच्या संरक्षणासाठी जे जे करता येईल, ते मोसाद करते. वास्तविक इस्रायलमध्ये मोसादसह अन्य दोन गुप्तचर संस्था आहेत. मात्र शिन बेट आणि अम्मान या संस्थाचे फारसे नाव पुढे येत नाही. आता ज्या ऑपरेशन रायझिंग लायनचा डंका अवघ्या जगात गाजत आहे, ते ऑपरेशनही मोसादच्या मदतीनं आखलं गेलं आहे. यापूर्वीही याच नावानं झालेल्या मोहीमेमध्ये इथिओपियामध्ये रहात असलेल्या इस्रायलच्या नागरिकांना पुन्हा इस्रायलमध्ये आणण्याची जबाबदारी मोसादनं पार पाडली होती. 1980 च्या दशकाच्या मध्यात इथिओपियामध्ये राहणाऱ्या ज्यूंना इस्रायलमध्ये स्थलांतरित होण्यास अडचणी येत असताना याच नावानं कारवाई करण्यात आली होती. आता 45 वर्षानं पुन्हा याच नावानं इराणमधील अणुकेंद्र नष्ट करण्यासाठी मोहीम आखण्यात आली. (International News)
इराणवर हल्ला करण्यासाठी मोसादच्या खास एजंटची एक टीम पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख बघेरी आणि आयआरजीए प्रमुख हुसेन सलामी यांचा मृत्यू झाला. सोबत दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञांसह अन्य चार शास्त्रज्ञही मारले गेले आहेत. इराणच्या राजधानी तेहरानमध्ये या सर्वांना मारण्यात आले. एवढ्या परफेक्ट कामगिरीचे सर्व श्रेय मोसादकडेच जाते. मोसादने यापूर्वीही इराणवर अनेक जखमा केल्या आहेत. 12 नोव्हेंबर 2011 रोजी इराणमधील तेहरानजवळील एका गुप्त क्षेपणास्त्र ठिकाणी मोठा स्फोट झाला. (Israel)
===========
हे देखील वाचा : China : चीनच्या आणखी एका जैविक शस्त्राची जगभर दहशत !
Plane Crash: विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा Mayday कॉल, मात्र Mayday म्हणजे काय?
===========
या स्फोटात, इराणच्या शेहाब नावाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे जनक, जनरल हसन तेहरानी मोघदम मारले गेले. या क्षेपणास्त्राद्वारे इराणने अमेरिकेतील अनेक शहरांना लक्ष्य केले होते. पण मोसादनं या क्षेपणास्त्राचा सर्व कार्यक्रमच निष्फळ केला. या हल्ल्यासाठीही मोसादनं वर्षभराचं नियोजन केलं होतं. आता तसेच नियोजन मोसादनं पुन्हा एकदा केलं आहे. या हल्ल्यासाठी मोसादची एक टीम गेल्या वर्षभरापासून इराणमध्ये तळ ठोकून होती. इराणच्या गुप्तचर विभागाला याची साधी कल्पनाही आली नाही. बरोबर शुक्रवारची सकाळ त्यांनी या हल्ल्यासाठी निवडली. यावेळी त्यांचे लक्ष असलेले शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी हे त्यांच्या घरी होते. वर्षभर या अधिका-यांवर पाळत होती, त्यातून त्यांचे स्थळ निश्चित झाल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यातही हा हल्ला इराणमधूनच करण्यात आला. या सर्वात मोसादची कामगिरी पुन्हा चर्चेत आली आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics