ज्या लोकांना फिरण्याची आवड आहे ते विविध ठिकाणी भेट देण्यास उत्सुक असतात. मात्र जगात अशी काही ठिकाणं आहेत जेथे जाण्यास अजिबात परवानगी नाही. याच काही हॉन्टेंड ठिकाणांपैकी मेक्सिको मधील ‘ला इस्ला डे ला म्युनेकस’ बेट. या बेटावर खुप झाडं-झुडपं आहेत. मात्र रात्र होताच येथे कोणची जायची हिंमत होत नाही. कारण येथील बेटावरील प्रत्येक झाडांवर विचित्र पद्धतीने बाहुल्या लटवकल्या गेल्या आहेत. ज्या तेथे येणाऱ्यांना थांबवतात. (Island of dead dolls)
खरंतर लहान मुलं बाहुल्यांना पाहून त्यांच्याकडे धाव घेतात. मात्र या ठिकाणी हजारो बाहुल्या असून तेथे लहान मुलं तर सोडाच मोठी माणसं ही जाण्यास घाबरतात. खासकरुन या रात्रीच्या वेळी या बाहुल्यांजवळ जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. १९९० मध्ये जोचिमिको कनालच्या स्वच्छतेदरम्यान, ते लोकांच्या नजरेत आले होते. त्यानंतर एका दशकानंतर पुन्हा चर्चेचा विषय बनला.
काय आहे या बाहुल्यांमागील सत्य?
शासकीय कागदपत्रांवर हे बेट भुताटकी असल्याचा उल्लेख नाही. मात्र लोकांचे असे मानणे आहे की, या बाहुल्यांमध्ये एका लहान मुलीची आत्मा असते. वर्ष २००१ पर्यंत डॉन जूलियन सँटाना बरेरा ‘ला इस्ला डे ला म्युनेकस’ आयलँन्डचा एक केयरटेकर ही होता. तो तेथे एकटाच रहायचा. असे सांगितले जाते की, जूलियन याला येथे एका लहान मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला होता.पण तिचा श्वास सुरु होता. तो त्या मुलीला बचावू शकला नाही आणि त्या घटनेनंतर त्याला तेथे एक बाहुली सुद्धा मिळाली. असे सांगितले जाते की, त्याने त्या बाहुलीला झाडावर टांगले. त्यानंतर एका मागून एक बाहुल्या तेथे मिळाल्या. त्याने मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून खुप बाहुल्या झाडावर लटकवल्या. त्याचा स्वत:चा मृत्यू २००१ मध्ये झाला. (Island of dead dolls)
हे देखील वाचा- ‘येथे’ स्मशानभूमीत मृत शवासाठीही द्यावे लागते भाडे, अन्यथा…
रात्र होताच बोलू लागतात बाहुल्या
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, स्थानिक लोक भूत-प्रेतांवर विश्वास ठेवतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, मुलीचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला तेथेच जूलियन याचा सुद्धा मृत्यू झाला. तेथे आता बाहुल्यांनी आसरा घेतला आहे. येथे येणाऱ्या लोकांना त्या बोलावतात. रात्रीच्या वेळी बोलू ही लागतात. दिवसा त्यांच्या डोळ्यांची भुभूळं ही हलतात. बेटावर असलेल्या बाहुल्यांची स्थिती पाहून तेथे जाण्याची हिंमत ही दूरच पण विचार ही करु शकत नाहीत. कारण काही बाहुल्यांची डोकं तुटलेली तर काहींना भुताटकी रुप दिलेले आहे.