ब्रिटन आणि त्याच्या आसपास असलेल्या बेटांमध्ये शेख यासर अल हबीब नावाच्या मौलवीच्या मनसुब्यानं धडकी भरवली आहे. शेख यासर अल हबीब हा मौलवी असून विद्वेषपूर्ण भाषणं देण्यासाठी तो ओळखला जातो. याच मौलवीनं आता चक्क एक छोटेसे ब्रिटीश बेट विकत घेऊन ते इस्लामिक राज्य बनवण्याची योजना आखली आहे. यासाठी त्याने 3 दशलक्ष पौंड पेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. यासाठी शेख यासर अल-हबीबच्या अनुयायांनी स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्याजवळ असलेल्या तोर्सा या बेटाची पहाणी केली आहे. (Sheikh Yasser Al Habib)
तसेच या बेटाचा एक व्हिडिओ तयार करुन इस्लामिक देश अशी जाहीरातही तयार केली आहे. तोर्सा हे दुर्गम बेट आहे. तिथे जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो. असे दुर्गम बेट विकत घेऊन शेख यासर अल हबीब तिथे इस्लामिक स्टेट निर्माण करणार असून शरीयत कायदा लागू करणार आहे. शेख यासर अल हबीब हा त्याच्या भाषणांमुळे कायम वादात सापडलेला आहे. २० वर्षांपूर्वी कुवेतमधून पळालेल्या या शेख यासर अल हबीबला ब्रिटननं आश्रय दिला होता. मात्र आता याच निर्णयावर ब्रिटनला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. (Sheikh Yasser Al Habib)
ब्रिटनजवळील एका बेटावर इस्लामिक स्टेट तयार करण्यासाठी शेख यासर अल हबीब हा कट्टरपंथी धर्मगुरूं प्रयत्न करत आहेत. हे बेट विकत घेऊन त्यात त्याला शरिया कायदा लागू करायचा आहे. त्यातून युरोपमध्ये शरिया कायदा असलेला देश तयार करण्याचा त्याचा इरादा आहे. यासाठी स्कॉटलंडजवळील एका बेटाच्या मालकासोबत बोलणी सुरु आहेत. अर्थात या बेटाच्या आसपास असलेल्या बेटांनी या मौलवीच्या योजनेमुळे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे बेट ज्या व्यक्तीचे आहे, त्यानं याची विक्री शेख यासर अल हबीबला करायला नकार दिला आहे. हे बेट विकत घेतल्यावर अमेरिका आणि कॅनडामधील एक बेटही विकत घ्याचये अल हबीबनं जाहीर केले होते.
स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील तोर्सा हे बेट विकत घेण्यासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असतांनाच त्यामागील अल हबीबचा हेतू जाहीर झाला. हे बेट विकत घेण्यापूर्वी अल हबीबच्या अनुयायांनी एक व्हिडिओ तयार केला. त्यात या बेटाचा उल्लेख ‘इस्लामिक स्टेट’ असा करण्यात आला. येथे शरिया कायद्याचे पालन केले जाईल. या बेटावर शाळा, हॉस्पिटल आणि मशीद बांधण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळेच या बेटाच्या मालकांनी ऐनवेळी या विक्री व्यवहारातून माघार घेतली. (Sheikh Yasser Al Habib)
अल हबीबच्या अनुयायांना ‘महदी सेवक संघ’ म्हणतात. त्यांना जे बेट विकत घ्यायचे आहे, ते १.६ किमी लांबीचे बेट आहे. गेल्या ८५ वर्षांपासून हे बेट निर्जन असून ते स्लेट बेट समूहात येते. या निर्जन बेटाची विक्री करण्याची जाहीरात त्याच्या मालकांनी गेल्या वर्षी दिली होती. बेटाची किंमत १५ लाख पौंड, म्हणजेच १६.१६ कोटी होती. हे तोर्सा बेट निर्जन स्थळी आहे. त्याच्यावर जाण्यासाठीही कोणत्याही सुविधा नाहीत. तोर्सा शेजारी असलेल्या लुईंग बेटावरून खाजगी बोटीने या बेटावर जाता येते. तोर्सा बेटाचा लष्करी प्रशिक्षणासाठी वापर केला जात असे. मात्र इंग्लडची राजेशाही संपली आणि तोर्सा निर्जन बेट झाले. याच बेटावर अल हबीबची नजर आहे.
==================
हे देखील वाचा : पत्नीची हौस पती थेट तुरुंगात !
================
शेख यासर अल हबीब हा कायम वादग्रस्त मौलवी म्हणून ओळखला गेला आहे. २० वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये आश्रयास आलेल्या या मौलवीनं दक्षिण बकिंगहॅमशायरमधील फुलमार या छोट्याशा गावाला आपले ‘जागतिक मुख्यालय’ बनवले आहे. त्याला फुलमारचा मुल्ला म्हणून ओळखले जाते. ब्रिटन आणि अरब जगतात शिया आणि सुन्नी यांच्यात जातीय द्वेष भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आता तोर्सा बेटाच्या खरेदी व्यवहारात त्याचे नाव आल्यानं ब्रिटनमधील पोलीसांनी अधिक चौकशी सुरु केली आहे. (Sheikh Yasser Al Habib)
या भागातील कौन्सिलरने अल हबीबबाबत गृह विभागाला सतर्कता ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच भविष्यात अशा कोणत्याही योजनांबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अल हबीब सारखे लोक काहीही करू शकतात आणि दंगली भडकवू शकतात, असाही शेरा लावण्यात आला आहे. सध्या हबीब मिलिटरी स्टाइल ट्रेनिंग कॅम्प चालवत आहे. केवळ अरबी भाषेत उपदेश करणाऱ्या या मौलवीने ब्रिटनमधील ४००००० शिया आणि जगभरातील लाखो लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी जमा केले आहेत. सुन्नी धर्माचा अपमान केल्याप्रकरणी अल-हबीबने कुवेतमध्ये जवळपास तीन महिने तुरुंगात काढले आहेत. त्याच्या वाढत्या कारवाया पहाता ब्रिटनला त्याला आश्रय दिल्याबददल पश्चाताप वाटत आहे.
सई बने