सध्या सगळीकडे एकच चर्चा रंगत आहे आणि ती म्हणजे, युरीन थेरपीची. ऐकून थोडे विचित्र वाटले ना…? आणि प्रश्न देखील पडला असेल की ही युरीन थेरपी नक्की आहे तरी काय? सोशल मीडियावर परेश रावल यांचा एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे, ज्यात ते युरीन थेरपीबद्दल सांगत आहे. या व्हिडिओनंतर सगळीकडे फक्त या युरीन थेरपीबद्दलच प्रश्न विचारले जात आहे. (Urine Therapy)
व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये परेश रावल (Paresh Rawal) यांनी सांगितले की, त्यांना एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे ते रुग्णालयात भरती होते. त्यांना या आजारपणामुळे त्यांचे करियर धोक्यात जाईल अशी भीती देखील वाटत होती. त्यातच एक दिवस दिवंगत अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगन त्यांना रुग्णालयात भेटायला आले होते. परेश यांनी त्यांच्या दुखापतीबद्दल सांगितले तेव्हा वीरू देवगन यांनी त्यांना एक आगळा वेगळा आणि विचित्र सल्ला दिला. (Health News)
वीरू देवगण यांनी सांगितले की, सकाळी उठल्यानंतर त्यांनी स्वतःचे मूत्र प्यावे. सर्वच फायटर असे करतात. यामुळे तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत होईल. यासोबतच वीरू देवगन यांनी परेश यांना हे देखील सांगितले की, त्यांनी दारू, तंबाखू आणि मटणापासून दूर राहा आणि साधे अन्न खा. त्यांचा सल्ला ऐकून परेश यांनी असेच केले. परेश रावल यांनी सल्ला फॉलो केला. (Marathi)
परेश रावल यांनी हा उपाय पूर्ण १५ दिवस पाळला. १५ दिवसांनी जेव्हा त्यांनी नवीन एक्स-रे काढला आणि त्याचा रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. एक्स-रे मध्ये हाडावर एक पांढरी रेषा दिसत होती, जी हाड जोडल्याचे लक्षण होते. परेश रावल यांना झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी सामान्यपणे अडीच ते तीन महिने लागतात, परंतु परेश रावल केवळ दीड महिन्यात पूर्णपणे बरे झाले होते. परेश यांनी या आजारपणातून बरे होण्याचे श्रेय युरीन थेरपीला दिले. (Marathi Top Stories)
==========
हे देखील वाचा : High Heels : हाय हिल्स वापरणे म्हणजे ‘या’ आजारांना आमंत्रण देणे
==========
अनेकांनी या युरीन थेरपीबद्दल ऐकले असेल. आपले दिवंगत पंतप्रधान मोरारजी देसाई हे देखील रोज सकाळी त्यांची युरीन प्यायचे. ऐकायला खूपच विचित्र असले तरी आपल्या देशात युरीन पिण्याची पद्धत हजारो वर्षे जुनी आहे. यालाच आज युरिन थेरपी, यूरोफॅगिया किंवा यूरोथेरपी या नावांनी ओळखले जाते. जगाच्या काही भागात मूत्राचा आयुर्वेदिक वापरही केला जातो. मग आता प्रश्न पडतो की, ही युरीन थेरपी खरंच लाभदायक आहे का? आणि कोणत्या आजारांमध्ये युरीन थेरपी फायदेशीर ठरते? (Social News)
युरीन हा आपल्या शरीरातून बाहेर टाकला जाणारा टाकाऊ पदार्थ आहे. त्यात युरिया, इलेक्ट्रोलाइट्स अर्थात सोडियम, क्रिएटिनिन आणि इतर घटकांसह पाणी असते. काही संस्कृतींमध्ये धार्मिक किंवा आरोग्याच्या कारणांसाठी मूत्र पिण्याची परंपरा आहे. आजही काही धार्मिक किंवा निसर्गोपचार गट मूत्र पिण्यास सांगतात. हजारो वर्षांपूर्वी लोकांचा विश्वास होता की आपली युरीन आपण प्यायल्यास अनेक आजार बरे होतात. भारतासोबतच इतरही देशांमध्ये ही परंपरा फॉलो केली जात असल्याचे सांगितले जाते. (Marathi Latest News)
प्राचीन रोम, ग्रीस आणि इजिप्तमधील अहवाल दर्शविते की मुरुमांपासून कर्करोगापर्यंत सर्व गोष्टींवर उपचार करण्यासाठी मूत्र थेरपी वापरली जात होती. एवढेच नाही तर चीनसारख्या मोठ्या आणि बलाढ्य देशात तर यावर आधारित एक संस्था देखील आहे. जी लोकांना युरीन पिण्यासाठी प्रोत्साहित करते. चायना युरिन थेरपी असोसिएशन असे या संस्थेचे नाव असून, वुहान शहरात असलेली ही संस्था लोकांना स्वतःचे मूत्र पिण्यास प्रोत्साहित करते. या संस्थेने सांगितले आहे की, युरीन पिण्यामुळे डोळ्यांचे आजार, टक्कल पडणे, बद्धकोष्ठता, जखमा इत्यादी अनेक आजार बरे होतात. (Marathi Trending News)
युरिनमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आणि अँटीबॉडीज असतात. असे सांगितले जाते की,युरिनमध्ये खनिजे, अँटीबॉडीज, एंजाइम आणि हार्मोन्स असतात जे आपल्या चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी प्रभावी असतात. हे अँटीसेप्टिक आणि मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते. निसर्गोपचारतज्ज्ञांचा असा दावा आहे की युरीन प्यायल्यास अॅलर्जी, पुरळ, कर्करोग, हृदयरोग, संसर्ग, जखमा, नाक बंद होणे, पुरळ, त्वचेचे आजार बरे होतात. मात्र असे असले तरी यापैकी कोणत्याही दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. (Marathi Top News)
==========
हे देखील वाचा : Leukorrhea : व्हाईट डिस्चार्ज होतो…? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी ‘ही’ फळे खाल्ल्यास होतील भरपूर लाभ
==========
युरीन पिण्याचे नुकसान
युरीन शरीराबाहेर पडल्यावर बॅक्टेरियाच्या संपर्कात येते. निरोगी लोकांच्या युरिनमध्ये देखील बॅक्टेरिया असू शकतात. युरीन पिण्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते, कारण लघवीमध्ये मीठ असते. लघवी पिण्यामुळे शरीरातील सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण बिघडू शकते. जर शरीरामध्ये आधीच डिहायड्रेशन असेल तर त्याचा गंभीर परिणाम होऊन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
(टीप : या लेखातून आम्ही कोणताही दावा करत नाही. ही माहिती केवळ एक वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहचवत आहोत. कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या)