Home » Hijab Controversy: कर्नाटकमधील हिजाब प्रकरण खरोखरच धार्मिक गोष्टींशी निगडित आहे का? 

Hijab Controversy: कर्नाटकमधील हिजाब प्रकरण खरोखरच धार्मिक गोष्टींशी निगडित आहे का? 

by Team Gajawaja
0 comment
Hijab Controversy
Share

सध्या कर्नाटकमधील ‘हिजाब’ प्रकरणावरून (Hijab Controversy) देशभर गदारोळ उठला आहे. सध्याच्या काळात मुस्लिम महिला विशेषकरून मुलींमध्ये हिजाबचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. संपूर्ण जगभरात ‘हिजाब’ परिधान करण्याचे प्रमाण जास्त आहे. हिजाब म्हणजे एक हेडस्कार्फ, ज्यामध्ये डोके आणि मान झाकलेली असते, परंतु चेहरा उघडा असतो. इस्लाममधील आधुनिक नियमानुसार हिजाबचा अर्थ आहे, पडदा. 

भारतामध्ये तसं बघायला गेलं तर, कोणी कुठले कपडे घालावेत यावर कधी सामाजिक आक्षेप घेतला जात नाही. परंतु, ठराविक ठिकाणांसाठी मात्र गणवेश निश्चित करण्यात आलेला आहे. व्यावसायिक जीवनात गणवेश निश्चितीची डॉक्टर, वकील, न्यायधीश, पोलीस, सर्व सैन्यदल, अग्निशामक दल, एअर होस्टेस अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. आजकाल तर काही कॉर्पोरेट ऑफिसेस मध्येही कर्मचाऱ्यांना गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु, बाकी वैयक्तिक आयुष्यात कोणी कोणते कपडे परिधान करावे, यावर कोणतेही बंधन घालण्यात येत नाही. 

भारतीय राज्यघटनेने समानतेचा पुरस्कार केला आहे. शाळा व महाविद्यालयांमध्येही हीच समानता अधोरेखित करण्यासाठी ‘गणवेश’ ही संकल्पना स्वीकारण्यात आली. अगदी सरकारी व खाजगी सर्व प्रकारच्या शाळा व महाविद्यालयांना आपल्या संस्थेचा ‘गणवेश’ ठरविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अर्थात शूज, सॉक्स, टाय, ब्लेझर या गोष्टी गणवेश या संकल्पनेमध्ये आवश्यक आहेत की नाही, हा देखील अनेकवेळा वादादीत मुद्दा ठरला आहे, तरीही गणवेशामधील ‘पेहराव’ हा विषय आजवर कधी वादादीत ठरला नाही. (Hijab Controversy)

Obnoxiously absurd: Twitter fumes over comparison of wearing 'burqa' with  the practice of 'sati'

शैक्षणिक क्षेत्रात गणवेश असण्याचे मुख्य कारण म्हणजे शाळेत शिकणारी मुलं कोणत्याही आर्थिक परिस्थितीतून, कोणत्याही धार्मिक वातावरणातून आलेली आहेत, हे महत्वाचे नाही. इथे सर्व मुलं फक्त ‘विद्यार्थी’ असतात. शिक्षण घेऊन केवळ शिक्षित नाही तर, सुशिक्षितही व्हावे, सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानेच मुलं शाळेत येतात. इथे त्यांची एकच जात आणि एकच धर्म असतो, तो म्हणजे विद्यार्थी! असो. (Hijab Controversy)

मुसलमान महिलांचे अधिकार हा विषय नेहमीच वादादीत राहिला आहे. ‘ट्रिपल तलाक’ रद्द झाल्यावर अनेक मुसलमान महिलांनी बुरख्यामधून मुक्ती कधी? असाही विचार बोलून दाखवला होता. अरब राष्ट्रांमध्ये आणि काही प्रमाणात इराण, इराकमध्ये महिलांना केस न झाकता घराबाहेर पडता येत नाही, त्यांनी तसं केल्यास त्यांना समाजातील पुरुषांच्या रोषाला सामोरे जावे लागते. इतकंच नाही तर, त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी महिला बुरखा, हिजाब, नकाब परिधान करतात. 

बुरख्याचा इतिहास आणि हिजाब 

अरब राष्ट्राच्या उदयानंतर धार्मिकतेच्या कारणासाठी बुरखा परिधान करण्याची प्रथा मुस्लिम स्त्रियांवर लादण्यात आली. पुरुषांच्या वाईट नजरेपासून स्वतःला वाचण्यासाठी स्त्रियांनी बुरखा परिधान करण्याची प्रथा सुरु झाल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. हिजाब, निकाब, बट्टौला, बोशीया, आबाया, बुरखा, खिमार, अल-मीरा, चादोर असे बुरख्याचे अनेक प्रकार जगभरात परिधान केले जातात.

==== 

हे ही वाचा: पाकिस्तानमध्ये नवा इतिहास रचणाऱ्या आयशा मलिक नक्की आहेत तरी कोण?

====

पूर्वीच्या काळी प्राचीन ग्रीक आणि पर्शियन साम्राज्यांमध्ये तसेच मेसोपोटेमियामध्ये उच्चभ्रू घराण्यातील स्त्रिया आणि इतरांमध्ये फरक करण्याचे एकच माध्यम होते, ते म्हणजे बुरखा! खानदानी आणि श्रीमंत कुटुंबातील महिला संपूर्ण देह झाकण्यासाठी बुरखा वापरत असत. तसेच, पूर्वी असा समज होता की, स्त्रियांना खास करून उच्चभ्रू घराण्यातील स्त्रियांना वश करण्यासाठी त्यांच्यावर वाईट शक्तींचा प्रयोग केला जातो. परंतु, बुरखा वापरल्याने चेहरा आणि डोके झाकले जाते आणि त्यांचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते.  

Karnataka hijab controversy: A look at list of countries that have banned  headscarf, burqa | India News – India TV

११७५ पर्यंतच्या काळातील अँग्लो-सॅक्सन आणि अँग्लो-नॉर्मन समाजातील महिला संपूर्ण डोके, मान आणि चेहऱ्याचा एक भाग हनुवटीपर्यंत झाकलेला बुरखा परिधान करत असत. हा प्रकार थोडाफार हिजाबसारखाच होता. हा बुरखा त्या समाजातील स्त्रियांची ओळख होती. 

पुराणमतवादी देशांमध्ये स्त्रिया मारहाण, अटक किंवा हत्येच्या भीतीने बुरखा किंवा नकाब घालत असत. तसेच वाईट नजर, काळ्या जादूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारा बुरखा त्या त्या काळातील संस्कृतीचा किंवा धर्माचा भाग बनला. 

विकिपीडियावर देण्यात आलेल्या माहितीनुसार – 

दारबत अल-हिजाब (बुरखा घेणे) हा शब्द “प्रेषित मुहम्मदची पत्नी बनणे” याचा समानार्थी शब्द म्हणून वापरला जात असे. मुहम्मदच्या आयुष्यात, इतर कोणत्याही मुस्लिम महिलेने ‘हिजाब’ घातला नाही. मुस्लिम महिलांनी मुहम्मदच्या पत्नींचे अनुकरण करण्यासाठी ‘हिजाब’ घालण्यास सुरुवात केली, ज्यांना इस्लाममध्ये “Mothers of the Believers” म्हणून पूज्य मानले जात असे. तसेच, मुस्लिम समाजात ख्रिस्तपूर्व काळात ६२७ पर्यंत बुरखा घालण्याची परंपरा नव्हती. 

==== 

हे ही वाचा: डॉ. आफिया सिद्दिकी (Aafia Siddiqui)- पाकिस्तानी आतंकवादाचा भयानक चेहरा

====

आधुनिक मुस्लिम धर्म विद्वानांच्या मते इस्लामिक कायद्यात विवाहित स्त्रियांनी हिजाबच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सौदी अरेबियातील इस्लामिक संशोधन आणि फतवे जारी करणारी सुन्नी स्थायी समिती आणि इतर संस्थांच्या म्हणण्यानुसार, शिया, सुन्नी अशा जवळपास सर्वच मुस्लिम संस्कृतींमध्ये, तरुण मुलींना हिजाब घालण्याची आवश्यकता नाही. 

या सर्व माहितीच्या आधारे एकंदरीत कर्नाटकमधील ‘हिजाब’ प्रकरण (Hijab Controversy) खरंच धार्मिक विषयाशी निगडित आहे का, असा प्रश्न पडतो. 

– मानसी जोशी


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.