इराकमध्ये एका टिकटॉक स्टारला तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कारण तिने घट्ट कपडे घालून व्हिडिओ तयार केले. इराकच्या पॉपवर डांन्स करत टिकटॉक स्टार झालेली ओम फहाद हिचे हजारोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियात वाईट कंटेटला टार्गेट करणाऱ्या एका अभियानात ती अडकली गेली. याच कारणास्तव ती आता तुरुंगात आहे. तरुण इराकी महिला ज्या आपल्या दुसऱ्या नावाने प्रसिद्ध आहे त्यांना सुद्धा इराकी कायद्याअंतर्गत ६ महिन्याची तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Iraq)
या दरम्यान, तिच्यावर आरोप लावण्यात आला आहे घट्ट कपडे घालून व्हिडिओ बनवत होती. अशा प्रकारचे कंटेट वाईट श्रेणीत टाकले जातील. येथील सरकारने सोशल मीडियावर कंटेटची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवे शासकीय अभियान सुरु केले आहे. या अभियानाचा उद्देश असा की, अशा प्रकारच्या कंटेटवर कारवाई गेली पाहिजे. म्हणजेच इराकच्या नैतिकता आणि परंपरांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या अभियानाबद्दल देशातील गृह मंत्रालयाने जानेवारीत घोषणा केली होती.
मोठ्या प्रमाणात सोशल मीडियातील कंटेटवर नजर
इराकच्या सरकारकडून काही अशा लोकांची टीम तयार करण्यात आली आहे की, जी पितृसत्तात्मक समाजात काही लोकांद्वारे आपत्तीजनक मानले जाणारे टिकटॉक व्हिडिओ, युट्यूबच्या क्लिप अथवा अन्य लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नजर ठेवून आहेत. सरकारने या अभियानाची घोषणा अशावेळी केली होते जेव्हा अशा प्रकारचा कंटेट हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. तो इराकच्या परिवार आणि समाजासाठी घातक आहे. सरकराने सामान्य लोकांना अशा प्रकारच्या कंटेटचा रिपोर्ट करण्यास ही सांगितले होते. (Iraq)
हे देखील वाचा- जगातील ‘या’ देशात कोणतीच बंधने नाहीत, लग्नाशिवाय किती ही मुलांना जन्म देऊ शकतात कपल्स
ओम फहादला शिक्षा सुनावल्यानंतर काही दिवसांमध्येच आणखी एका टिकटॉक स्टार जो होसामच्या नावाने ओळखला जातो त्याला ही दोन वर्षांची कठोर शिक्षा सुनावली गेली आङे. त्याने काही व्हिडिओमध्ये सैन्याचे घट्ट कपडे घातले होते. आता पर्यंत अशा प्रकारच्या आणखी काही स्टारवर वाईट कंटेट शेअर केल्याने अटक करण्यात आली आहे. याची माहिती ही गृह मंत्रालयाने दिली आहे.
इराकसह इराण मध्ये ही एका टिकटॉक स्टारचा व्हिडिओ खुप व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक कपल रस्त्यावर डांन्स करत होते. व्हिडिओ व्हायरल झाल्याने तो पोलिसांनी पाहिली. त्यानंतर भररस्त्यात डांन्स केल्याने १० वर्ष ६ महिन्याची शिक्षा सुनावली गेली. दरम्यान इराण मध्ये महिलांसाठी कठोर नियम तयार करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना हिजाब घालणे अनिवार्य आहे. त्याचसोबत त्या सार्वजनिक ठिकाणी डांन्स करु शकत नाहीत.