Home » इराक मध्ये सुद्धा श्रीलंकेसारखी स्थिती, नक्की काय झाले आहे जाणून घ्या

इराक मध्ये सुद्धा श्रीलंकेसारखी स्थिती, नक्की काय झाले आहे जाणून घ्या

by Team Gajawaja
0 comment
Iraq
Share

तुम्हाला श्रीलंकेवर आलेल्या आर्थिक संकटाची नक्कीच माहिती असेल. दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. सामान्य जनता ही राष्ट्रपती भवनात पोहचली होती. सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आता आणखी एका देशाची स्थिती सुद्धा तशीच झाली आहे. येथील सुद्धा सामान्य जनता ही राष्ट्रपती भवनात घुसली आहे. स्विमिंग पुल ते अन्य वस्तूंचा वापर त्यांच्याकडून केला जात आहे. अराजकता आणि अर्थव्यवस्थेने भरलेल्या या देशाचे नाव आहे इराक (Iraq). तर जाणून घेऊयात नक्की इराक मध्ये काय झाले आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती त्यांच्यावर का ओढावली आहे त्याबद्दल अधिक.

सोशल मीडियात व्हायरल होतायत व्हिडिओ
परिस्थिती अशी आहे की, इराकची राजधानी बगदाद मध्ये पसरलेली अराजकता आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये असे दिसून येत आहे की, सर्वत्र संतप्त आंदोलनकर्ते राष्ट्रपती भवन रिपब्लिक पॅलेसमध्ये घुसले आहेत. स्विमिंग पुलमध्ये उड्या मारत आहे. वस्तूंचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी हिंसाचाराच्या गोष्टी सुद्धा घडल्या आहेत.

काय आहे इराक वरील संकटाचे कारण?
सोमवारी इराक मधील प्रसिद्ध नेता धर्मगुरु मुक्तदा अल-सद्र याने देशाच्या राजकरणातून संन्यास घेण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या शेकडो समर्थकांनी आंदोलन सुरु केले. दरम्यान या सर्व घटनेची पायमुळं ही ऑक्टोंबर २०२१ पासून जोडली गेली आहेत. वर्ष २०२१ च्या ऑक्टोंबर महिन्यात इराक मध्ये सार्वत्रिक निवडणूका झाल्या.

Iraq
Iraq

या दरम्यान, धर्मगुरु मुक्तदा अल-सद्र याच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांना बहुमत मिळवता आले नव्हते. तेव्हा बहुमत मिळवण्यासाठी त्यांनी इरान समर्थित शिया प्रतिस्पर्ध्यांसोबत बातचीत करण्यास नकार दिला होता. त्यानंतर इराक मधील अन्य राजकीय पक्षांनी ऑर्डिनेशन फ्रेमवर्क ब्लॉककडून मोहम्मद अल-सुडानीच्या नावाची घोषणा केली. मात्र इराकची जनता मोहम्मद अल-सुडानी याला पंतप्रधान म्हणून पाहत नव्हती. म्हणजेच त्यांना ते पंतप्रधान म्हणून नको होते. त्यांचे असे म्हणणे होते की, कोणत्याही सूडानीला देशाची कमान सोपवणार नाही. रिपोर्ट्स नुसार, त्यावेळी सुद्धा त्यांचे समर्थक प्रतिस्पर्ध्यांना सरकार बनवण्यापासून रोखण्यासाठी संसदेत घुसले होते.

आता पुन्हा एकदा अल-सद्रने जेव्हा संन्यासाची घोषणा केली तेव्हा त्यांचे समर्थक संतापले आहेत. दरम्यान, राजकीय जाणकार अल-सद्रच्या या पावलांना राजकिय मान मिळवण्यासाठीचा एक डाव असल्याचे मानत आहेत. दरम्यान, या सर्वामध्ये इराकची (Iraq) परिस्थिती जरुर बिघडत चालली आहे.

हे देखील वाचा- चीन ठेवतोय भारतावर लक्ष; गुप्तहेर जहाज युआन वांग-5 श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल 

आतापर्यंतचे ५ मोठे अपडेट्स
-इराकमध्ये वाढत्या तणावाला शांत करण्यासाठी देशात कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.
-धर्मगुरु अल-सद्रच्या समर्थकांना अपील करण्यात आले आहे की, त्यांनी हिंसाचार थांबवावा. तसेच शासकीय निवासस्थानाहून तातडीने बाहेर पडावे. अशी सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे की, इराकमध्ये परिस्थिती अधिक बिघडू शकते.
-रिपोर्ट्सनुसार, या आंदोलनात जवळजवळ ३०० आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. अल-सद्रच्या समर्थकांनी आणि सुरक्षाबलामध्ये झालेल्या हिंसाचारात २० आंदोलनकर्त्यांचा जीव सुद्धा गेला आहे.
-दरम्यान, इराकमध्ये गेल्या १० महिन्यांपासून कोणतेही सरकार नाही आणि कोणतेही सक्रिय मंत्रीमंडळ ही नाही. हे सुद्धा कारण आहे की, देशात सातत्याने अराजकतेची स्थिती वाढत चालली आहे.
-असे सुद्धा सांगितले जात आहे की, अल-सद्र गेल्या एका महिन्यापासून लवकरच निवडणूक घेण्यासह संसद भंग करण्याची मागणी करत होते. त्यांनी ट्विटरवर आता आपण संन्यास घेत असल्याचे सुद्धा लिहिले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.