Home » Makhunik Village : इराणचे एक गूढ गाव…..

Makhunik Village : इराणचे एक गूढ गाव…..

by Team Gajawaja
0 comment
Share

इराणमध्ये काय चालू आहे, यावर अवघ्या जगाचे लक्ष आहे. अयातुल्ला खामेनी यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अवघा इराण रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या वादात कधीही उडी मारण्याच्या बेतात आहे. ( Makhunik Village )

अशात सर्वत्र खामेनी येण्याआधीचा इराण कसा होता, याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये एका अनोख्या गावाचाही उल्लेख होत आहे. हे गावं बुटक्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाचा उल्लेख इराणच्या लोककथांमध्ये शापित गाव असाही कऱण्यात आला आहे.

या गावाचे नाव माखुनिक असून त्याला “लिलिपुट गाव” असेही म्हणतात. खोरासानजवळील या माखनिक गावातील रहिवाशांची उंची ही ठराविक फुटापेक्षा कधीही जास्त होत नाही. येथील रहिवाशी अडीच ते तीन फुटांपेक्षा जास्त उंचीचे होत नाहीत. ( Makhunik Village )

जवळपास १५०० वर्ष जुन्या गावात या गावाबाबत अनेक गुढ कथा आहेत. विशेष म्हणजे, येथील घरेही पाहण्यासारखी आहेत. या घरांचे दरवाजेही छोटे असून कमी उंचीची माणसेच यातून ये-जा करु शकतात. ( Makhunik Village )

माखनिक गावामध्ये हजारो वर्षापासून अशीच बुटकी माणसं राहत असल्याचा दावाही करण्यात येतो. या गुढ गावातील रहिवाशांची उंची का वाढत नाही, याचा तपास करण्याचा प्रयत्नही कऱण्यात आला, मात्र त्यात यश आले नाही, त्यामुळे माखनिक गावाबाबतचे गुढ अधिक वाढले आहे.

लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकात गुलिव्हरच्या प्रवासाची गोष्ट आवर्जून असतेच. हा गुलिव्हर जगभरात फिरला, यात त्याला अनेक प्रकारची माणसे भेटली. काही माणसे ही राक्षसासारखी उंच, धिप्पाड होती. तर काही देशातील माणसे ही बुटकी होती. ( Makhunik Village )

या गुलिव्हरला लिलिपुट नावाच्या ठिकाणी १५ सेंटीमीटर उंचीच्या लोकांनी पकडले. नंतर हा गुलिव्हर या लिलिपुट नागरिकांचा मित्र झाला, आणि त्यांना गुलिव्हरनं एका शत्रूपासून वाचवले.

लहानपणी ही कथा वाचतांना जगात खऱोखरच अशी बुटकी माणसं असतील का, अशी शंका नक्कीच आली होती. अर्थात आता त्या शंकेचे उत्तर मिळाले असून इराणच्या एका गावात असे बुटक्यांचे गाव मिळाले आहे. ( Makhunik Village )

इराणमधील माखुनिक गाव हे लिलिपुट गाव म्हणून ओळखले जाते. या गावात काही वर्षापूर्वी जे उत्खनन झाले त्यात एक ममी सापडली. ही ममी फक्त २५ सेमी उंचीच्या माणसाची होती.

या ममीसोबत हत्यारेही मिळाली, ती हत्यारेही या छोट्या माणसाताला उपयोगी पडतील अशी होती. त्यामुळेच माखुनिक गाव हे हजारो वर्षापासून बुटक्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ( Makhunik Village )

माखुनिक गाव इराण-अफगाणिस्तान सीमेजवळील दक्षिण खोरासान प्रांतात आहे. या गावात ७०-८० घरे असून ही घरेही छोटी आहेत. त्यांची उंची फक्त दीड ते दोन मीटर आहे.

आजही या गावात अशी बुटकी माणसे सापडतात. गावातील काही रहिवासी हे सरासरी उंचीचे आहेत. मात्र गावातील घरेही आजही बुटक्या माणसांसाठी उपयोगी पडतील अशीच उभारण्यात येतात. ( Makhunik Village )

या घरांच्या खिडक्या आणि दारेही लहान बनवण्यात येतात. या भागात मोठ्या प्रमाणात वाळूची वादळे येतात, त्यापासून बचाव करण्यासाठी अशा लहान खिडक्या आणि दरवाजे असल्याचे सांगण्यात येते.

या घऱातील चुलीही विशिष्ट असून त्याचा अभ्यास करण्यात येत आहे. यामागे येथील रहिवाशांची कमी असलेली उंचीही एक कारण आहे. हजारो वर्षापूर्वी कुपोषणामुळे या गावातील रहिवासी बुटके राहिले असावेत असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. ( Makhunik Village )

=======

हे देखील वाचा : Iran Protests : इराणमधील मशिदी मशिदींना लागले टाळे

=======

अलिकडच्या काळात माखुनिक गावाला जोडणा-या रस्त्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या भागात खजूर आणि अन्य पिकांची उपलब्धता वाढल्यामुळे माखुनिकमधील गावक-यांची उंची वाढत आहे. ( Makhunik Village )

तरीही या गावातील लोकांना भेटण्यासाठी अनेक पर्यटक येते येतात. माखुनिक गावाबद्दल असलेल्या गुढ कथांमुळेही येथे येणा-या पर्टकांची संख्या मोठी आहे. गावातील प्राचीन वास्तुकलेमुळे माखुनिक हे लोकप्रिय पर्यटन स्थळ झाले आहे.

माखुनिक गावात २००५ मध्ये उत्खनन करण्यात आले. त्या दरम्यान येथे ममी सापडल्यानं आता काही तंत्रज्ञ अन्य भागातही उत्खनन करत आहेत, त्यातून माखुनिकचा दडलेला इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. ( Makhunik Village )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.