इराणमध्ये 2022 मध्ये घडलेल्या एका घटनेनं इस्लामिक कायद्यांचा आग्रह करणा-यांना एक चपराक दिली होती. महसा अमिनी नावाच्या एका तरुणीला हिजाब व्यवस्थित घातला नाही, म्हणून अटक करण्यात आली आणि तिचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी इराणमधील महिला एकत्र आल्या आणि त्यांनी इराणभर आंदोलन सुरु केले. अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर इराणमध्ये महिलांनी वारंवार इस्लामिक कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे. आता याच इराणमधून आलेल्या आणखी एका धक्कादायक व्हिडिओमुळे महिलांचा हिजाबला किती प्रखर विरोध आहे, आणि हा विरोध त्या कशाप्रकारे व्यक्त करु शकतात, हे स्पष्ट झालं आहे. इराणमधील महिलांच्यावर होणा-या दडपशाहीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे महसा अमिनीच्या आठवणी ताज्या झाल्या. (Iran)
इराणच्या एका प्रसिद्ध विद्यापीठातील ही तरुणी चक्क अंतर्वस्त्रांवर फिरत होती. तिच्या पोशाखाबद्दल पोलीसांनी आक्षेप घेतला होता, त्यामुळे चिडलेल्या या तरुणीनं आपल्या अंगावरचे कपडेच उतरवले आणि ती फिरु लागली. यानंतर या तरुणीला अटक झाली. पण तोपर्यंत ही घटना सोशल मिडियाच्या माध्यमातून जगभर व्हायरल झाला. यासोबत या तरुणीला सहानुभूती मिळू लागली. तसेच इराणमध्ये हिजाब बंदीसाठी महिला किती आक्रमक होऊ शकतात हेही सिद्ध झालं आहे. एकीकडे भारतामध्ये महिलांसाठी हिजाब आवश्यक आहे, असे काही इस्लामिक कायद्याचा दाखला देऊन आग्रह करीत आहेत, तर दुसरीकडे मुस्लिम देश असलेल्या इराणमध्ये मात्र तेथील महिलांनी हिजाब बंदीसंदर्भात युद्धच सुरु केले आहे. इराणमध्ये महिलांच्या कपड्यांबाबत अनेक कठोर नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा महिलांना देण्यात येतात. मात्र हे कठोर नियम आता येथील महिलांचा आवाज फारकाळ दाबू शकत नाहीत, हे स्पष्ट झालं आहे. कारण एका तरुणीनं चक्क अंतर्वस्त्रांमध्ये प्रवेश केला आणि या सर्व दडपशाहीचा अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला. इस्लामिक आझाद विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका तरुणीने तिचे अंतर्वस्त्र काढून टाकली. (International News)
उत्तर तेहरानमध्ये असलेल्या इस्लामिक आझाद विद्यापीठाच्या विज्ञान आणि संशोधन शाखेतील या विद्यार्थिनीला तिच्या हिजाबबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यापीठ संकुलात असलेल्या पोलीसांनी तिची चौकशी करतांना तरुणीबरोबर अक्षेपार्ह वर्तन केल्याचेही स्पष्ट झाले. या सर्वांमुळे चिडलेल्या तरुणीनं आपल्या अंगावरील हिजाब आणि अन्य वस्त्रही काढून टाकली. मग अंतर्वस्त्रांवरील या तरुणीनं विद्यापीठ संकुलातील काही भागात फेरफटका मारला. त्यानंतर तिच्यापाठोपाठ सुरक्षा रक्षक धावत आले आणि तिला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला. जगभरातून इराणमध्ये इस्लामिक कायद्याच्या नावाखाली होत असलेल्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. तसेच अटक केलेली तरुणी आता कुठे आहे, हा प्रश्नही विचारण्यात आला. कारण या तरुणीला अटक झाल्यापासून तिच्यासंदर्भात कुठलिही माहिती उजेडात आलेली नाही. या तरुणीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अटक केल्यावर तरुणीला जबर मारहाण करण्यात आली, तसेच तिच्यावर अनेकांनी बलात्कारही केला, यात त्या तरुणीचा मृत्यू झाल्याची माहितीही पुढे आली आहे. (Iran)
======
हे देखील वाचा : शांत पद्धतीने हाईजॅक केलेल विमान !
====
या खळबळजनक घटनेनंतर सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. झोपलेल्या इराणी जनतेला जागे करण्यासाठी या तरुणीनं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, असे मेसेज शेअर होत आहेत. तसेच संपूर्ण इराणमध्ये या घटनेसंदर्भात प्रचंड संताप आहे, कधीही जनतेचे बंड होऊन जुलमी शासकांना धडा मिळेल, असेही मेसेज फिरत आहेत. इराणमध्ये महिलांना हिजाब घालण्यासाठी कठोर नियम आहेत. दोन वर्षांपूर्वी महसा अमिनी नावाच्या मुलीने हिजाब परिधान करण्यास विरोध केल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर, संपूर्ण इराणमध्ये सरकारच्या विरोधात हिंसक निदर्शने झाली, ज्यात शेकडो लोक मारले गेले आणि महसा अमिनी हिजाबच्या विरोधातील आवाज म्हणून उदयास आली. त्यावेळीही अनेक महिलांनी हिजाब काढून निषेध नोंदवला होता. आता दोन वर्षानंतर पुन्हा तशाच स्वरुपाची घटना झाली आहे. (International News)
सई बने