Home » Iran’s Anti-Government Protests : इराणच्या रस्त्यावर भयंकर नरसंहार

Iran’s Anti-Government Protests : इराणच्या रस्त्यावर भयंकर नरसंहार

by Team Gajawaja
0 comment
Share

इराणमध्ये १९ व्या दिवशीही सरकारविरोधी निदर्शने सुरू असून तेथील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. मानवाधिकार संघटनांनी इराणच्या रस्त्यावर खुलेआम नरसंहार चालू असल्याचे सांगितले आहे. इराण मध्ये १८ दिवसात २००० नाही तर तब्बल १८,००० हून अधिक नागरिकांना ठार मारल्याची माहिती पुढे येत आहेत.

येथील रुग्णालयामध्ये मृतांचा खच पडला असून काही मृतदेह हे गोदामामध्ये ठेवण्यात आले आहेत. तिथूनही आता त्या मृतदेहांना दुर्गंधी सुटल्यामुळे इराणच्या रुग्णालयांची अवस्थाही बिकट होत चालली आहे. या सर्वात २६ वर्षीय इरफान सोलतानी याला कधीही फासावर लटकवण्यात येणार आहे. इरफानला फाशी दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ( Iran’s Anti-Government Protests ).

मात्र इराफानला योग्य शिक्षा दिल्यास अन्य निदर्शकांवर वचक बसून निदर्शने मागे घेण्यात येतील अशी आशा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना आहे. इरफान सोलतानी याला आज फासावर लटकवण्यात येणार आहे. यामुळे इराणच्या नागरिकांमध्ये अधिक असंतोष पसरला असून खामेनींच्या बासीज सैन्याविरोधात आता घोषणा देण्यात येत आहेत. इरफान सोलतानी याला फाशी झाल्यास इराणमधील निदर्शने अधिक हिंसक होण्याची शक्यता आहे. ( Iran’s Anti-Government Protests )

इराणमधील निदर्शनांचा १९ दिवस अधिक बिकट झाला आहे. येथे अल्लाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेऊन एका २६ वर्षीय दुकानदाराला फाशी देण्यात येणार आहे. इऱफान सोलतानी याचे कपड्यांचे दुकान होते, पण इराणमधील खचलेल्या आर्थिक नितीचा फटका त्याला बसला. त्यामुळे अन्य दुकानदारांसोबत तोही सरकारविरोधात रस्त्यावर उतरला. आंदोलनाचा तो आवाज झाला.

या इरफानला बासीज सैन्यानं त्याच्या घरातून अटक केली. त्यावेळी त्याचा लहान मुलगाही रडवेला झाला होता, घरातून इरफानला फरफटत नेण्यात आले. आता त्याला जाहीर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून या आगोदर त्याला फक्त १० मिनिटे आपल्या कुटुंबासोबत संवाद साधता येणार आहे. इरफानला झालेली फाशीची शिक्षा ही इस्लामिक राजवटीविरुद्ध अलिकडेच सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये पहिलीच कारवाई ठरणार आहे. इरफान ज्या निदर्शनात सहभागी झाला होता, त्यापैकी अन्य १०००० हून अधिक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ( Iran’s Anti-Government Protests )

इरफानला झालेल्या फाशीनंतर अटकेत असलेल्या या निदर्शकांनाही अशाच प्रकारची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सर्वांवर अल्लाहविरुद्ध युद्ध पुकारण्यात आल्याचा अऱोप आहे. इराणमध्ये या आरोपावर फक्त मृत्युदंडाची शिक्षा होते. ( Iran’s Anti-Government Protests )

या सर्वात इरफानला वाचवण्यासाठीही मानवाधिकार संघटना प्रयत्न करीत आहेत. इरफान याची बहिणही वकील आहे, मात्र तिला आपल्या भावाचा खटला चालवण्यापासून रोखण्यात आले आहे. इराणमधील निदर्शकांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संदेश पाठवला आहे. त्यात त्यांनी सरकारी कार्यालये ताब्यात घ्या, अमेरिकेहून मदत निघाली आहे, तुमच्यावर अत्याचार करणा-यांना लक्षात ठेवा, त्यांना योग्य शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. म्हणून इराणच्या रस्त्यावर रात्रीपासून मोठ्या हजारो नागरिक उतरले असून खामोनींच्या विरोधात घोषणा देत आहेत. या सर्वात निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत करण्यात येणारे वेगवेगळे दावे धक्कादायक आहेत. अमेरिकास्थित इराणी मानवाधिकार संघटनेच्या मते, १८,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत. ( Iran’s Anti-Government Protests )

ब्रिटिश वेबसाइट इराण इंटरनॅशनलचा दावा आहे की, गेल्या १७ दिवसांत १२,००० निदर्शक मारले गेले आहेत. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि बासीज फोर्सेसने केलेल्या गोळीबारात हजारो नागरिक ठार झाल्याचीही माहिती आहे. यातील बहुतेक बळी ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या आदेशानुसार बासीज सैन्यानं हे हत्याकांड केले आहे.

=======

हे देखील वाचा : Ayatollah Khamenei : अमेरिका इराणमध्ये सैनिक उतरवण्याच्या तयारीत…

=======

इराणमधील इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येथे किती लोक मारले गेले आहेत, हे जगापुढे येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. मात्र त्याआधी इराणच्या रुग्णालयांची अवस्था पाहता येथील मृतांचा आकडा हा भीतीदायक असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इराणच्या चलनाचे, रियालचे मूल्य आता जवळजवळ शून्यावर पोहोचले आहे. भारतीय चलनात एक रियाल फक्त ०.००००७९ रुपयांना मिळत आहे. या सर्वात इराणवर जर अमेरिकेनं आक्रमण केले तर इराणचे चलन मातीमोल ठरणार आहे. ( Iran’s Anti-Government Protests )

सई बने….


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.