Home » Ayatollah Khamenei : त्यांच्या गर्भाशयालाही सोडले नाही…

Ayatollah Khamenei : त्यांच्या गर्भाशयालाही सोडले नाही…

by Team Gajawaja
0 comment
Share

वाढत्या महागाईच्या विरोधात इराणमध्ये २८ डिसेंबर पासून निदर्शने सुरु झाली. त्यानंतर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते, अयातुल्ला खामेनी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये मोठा उद्रेक सुरु झाला. यापाठोपाठ इराणच्या प्रमुख शहरातही मोठा हिंसाचार सुरु झाला. यामध्ये अमेरिका आणि इराणच्या माजी राघराण्यानं उडी घेत निदर्शकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. यामुळे हजारो इराणी तरुण आणि तरुणीही रस्त्यावर आल्या. त्यांनी खामेनी यांच्या हुकूमशाहीविरोधात आंदोलन सुरु केले. यामुळे चिडलेल्या खामेनी यांनी त्यांच्या विशेष सुरक्षा रक्षकांना इराणच्या रस्त्यावर उतरवले, आणि त्यांना निदर्शकांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले. यातून जो हिंसाचार इराणच्या रस्त्यावर सुरु झाला, त्यात १५ हजाराहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याची चर्चा होत आहे. मात्र इराण सरकारनं अद्यापही याबाबत दुजोरा दिला नाही. ( Ayatollah Khamenei )

आंदोलकांमध्ये तरुणींचाही मोठा समावेश होता. अनेक इराणी तरुणींनी रस्त्यावर हिजाब उतरवून खामेनींविरोधात घोषणा दिल्या. मात्र खामेनींच्या रक्षकांनी या सर्व निदर्शकांवर अत्यंत कठोर कारवाई केली. यात सर्वात जास्त अत्याचार महिलांवर झाल्याची माहिती आता उघड होत आहे. इराणमधील महिला निदर्शकांवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती असून काही महिलांचे गर्भाशयही काढून टाकल्याची माहिती पुढे आली आहे. ज्या महिला निदर्शकांना मारण्यात आले आहे, त्यांच्या देहाचीही विटंबना खामेनी यांच्या रक्षकांनी केली आहे. काही महिलांच्या मृतदेहाचे टाळूही फोड्यात आल्याचे उघड झाल्यावर खामेनी यांनी महिलांवर किती अत्याचार केले असतील, याची चर्चा सुरु झाली आहे. खामेनी सरकारविरोधात इराणमध्ये सुरु झालेले जनआंदोलन चिरडण्यात काही प्रमाणत खामेनी यांना य़श आले आहे. इराणमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केल्यमुळे तिथे निदर्शकांची काय स्थिती आहे, याची कल्पनी जगाला येत नाही. मात्र काही पत्रकारांनी इराणमधील भयाण वास्तव जगासमोर आणले आहे.

खामेनी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी जी निदर्शने झाली, त्यात सहभागी निरदर्शकांना निघृणपणे मारण्यात आले. त्यातही महिला निदर्शकांवर बलात्कार करण्यात आले आणि मारल्यावरही त्यांच्या शरीराची विटंबना कऱण्यात आल्याचे उघड झाले आहे. इराणी-जर्मन पत्रकार मिशेल अब्दुल्ला यांनी याबाबत इराणी सरकारवर केलेल्या धक्कादायक आरोपामुळे जगभर खळबळ उडाली आहे. अब्दुल्ला यांच्या मते इऱाणी सुरक्षा दलांनी महिलांची जेवढी विटंबना केली आहे, तेवढी आत्तापर्यंत कोणीही केलेली नाही. ( Ayatollah Khamenei )

इराणी सुरक्षा दलांनी भीती निर्माण करण्यासाठी आणि निदर्शने थांबवण्यासाठी यातील सहभागी महिलांवर बलात्कार केला आहे. शिवाय त्यांचे गर्भाशयही अत्यंत क्रूरपणे काढण्यात आले आहे. यात अनेक महिलांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही त्यांच्या शरीरावर अनेक घाव कऱण्यात आले आहेत. काही महिलांच्या टाळूला केसासह बाहेर काढल्याचे दिसून आले आहेत. महिलांच्या अंगावर सिगरेटचे चटकेही देण्यात आले. अशा अत्याचार केलेल्या महिलांचे मृतदेह हे जाळून टाकण्यात आले आहेत. इराणमधील अनेक तरुणी सध्या गायब असून त्यांचे पालक त्यांना शोधत आहेत. अनेक तरुणी इराणी सुरक्षा रक्षकांच्या क्रौर्याला बळी पडल्या आहेत. पत्रकार मिशेल अब्दुल्ला यांच्यासह अन्यही पत्रकारांनी इराणमध्ये महिलांवर जो अत्याचार करण्यात आला, त्याबाबत वाचा फोडली आहे. त्यांच्या मते, खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणचे इस्लामिक रिपब्लिक बलात्काराचा शस्त्र म्हणून वापर करतात.

=======

हे देखील वाचा : Ayatollah Khamenei : अमेरिका इराणमध्ये सैनिक उतरवण्याच्या तयारीत…

=======

अशा अनेक तरुणींचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेहही गायब करण्यात आले आहेत. इराणमधील अनेक कुटुंब आपल्या मुलींचा शोध घेण्यासाठी शवागाराबाहेर गर्दी करत आहेत. जर्मन वृत्तपत्र डाय वेल्टनेही याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार इराणमध्ये अटक करण्यात आलेल्या निदर्शकांना जबरदस्तीने नग्न करून अज्ञात पदार्थांचे इंजेक्शन देण्यात आले. एका १६ वर्षांच्या मुलीलाही निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल पकडण्यात आले, आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर या मुलीला काठ्यांनी जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचीही बातमी आल्यामुळे इराणमध्ये नेमके काय चालू आहे, हे जगापुढे आले आहे. इराणमधील अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मृतांचा आकडा हा दहा हजाराच्या पुढे गेल्याचे सांगितले आहे. इराणी घडामोडींचे वृत्तांकन करणाऱ्या वेबसाइट इराण इंटरनॅशनलने दावा केला आहे की देशभरात किमान १२,००० लोक मारले गेले आहेत. यातील बहुतेक महिलांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याचेही यात सांगण्यात आले आहे. ( Ayatollah Khamenei )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.