मागील १२ दिवसांपासून इराण आणि इस्राएल या दोन देशांमध्ये भीषण युद्ध चालू होते. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत स्वतःला वरचढ सिद्ध करत होते. मात्र आज १२ दिवसांच्या युद्धानंतर इराण आणि इस्राईलमधील युद्ध अखेर थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धबंदीची घोषणा केली आहे. आज दिनांक २४ जून सकाळी साडेनऊपासून ही युद्धबंदी लागू झाली आहे. कतार आणि अमेरिका या दोन देशांनी युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला होता. (Iran and Israel War)
युद्ध विराम झाल्याची अधिकृत घोषणा इराणकडून देखील करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या १२ दिवसांच्या या संघर्षाला “बारा दिवसांचे युद्ध” असे म्हणत इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. युद्धबंदी हे या दोन्ही देशांच्या धाडसाचे आणि प्रगल्भतेचे लक्षण आहे ते म्हणत त्यांनी या युद्ध विरामाचे उल्लंघन न करण्याचे देखील आवाहन केले आहे. (Marathi News)
अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण जास्त चवताळला आणि हे युद्ध अधिकच पेटून उठले. इराणकडून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषाही केली गेली. इराणने कतार, सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले देखील केले. मात्र नंतर इराणने अमेरिकेच्या व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला. या संदेशानंतर अमेरिकेने सुद्धा कोणतीही कारवाई न करण्याचे सांगितले. सीझफायरबाबत ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या फोनवर चर्चाही झाली. हल्ले न करण्याची अट इराणने मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. (Todays Marathi NEws)
ट्रम्प यांच्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ला थांबवण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की इस्रायली सैन्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी इस्रायल आणि इराणमधील संघर्षात अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या युद्धविरामाला तेहरानची सहमती मिळवून दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी कतारच्या अमीरशी संपर्क साधल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. (Marathi Latest News)
हे युद्ध अधिक तीव्र होऊन संपूर्ण मध्यपूर्वे भाग धोक्यात जाण्याची शक्यता होती. परंतु अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इराण आणि इस्रायल दोघांनीही माघार घेतल्याने सध्या तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळाले आहे. मात्र इराणच्या सरकारी माध्यमांनी दावा केला आहे की, मंगळवारी कतारमधील अमेरिकन तळावरील हल्ल्याच्या काही तासानंतर युद्धबंदी लागू करण्यात आली. इराणने म्हटले की, इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इस्रायलने युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे. अमेरिकेच्या हल्ल्याला आम्ही पूर्ण ताकदीने उत्तर दिले आहे. यामुळेच आणखी भयावह हल्ल्यांच्या भीतीने इस्रायल आणि अमेरिकेने युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे. (Top Trending News)
================
हे देखील वाचा : Farah Pahlavi : इराणची शेवटची सम्राज्ञी !
Israel And Iran : पक्के मित्र असलेले इस्रायल आणि इराण शत्रू का झाले !
================
१३ जूनला इस्रायलने इराणवर हल्ले केल्यावर गेले १२ दिवस दोन्ही देश एकमेकांवर भयंकर प्रहार करत होते. तेल अवीवपासून तेहरानपर्यंत रोज प्रचंड हानीची माहिती समोर येत होती. इस्रायल आणि इराण दोघेही माघार घेत नव्हते. इराणला हरवण्यासाठी अमेरिकेलाही या युद्धात सामील व्हावे लागले होते. मात्र अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर या हल्ल्याची अनेक देशांनी निंदा केली होती. तर काही देशांनी चिंता देखील व्यक्त केली होती. (Social Updates)