Home » ईराणमध्ये महिलांनी कापले केस तर जाळला हिजाब, कारण ऐकून व्हाल हैराण

ईराणमध्ये महिलांनी कापले केस तर जाळला हिजाब, कारण ऐकून व्हाल हैराण

by Team Gajawaja
0 comment
Iran Hijab Protest
Share

ईराण मध्ये हिजाबावरुन वाद अधिक चिघळला गेला आहे. २२ वर्षाची महसा अमिनी हिच्या मृत्यूनंतर शिया परिसरात एकत्रित येत जोरदार आंदोलन केले जात आहे. हिजाबासंदर्भात पाळली जाणारी कट्टरतेच्या विरोधात शेकडो महिलांनी देशाच्या पश्चिम हिस्स्यातील रस्त्यांवर उतरल्या. महिला आंदोलनकर्त्यांनी फक्त आपले केसच नव्हे तर हिजाब सुद्धा जाळला.(Iran Hijab Protest)

ईराणी पत्रकार आणि अॅक्टिव्हिस्ट मसीह अलीनेजाद याने आपल्या सोशल मीडियात अकाउंटवर महिलांचे केस कापण्याचे व्हिडिओ शेअर केले. त्यापुढे असे लिहिले की, हिजाब पोलिसांच्या द्वारे महसाची हत्या केल्याने त्याच्याच विरोधात ईराण मधील महिलांनी आपले केस कापले आणि हिजाब जाळले. त्यांनी असे म्हटले की, ७ वर्षापासूनच आपली केस झाकून न ठेवल्यास शाळेत बंदी घातली जाते ना ही नोकरी करु शकतो. आम्ही या लैंगिक रंगभेदाच्या शासनामुळे कंटाळलो आहोत.

ईराणी नागरिकांचा संतापाचा उद्रेक
अन्य ट्विटमध्ये ईराणी पत्रकारांनी तेहरान युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये महसा अमिनीच्या हत्येच्या विरोधात आंदोलन केले जात आहेत त्यामध्ये विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले आहेत. त्यांनी असे म्हटले की, या घटनेमुळे ईराणी नागरिक संतापले आहेत. अलीनेजाद याने असे म्हटले की, सुरक्षाबलाने सागेज शहारत आंदोलनकर्त्यांवर गोळ्या झाडल्या तरीही आंदोलन पूर्णपणे थांबले नाही ते सुरुच होते.

आणखी एका व्हिडिओ मध्ये हुशार महिलांनी सातत्याने दुसऱ्या दिवशी सुद्धा रस्त्यावर उतरुन घाबरु नका, आम्ही सर्व एक आहोत अशा घोषणा दिल्या. त्यांनी असे म्हटले की, सुरक्षाबलाने गोळीबार केल्यानंतर काही लोक जखमी सुद्धा झाले.

Iran Hijab Protest
Iran Hijab Protest

तेहरानच्या दौऱ्यावर होती महसा
अल जजीराच्या मते, २२ वर्षीय महसा अमिनी आपल्या परिवारासोबत तेहरानच्या दौऱ्यासाठी गेली होती. तेव्हा तिला स्पेशलिस्ट पोलीस युनिटने ताब्यात घेतले. काही वेळानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले व तेथेच तिचा मृत्यू झाला.(Iran Hijab Protest)

राज्यातील मीडियाने शुक्रवारी असे म्हटले की, दुर्भाग्याने तिचा मृत्यू झाला आणि तिचे पार्थिव हे मेडिकल एग्जामिनेशन अधिकाऱ्यांना दिले गेले. ही घोषणा तेहरान पोलिसांनी अशा आवाहनंतर केली ज्यामध्ये त्यांनी पुष्टी केली की, अमिनी हिला अन्य महिलांसह नियमांबद्दल निर्देशासाठी ताब्यात घेण्यात आले होते.

हे देखील वाचा- हैदराबाद ऐवजी कश्मीर पाकिस्तानला दिला जाणार होता, पण असे काय झाले सर्वकाही बदलले

पोलिसांनी बळजबरीने बसवले गाडीत
ईरानवायरच्या मते परिवाराशी बातचीत करणारी मानवाधिकार कार्यकर्त्याने म्हटले की, पोलिसांनी तिला खेचत घेऊन गेले आणि बळजबरीने गाडीत ही बसवले. तिचा भाऊ किर्याश याने तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला असे सांगितले की, त्याच्या बहिणीने एका तासाच्या री-एज्युकेशनसाठी पोलीस स्थानकात नेले जात आहे.

तिच्या भावाने पोलीस स्थानकाबाहेर वाट पाहिली. मात्र तेव्हा एक रुग्णवाहिका आली आणि त्याच्या बहिणीला रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत महसा परिवाराने असे म्हटले की, ती एकदम व्यवस्थितीत होती आणि तिला हृदयासंबंधित कोणताही आजार नव्हता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईराणचे कट्टर राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी प्रत्येक वेळी हिजाब घालण्यास महिलांना ड्रेस कोड कठोर लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी उल्लंघनासाठी कठोर दंड सुद्धा ठेवला होता. महिलांनी आता ही आणि यापूर्वी सुद्धा हिजाब संबंधित जोरदार विरोध केला होता. यापूर्वी २०१४ मध्ये तेहरानच्या इंकलाब स्ट्रिटवर महिलांनी आपला हिजाब हवेत फेकून कठोर इस्लामिक कायद्याचा विरोध केला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.