ईराण मध्ये सुरु असलेल्या हिजाबाच्या विरोधातील देशव्यापी आंदोलनात दोन स्थानिक प्रमुख अभिनेत्र्यांना सहभागी होणे भारी पडले आहे. पोलिसांनी दोन्ही अभिनेत्र्यांना ताब्यात घेतले आहे. ही माहिती ईराणच्या स्टेट मीडियाने जाहीर केली आहे. दोन्ही अभिनेत्र्यांचे नाव हेंगामेह गजियानी आणि कातायुन रिहायी आहे. या दोघांवर ईराण सरकारच्या अथॉरिटीच्या विरोधात कार्य करण्यासंदर्भात गंभीर आरोप लावले आहेत. या दोन्ही अभिनेत्र्यांना यापूर्वी सुद्धा हॅडकार्व्ज शिवाय पाहिले गेले. तसे करणे म्हणजे आंदोलनात सहभागी असण्याचा एक इशारा होता. (Iran anti hijab protest)
ईराण मध्ये सप्टेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत हिजाबवरुन आंदोलन सुरुच आहे. येथील पोलिसांनी २२ वर्षीय एक महिला तिचे नाव महसा अमीनी असे होते तिला हिजाब न घातल्याने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव अटक करण्यात आली होती. तिला १६ सप्टेंबरला अटक झाली होती. येथील धर्माचार पोलिसांनी ही कारवाई केली होती. अटकेच्या ३-४ दिवसा महसा हिचा संशयास्पद मृत्यू झाला. नातेवाईकांनी पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. तिच्या मृत्यूनंतर हिजाबचे प्रकरण संपूर्ण ईराणसह काही देशांमध्ये गाजत आहे.

अशी बातमी समोर आली होती की, ज्यामध्ये आरोप लावले होते महसा हिला काठीने मारण्यात आले आणि तिला वाहनातून खेचत ही नेण्यात आले होते. दरम्यान या आरोपांवर पोलिसांनी असे म्हटले की, तिच्यासोबत काहीही चुकीचे झालेले नाही. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.
हे देखील वाचा- ब्राजीलचे राष्ट्रपती झाल्यानंतर लूला डी सिल्वा यांचा का केला जातोय विरोध?
दोन्ही अभिनेत्र्यांना मिळाले आहेत काही अवॉर्ड्स
ईराण मधील प्रसिद्ध अभिनेत्री गजियानी आणि रियाही यांना आपल्या अभिनयाच्या जोरावर काही अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्यांना ईराण मधील अभियोजकांच्या आदेशावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यापूर्वी गाजियानी हिने सोशल मीडियात लिहिले होते की, मी नेहमीच ईराणच्या जनतेसोबत आहे. भले काहीही झाले तरी. तिने आपल्या फॉलोअर्सला असा संकेत दिला होता की, तिच्या सोबत काहीतरी चुकीचे होऊ शकते. तिने पुढील पोस्टमध्ये लिहिले की, हे माझा अखेरचा मेसेज सुद्धा असू शकतो. (Iran anti hijab protest)
दरम्यान, जेव्हा ईराण मध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर महिलांसंदर्भातील नियम अधिक कठोर करण्यात आले. त्यामुळे त्यांना आपले स्वातंत्र्य हिरावल्यासारखे वेळोवेळी वाटत आहे. अशातच महिलांना हिजाब घालणे जेव्हा अनिवार्य केले तेव्हा त्याचा सुरुवातीला विरोध झाला आणि नंतर त्याचे आंदोलनात रुपांतर झाले. याच आंदोलनात काही जणांचा मृत्यू ही झाला आहे. महिलांनी तर आपले हिजाब काढून जाळल्याचे फोटो आणि व्हिडिओ ही सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. मात्र जेव्हा महसा हिच्या मृत्यूनंतर हा हिजाबचा मुद्दा अधिक चिघळला गेला आहे.