इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या सीझनमध्ये मंगळवारी १३ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. या सीझनमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आणि हा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगलोरने पहिला सामना गमावल्यानंतर, दुसरा सामना जिंकला.
दोन्ही संघ शेवटच्या सामन्यात विजयी झाले आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना विजयी प्रवास सुरू ठेवायचा आहे. चला जाणून घेऊया सामन्याच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती…
केव्हा होणार राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना? (RR vs RCB)
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये मंगळवार, ५ एप्रिल, २०२२ रोजी लढत होणार आहे.
कुठे होणार राजस्थान आणि बंगळुरूमध्ये सामना? (RR vs RCB)
राजस्थान आणि बंगलोर यांच्यातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
राजस्थान आणि बंगलोर यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल? (RR vs RCB)
राजस्थान आणि बंगलोर सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता, तर पहिला चेंडू ७.३० वाजता टाकला जाईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जाणार ?
राजस्थान आणि बंगलोर सामन्याचे प्रसारण हक्क ‘स्टार नेटवर्क’कडे आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स चॅनलवरही या सामन्याचे प्रसारण होणार आहे. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये लाईव्ह सामने पाहू शकता.
लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहू शकतो?
भारतातील हॉटस्टार ॲपवर सर्व आयपीएल सामन्यांचं लाइव्ह-स्ट्रीमिंग पाहता येतील.
================================================================
हे ही वाचा: क्रिकेटच्या दुनियेतला अवलिया ‘इंजिनियर’!
=================================================================
या टीममध्ये कोणकोणते क्रिकेटपटू आहेत?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:
फाफ डूप्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स:
जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रणीक कृष्णा.