भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयपीएल (IPL 2022)’ स्पर्धेच्या हंगामाला काही महिन्यात सुरुवात होणार आहे. यासाठी काही दिवसांमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे. यावेळी सर्वच खेळाडूंचा लिलाव होणार असल्याने कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार याकडेही लक्ष लागले आहे.
आयपीलच्या यावेळी लिलावामध्ये ४९ खेळाडूंची ‘बेस्ट प्राईज’ २ कोटी एवढी असणार आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये श्रेयस अय्यर, आर आश्विन, मोहम्मद शमी, सुरेश रैना, ईशान किशन यांचा यामध्ये समावेश आहे, तर विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू डेविड वॉर्नर,कसिगो रबाडा, ट्रेंट बोल्ट, वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्हो, मार्क वुड, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन अशा खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएल (IPL 2022)मध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी सहभागी होणार असल्याने यावेळी लिलावामध्ये आणि खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे, हे नक्की. जसे प्रत्येक
आयपीएलच्या संघाला काही खेळाडू रिटेन म्हणजेच परत ठेवण्याची मुभा दिली होती, तशीच या नवीन दोन्ही आयपीएल संघालाही मुभा देण्यात आली होती. त्यानुसार लखनऊने कर्णधारपदासाठी केएल राहुलला निवडले आहे, तसेच मार्कस स्टॉयनिस आणि रवि बिश्नोई यांनी लखनऊने संघात रिटेन केले आहे. तसेच अहमदाबादने हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुभमन गिल या तिघांना त्यांनी रिटेन केले आहे. हार्दिक पांड्या अहमदाबादचा कर्णधार असणार आहे.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावासाठी १२१४ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली आहे. या सर्व खेळाडूंची यादी १० फ्रँचायझींना पाठवण्यात आली आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगलोर येथे होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझींनी निवडलेली नावे बोलीसाठी मांडली जातील. असे सांगितले जात होते की, १२ आणि १३ फेब्रुवारीला लिलाव बंगळुरूमध्ये होणार आहे, पण बंगळुरूमधील लिलावाच्या आयोजनावर संभ्रम आहे व मेगा लिलाव बंगलोर ऐवजी मुंबईत आयोजित केला जाऊ शकतो आणि याविषयी आगामी बैठकीत सविस्तर चर्चा होईल.
यंदा लिलावामध्ये दिसणार नाही हे स्टार खेळाडू
– वेस्टइंडिज संघाचा बेधडक खेळाडू म्हणून ज्याला ओळखले जाते तो ख्रिस गेलं यावेळी लिलावामध्ये दिसणार नाही याचा अर्थ तो आयपीएलही खेळणार नाही.
– एबी डिव्हिलियर्सने निवृत्ती जाहीर केली असल्याने तोही यंदा आयपीएलमध्ये दिसणार नाही.
– बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जो रूट आणि मिचेल स्टार्क यंदा आयपीएलमध्ये दिसणार नाहीत
यावेळी कोणत्या खेळाडूवर लागेल मोठी बोली
जर आपण प्रत्येक संघाकडे पाहिले तर वेगवान गोलंदाजांची कमी पाहायला मिळतेय. यंदाच्या लिलावामध्ये भारतीय खेळाडूंपासून विदेशी खेळाडूपर्यंत जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजाकडे जास्त लक्ष्य पाहायला मिळेल.
भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, टी नटराजन, खलिद मोहम्मद,प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी,चेतन साखरीया यांकडे प्रत्येक संघाचे लक्ष्य असेल. तर विदेशी गोलंदाजांमध्ये कसिगो रबडा, ट्रेंट बोल्ट, जोश हेजलवूड, मार्क वूड, ख्रिस मॉरिस, डॅनियल सॅम यांकडे लक्ष्य असेल.
फलंदाजीमध्ये कोणाला लागेल जास्त बोली
भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर,ईशान किशन, शिखर धवन,सुरेश रैना, अंबाती रायडू, तर विदेशी फलंदाजीमध्ये डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, मार्टिन गुप्टिल, जेसन रॉय, ब्रावो यांच्यासाठी जास्त बोली लागू शकते.
हे ही वाचा: दी ॲशेस! तब्बल १३९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ॲशेस मालिकेची रंजक कहाणी
अष्टपैलू खेळाडूंमध्ये यांच्यावर लागणार बोली
सर्वात प्रथम भारतीय खेळाडूंची यादी पाहिली, तर आर आश्विन, कृणाल पांड्या, जयंत यादव, हनुमा विहारी, राहुल तेवातिया,अभिषेक शर्मा यांच्यावर आयपीएल संघाचे लक्ष्य असेल, तर विदेशी खेळाडूंमध्ये सर्वात प्रथम वेस्टइंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो, शकीबुल हसन, जेसन होल्डर, दसून शनाका, मोहम्मद नबी, वहींदु हरसंगा यांच्यावर बोली लागू शकते.
– स्वप्नील शहा