अॅप्पल कंपनीचे नवे स्मार्टफोन नुकतेच लॉन्च करण्यात आले आहेत. तर आयफोन१४ सह अन्य काही प्रोडक्ट्स सुद्धा नुकतेच लॉन्च केले आहेत. त्यामध्ये अॅप्पल इअरपॉड्स, वॉचचा सुद्धा समावेश आहे.आयफोन१४ ची सीरिज ही जुन्या स्मार्टफोनपेक्षा अधिक महाग आहे. मुख्य गोष्ट अशी की, आयफोनची (iPhone) सर्वाधिक किंमत तब्बल दीड लाख रुपयांच्यावरच असते. अशातच लोकांना गरजेपेक्षा स्मार्टफोनसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. परंतु अमेरिकेच्या तुलनेत भारतीय मार्केटमध्ये आयफोनच्या किंमती अधिक असतात.
खरंतर अमेरिकेतील बाजारात नव्या आयफोनच्या किंमती तुलनात्मक आहे. परंतु भारतात ही स्थिती काहीशी बदलेली आहे. तर नवे आयफोनच नव्हे तर आयफोन एसई २०२२ जो भारतात आतापर्यंत ४९,९०० रुपयांना विक्री केला जात होता.मात्र अमेरिकेत याच डिवासाइसाठी ३२ हजार रुपये मोजावे लागतात. म्हणजेच भारतीय बाजारात याची किंमत १० हजारांपेक्षा अधिकच आहे असे म्हणावे लागेल.
त्याचसोबत नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन१४ ची अमेरिकेतील बाजारात किंमत ७९९ डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ६३,७०० रुपयांपासून सुरु आहे. भारतात मात्र हा फोन ७९,९०० रुपयांच्या सुरुवाती किंमतीवर लॉन्च झाला आहे. म्हणजेच दोन्ही मार्केट्समध्ये जवळजवळ १६,२०० रुपयांचे अंतर आहे. हे अंतर लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण करतात की, अखेर भारतात आयफोनच्या किंमती अधिक का असतात?
रिपोर्ट्सनुसार, भारतात आयफोनच्या (iPhone) असेंबलीपेक्षा किंमत कमी नसते कारण OEMs च्या कंपोनेंट्सवर आता सुद्धा अधिक इंपोर्ट ड्युटी भरावी लागते आणि कंपनीवर अतिरिक्त बोझा पडतो. आयफोनच्या वापरासाठी PCBA वर जवळजवळ २० टक्के इंम्पोर्ट ड्युटी लागते. अशाप्रकारे आयफोन चार्जरवर सुद्धा २० टक्के इंम्पोर्ट ड्युटी आहे.
प्रोडक्ट्सवर इंम्पोर्ट ड्युटी व्यतिरिक्त स्मार्टफोन्सवर १८ टक्के जीएसटी लावला जातो. सध्या भारतात आयफोन१२ आणि आयफोन१३ असेंबल केले जातात. या व्यतिरिक्त डॉलर आणि रुपयांच्या दरम्यान वाढता गॅप सुद्धा आयफोनच्या किंमतीत वाढ करण्यामागील एक कारण आहे. यामुळेच भारतात अॅप्पल प्रोडक्ट्स जापान आणि दुबईच्या तुलनेत महाग आहेत.
हे देखील वाचा- iPhone14 लॉन्च केल्यानंतर कंपनीने बंद केले ‘हे’ फोन
दरम्यान, भारत अॅप्पलसाठी एक मोठे मार्केट आहे. मात्र आतापर्यंत येथे पीजीबीए आणि दुसऱ्या कंपोनंट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग होत नाही तोपर्यंत आयफोनसाठी आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील. या व्यतिरिक्त भारत सरकारकडून इंम्पोर्ट ड्युटी कमी केल्यास आयफोनच्या किंमतीत वाढ होऊ शकते.