जर तुमच्याकडे आयफोन असेल तर तो हरवणे किंवा चोरी झाल्यास तर काय होईल याची भिती नेहमीच मनात राहते. तर सध्या चोरीच्या घटना दिवसागणिक वाढल्याने रस्त्यावरुन चालताना सुद्धा खिशातून काढलेला मोबाईल खरंच सुरक्षित आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थितीत राहतो. मात्र तुम्ही टेंन्शन घेऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा फोन चोरी झाल्यानंतर ही तो तुम्हाला परत मिळू शकतो. आयफोनमध्ये असे काही फिचर्स असतात जे तुमच्या फोनला अगदी सुरक्षित ठेवतात. (iPhone Settings)
फोन चोरी होईल अथवा हरवेल अशी भिती वाटत असेल तर केवळी तीन सेटिंग्स तुम्हाला कराव्या लागतील. त्यानंतर कोणत्याही टेंन्शन शिवाय तुम्ही तुमचा मोबाईल रस्त्यावरुन चालताना सुद्धा वापरु शकता. पण मोबाईल नक्कीच तुम्हाला परत मिळेल.
सर्वात प्रथम तुमच्या आयफनच्या सेटिंग्स मध्ये जा. येथे आयडी आणि पासकोड मध्ये Allow Access when locked टॅबवर क्लिक करा. त्यानंतर कंट्रोल सेन्टर आणि एसेसरिजवर क्लिक करा.
आयफोनचे लोकेशन शोधण्यासाठी काय कराल?
-सर्वात प्रथम फोनच्या सेटिंग्समध्ये जा आणि तेथे आपल्या नावावर क्लिक करा
-त्यानंतर फाइंड माय फोनच्या ऑप्शनवर क्लिक करा
-फाइंड माय आयफोन ऑप्शन निवडल्यानंतर फाइंड माय नेटवर्कवर सेंड लास्ट लोकेशन करा.
या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन शोधू शकता. तसेच तुमचे डिवाइस स्विच ऑफ केल्यानंतर सुरु केल्यानंतर ही फोनचे लोकेशन ट्रॅक करता येते. याची खास गोष्ट अशी की, युजर्स आपल्या आयफोनसाठी एक ई सिम कार्ड सुद्धा खरेदी करु शकतात. यामुळे एखाद्याला सिम कार्ड काढणे सुद्धा मुश्किल होईल. त्याचसोबत पॉवर ऑफ केल्यानंतर ही आयफोन फाइंडेबल फिचर तुमच्या कामी येईल. त्यासाठी फोनच्या वॉल्यूम आणि साइड बटण एकत्रित दाबून मेन्यूवर जात हे अनेबल करा. अशातच तुमचा फोन स्विच ऑफ झाला तरीही तुम्ही तो ट्रॅक करु शकता. (iPhone Settings)
हेही वाचा- ChatGPT चा वापर करणे खरंच सुरक्षित आहे का?
या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आयफोन मध्ये अॅपसाठी फेस आयडी अथवा टच आयडी अनेबल करु शकता. असे केल्याने काही अॅप सुरु करण्यासाठी तुम्हाला किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा फोनमध्ये तुमचा चेहरा अथवा फिंगरप्रिंट स्कॅन करावा लागेल. अशातच तुमचा आयफोन सुरक्षित राहिल.तसेच लॉक स्क्रिनवर अॅप किंवा अन्य नोटिफिकेशनला हाइड करण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन स्टाइल बदलू शकता. त्यानंतर आयफोन अनलॉक झाल्यानंतर ही नोटिफिकेशन वाचता येणार नाहीत.