Home » Interstellar : आपण ‘ब्लॅक होल’मध्ये जिवंत राहू शकतो का ?

Interstellar : आपण ‘ब्लॅक होल’मध्ये जिवंत राहू शकतो का ?

by Team Gajawaja
0 comment
Share

सध्या भारतभर इंटरस्टेलर या सायन्स फिक्शन चित्रपटाची खूप चर्चा आहे. तसा चित्रपट आला २०१४ साली पण आता भारतात री-रिलीज झाल्यामुळे या चित्रपटाने धुमाकुळच घातला आहे. यामध्ये एक सिन आहे की लीड actor कूपर ब्रँडला यानातच सोडून आपल्या टार्स या रोबोटसह स्वतःला गॅरगँटूआ नावाच्या प्रचंड ब्लॅक होलमध्ये झोकून देतो. पण अनेकांचा या सिनवर आक्षेप होता की, एखादा माणूस ब्लॅक होलमध्ये जिवंत राहणं पॉसिबल तरी आहे का ? कारण ब्लॅक होल अशी गोष्ट आहे, जी प्रकाशालाही जिवंत सोडत नाही. पण याच्या मागेही सायन्स आहे.माणूस ब्लॅक होलमध्ये जिवंत राहू शकतो का, हे सायंटिफिक वे ने जाणून घेऊ.(Interstellar)

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी ‘कॉन्टॅक्ट‘ नावाची एक कादंबरी लिहीली होती. या कादंबरीवर आधारीत १९९७ साली चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या कांदबरीमध्ये मुख्य नायिका एलनॉर ही ब्लॅक होलमध्ये उडी घेते, असा प्रसंग आहे. यानंतर ती त्यात असलेल्या वर्म होल, ज्याला मराठीत कृमीविवर म्हणतात, त्याच्या साहाय्याने २६ लाईट इअर्स दुर असलेल्या अभिजित म्हणजेच विगा या ताऱ्याजवळ जाऊन पोहोचते. अभिजितजवळ असलेल्या ग्रहांपैकी एका ग्रहावर तिला पृथ्वीवर मृत झालेले तिचे पिता भेटतात. याचा अर्थ असा की या साऱ्या प्रवासात ती वर्तमानातुन भुतकाळात प्रवेश करते. या प्रवासाला वैज्ञानिक भाषेत टाइम ट्रॅव्हल म्हणजेच कालप्रवास म्हणतात. आता ब्लॅक होल किंवा वर्म होलमध्ये जाता येतं का? हा प्रश्न उद्भवतो. वर्म होल ही मुळात एक थियरीच आहे. याला मराठीत कृमी विवर म्हणतात. असे होल ब्रह्मांडात कुठेही असू शकतात, ज्यांच्या माध्यमातून आपण कमी वेळात एका आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत पोहोचू शकतो.(Interstellar)

फेमस सायंटिस्ट अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या थियरी ऑफ रिलेटिव्हीटीमध्ये ‘आईनस्टाईन-रोझेन ब्रिज’ नावाची एक संकल्पना मांडण्यात आली आहे. वर्म होल तयार झाल्यानंतर लवकरच कोलमडुन पडतात अशी ही संकल्पना सांगते. थियरी ऑफ रिलेटिव्हीटीमध्येच या संकल्पनेद्वारे प्रत्यक्ष सिद्ध करण्यात आलं आहे की, आपण ब्लॅक होल किंवा वर्म होलमध्ये जाऊ शकतो. कारण कोणतीही वस्तु ब्लॅक होलच्या मर्यादित अंतरावर आल्यानंतर तो स्वतः सारं आपल्या आत सामावुन घेतो. रिलेटिव्हीटीमधील ब्लॅक होल ही थियरी खरी ठरली. तुम्ही याला पहिला फोटोदेखील पाहू शकता. मात्र व्हाईट होल आणि वर्म होल अजुनही सैद्धांतिक कल्पनाच आहेत.(Marathi News)

आता हाच प्रसंग इंटरस्टेलार फीक्शन चित्रपटात दाखवण्यात आला आहे. एका मर्यादित अंतरावर आल्यानंतर कुपर स्व:तला टार्ससह ब्लॅक होलमध्ये झोकुन देतो. आता प्रश्न येतो की तो जिवंत कसा ? किंवा इतक्या अफाट गुरूत्वाकर्षणामुळे त्याचे तुकडे का झाले नाहीत? कारण ब्लॅक होल एक अशी गोष्ट आहे जिथे भौतिकशास्त्राचा एकही नियम काम करु शकत नाही. याची ग्राव्हिटॅशनल फोर्स भयंकर शक्तिशाली असते. जर आपण लाईटच्या स्पीडने म्हणजेच ३ लाख किलोमीटर / पर सेकंद असा प्रवास केला तरच त्या भयाण काळोखात तग धरु शकतो, मात्र प्रत्येक वेळेला हे शक्य होणार नाही. कारण आईनस्टाईन यांच्या मते विश्वात लाईटपेक्षा जास्त वेगाने कोणतीही वस्तु प्रवास करु शकत नाही. मात्र हा नियम ब्लॅक होलच्या आत लागु होत नाही, कारण तो प्रकाशालाही गिळून टाकतो. (Interstellar)

सर्वप्रथम हे जाणुन घ्यायला हवं की Gravity ही अंतराळ आणि काळ म्हणजेच Space & Time ला बेंड करु शकते. सायंटिस्ट स्टीफन हॉकींग यांच्या ‘हॉकींग रेडीएशन’नुसार ब्लॅक होलमध्ये गेल्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे तुम्ही काही क्षणांमध्येच जळुन खाक व्हाल किंवा तुम्हाला कोणतही नुकसान होणार नाही, मात्र तुम्ही कृष्ण विवरात कायमचे अडकुन पडाल आणि यावेळी तुमचं संपूर्ण शरीर सुन्न पडू शकतं. आजपर्यंत कोणी हे सिद्ध करु शकलं नाही की ब्लॅक होलच्या साहाय्याने आपण थेट दुसऱ्या ब्रम्हांडात किंवा दुसऱ्या रहस्यमयी जगात पोहोचु शकतो, मात्र वैज्ञानिकांनी मांडलेले अनेक सिद्धांत याच प्रतिक्षेत आहेत.(Interstellar)

ब्लॅक होलच्या बाहेरच्या कडीला इव्हेंट होरायझन म्हणजेच घटना क्षितीज म्हणतात. एखादा महाकाय तारा सुपरनोव्हाद्वारे मरण पावल्यानंतर त्याचं ब्लॅक होलमध्ये रुपांतर होतं. यानंतर तो स्वत:च्या गुरूत्वाकर्षणामुळेच लहान होऊन पुर्णपणे अदृष्य होऊन जातो. यावेळी त्याच्या सेंटरमध्ये एक अदृष्यरुपी बिंदु तयार होतो ज्याला ‘सिंग्युलॅरीटी’ म्हणतात. ही एक अशी गोष्ट आहे जिथे फिजिक्सचे सर्वच नियम फोल ठरतात. याच सिंग्युलॅरीटीच्या चारही बाजुंनी एक कुंपण तयार होतं ज्याला इव्हेंट होरायझन म्हटलं जातं.(Marathi News)

आता एक उदाहरण घ्या, तुम्ही ब्लॅकहोलच्या जवळ तुमच्या साथीदारासह प्रवास करत आहात. तुम्ही त्याची साथ सोडुन ब्लॅक होलमध्ये झेपावता. तुम्ही जेव्हा इव्हेंट होरायझनजवळ पोहोचता तेव्हा तुमच्या साथिदाराला तुम्ही एका भिंगातुन एखादी वस्तु पाहिल्यावर जशी दिसते तसेच भासता. यासोबतच त्याला तुम्ही स्लो मोशनमध्ये ब्लॅक होलमध्ये पडताना दिसता आणि पुर्णपणे लाल होऊन नंतर अदृश्य होऊन जाता. या सर्व गोष्टी थिरोटीकल असल्या तरी त्या खोट्या आहेत असे आपण ठरवु शकत नाही. दुसरं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण ब्लॅक होलमध्ये पडतो तेव्हा इव्हेंट होरायझनजवळचा प्रकाश आपल्याला वळलेल्या आकृतीसारखा म्हणजेच Distorted भासतो ज्याला ‘The Photon Sphere’ म्हणतात.(Marathi News)

यामध्ये प्रवेश केल्यानंतर बाहेरुन येणारा प्रकाश आपल्याला गोल स्वरुपात हळुहळु दुर जाताना भासेल आणि अदृष्य होईल. काही वेळानंतर गुरूत्वाकर्षण इतकं भयंकर शक्तिशाली होईल की आपल्या शरीराच्या खालच्या भागातील गुरूत्वाकर्षण हे डोक्यावरील गुरूत्वाकर्षणापेक्षा कोटीच्या कोटी पटीने जास्त असेल. यामुळे आपल्या शरीरातील सारे अणु अतिशय वेगाने खेचले जातील आणि सर्व कणांचं म्हणजेच पार्टीकल्सचं एका सरळ लांब रेषेत रुपांतर होईल. यावेळी आपलं शरीर एका स्फागेटीप्रमाणे होईल. याला वैज्ञानिक भाषेत ‘स्फागेटीफीकेशन’ असं म्हणतात. सिंग्युलॅरीटीकडे पोहोचेपर्यंत आपण अशाच स्वरुपात आणि लांबलचक असु, अशी थियरी काही वैज्ञानिकांनी मांडली आहे. (Interstellar)

=============

हे देखील वाचा : वयाच्या चाळीशीत आरोग्याची अशी घ्या काळजी, हृदयासह संपूर्ण हेल्थ राहिल फिट

=============

माणुस ब्लॅक होलमध्ये जिवंत राहु शकत नाही, हे कोणीही स्पष्ट करु शकलं नाही. मात्र तरीही वैज्ञानिकांनी मांडलेल्या सिद्घांताच्या आधारे याचा छडा भविष्यातली पिढी नक्कीच लावेल असं अनेकांना वाटतं. कादंबरी ही काल्पनिक असते त्यामुळे आपण कल्पनेच्या साहाय्याने ब्रम्हांडात काहीही करु शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट मर्यादित असते. या मर्यादेचं पालन करुनच लेखक किंवा वैज्ञानिक तसे प्रसंग मांडतो. इंटरस्टेलारमध्ये असे दाखवण्यात आलं आहे की एक रहस्यमयी सभ्यतेने म्हणजे परग्रही किंवा मानवी प्रगत सभ्यतेने शनि ग्रहाच्या जवळ एक वर्म होल तयार केला किंवा पोहोचवला आहे. याच वर्म होलच्या साहाय्याने ते गॅरगँटुआ नावाच्या ब्लॅक होलपर्यंत पोहोचतात. आता जर ती सभ्यता मानवाला मदत करु इच्छित होती तर कुपरच्या अनेक साथिदारांचा मृत्यु का झाला? तर याच उत्तर एकच! सर्वशक्तिमान ईश्वर आपल्याला केवळ मार्ग दाखवतो मात्र त्या मार्गावर आपल्यालाच चालायचंय. अशा प्रमाणे तो वर्म होल आणि ब्लॅक होलसुद्धा तिथपर्यंत या प्रगत सभ्यतेनेच आणून ठेवलेला असतो, मात्र त्याच्या 5th Dimension मध्ये पोहोचण्याची जबाबदारी माणसाचीच होती. म्हणुनच कुपरचा त्या कृष्णविवरात मृत्यु होत नाही आणि तो पाचव्या परिमाणात पोहोचतो.(Interstellar)

सांगण्याचं तात्पर्य एकच की, कार्ल सेगन यांच्यासारखा महान वैज्ञानिक मनुष्याला कृष्णविवरात झोकुन देण्याचा प्रसंग लिहु शकतो तर एखादा चित्रपट दिग्दर्शक का नाही? कारण कीप थॉर्न या नोबेल अवॉर्ड जिंकलेल्या शास्त्रज्ञाच्या मदतीच्या आधारे हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपट असल्यामुळे थोडीफार सिनेमॅटीक लिबर्टी घेणं साहजिक आहे. मात्र वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले चित्रपटांची जगाला फारच गरज आहे. ब्लॅक होल ही ब्रम्हांडातील सर्वात सुंदर आणि तितकीच भयाण खगोलीय गोष्ट आहे. आजवर मानवाने केवळ त्याच्याबद्दल सिद्धांतांद्वारे आपापली मते मांडली. गेल्या वर्षी एम-८७ या दिर्घिकेतील खऱ्याखुऱ्या ब्लॅक होलचा फोटो जगासमोर आला. या ब्लॅक होलचं रहस्य कधी उलगडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागुन आहे. माणुस म्हणुन जन्माला आल्यानंतर खुप प्रश्न पडतात. हे प्रश्न पडणं महत्त्वाचं आहे. कारण उत्तरं शोधण्याच्या तयारीला माणुस आपोआपच लागतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.