परदेशात इंटर्नशिप केल्याचा फायदा असा होतो की, तुम्हाला उत्तम पगाराची नोकरी मिळते. तसेच इंटर्नशिपच्या काळात तुम्हाला आणखी काही नव्या गोष्टी शिकण्यासाठी मिळतात. जेणेकरुन तुम्ही इंटर्नशिप संपल्यानंतर अनुभवी व्यक्तींसोबत अगदी सहज काम करु शकता. इंटरनॅशन इंटर्नशिप ही विविध संस्थांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला एक प्रोग्राम आहे, ज्यांना आयुष्यात पुढे जायचे आहे त्यांना यामध्ये संधी दिली जाते. तर परदेशात आजही इंटर्नशिप ही मोफत आहे. पण तुम्ही परदेशात राहून शिकलात तर तुम्हाला इंटर्नशिप ही अगदी सहज मिळू शकते.(Internship in abroad)
परदेशात इंटर्नशिप करण्याचे फायदे
परदेशात इंटर्नशिप केल्याने तुम्हाला तुम्ही जे शिकलात त्यात आणखी काही नव्या गोष्टी समजतातच, पण नवे अनुभव ही तुम्हाला येतात जेणेकरुन तुम्ही एखाद्या नोकरीच्या ठिकाणी अगदी न घाबरता काही कामं करु सकता. या व्यतिरिक्त परदेशात मोफत इंटर्नशिप तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट देते जे तुमच्यासाठी जागतिक स्तरावर ट्युटर्स शिकण्याचा अनुभव आणि सिल्स्साठी फार महत्वाचे ठरतात. या व्यतिरिक्त जे अनुभवी आहेत त्या लोकांसाठी सुद्धा फार फायदेशीर आहे. असे केल्याने तुमचे नेटवर्क तयार होतेच पण तुम्हला नोकरी करताना सुद्धा काही अडथळा येणार नाही. तसेच आत्मविश्वास वाढतो आणि आपल्यातील सिल्स ही डेवलप होतात.
आपले क्षेत्र योग्य पद्धतीने निवडा
तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्यामध्येच खासकरुन इंटर्नशिपची संधी मिळतेय का ते पहा. परदेशात तुम्हाला इंटर्नशिपच्या खुप संधी मिळता पण आपल्या क्षेत्राशी ती मिळतीजुळती आहे का याची सुद्धा माहिती मिळवा. सध्याच्या काळात बहुतांश इंटर्नशिप या प्लेसमेंट देतात.
हे देखील वाचा- तुमच्या ‘या’ चुकांचा करियवर होईल परिणाम, दुर्लक्ष करण्याऐवजी वेळीच सुधरा

तुमचे नेटवर्क वाढते
कोणतीही इंटरनॅशल इंटर्नशिप केल्यानंतर त्याचा प्रभाव नक्कीच तुमच्या करिवर ही पडतो. कारण तुमच्याकडे त्या संदर्भातील लोकांचे एक नेटवर्क तयार झालेले असते. त्यामुळे नोकरीच्या वेळी तुम्ही तुमच्या नेटवर्क मधील लोकांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ शकता. तसेच नोकरीच्या आणखी कोणत्या संधी आहेत याची सुद्धा तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते.(Internship in abroad)
उत्तम नोकरी आणि प्लेसमेंटच्या शक्यता
सध्याच्या काळात युएस, युके, कॅनडा आणि सिंगापूर, फ्रान्स, संयुक्त अरब अमीरात सारख्या काही देशांमध्ये दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते. हे देश प्रत्येक वर्षाला इंटर्नशिपच्या संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या करतात. इंटर्नशिप केल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळणे ही सोप्पे होते. दरम्यान, विद्यार्थ्याचा इंटर्नशिपमधील एकूण परफॉर्मन्स पाहून त्याचा नोकरी दिली जाते.
इंटर्नशिपसाठी कसा कराल अर्ज
तुम्हाला जर इंटर्नशिप शोधायची असेल तर तुम्ही विविध मार्गांचा वापर करु शकता. त्यापैकी योग्य त्या मार्गाची निवड करा. आता आपल्या युनिव्हर्सिटीतील किंवा एखाद्या मित्राच्या मदतीने सल्ला घेऊन इंटर्नशिपच्या संधी जेथे उपलब्ध आहेत त्या शोधा. तसेच काही बिझनेस स्कूल इंटर्नशिपसाठी कंपन्यांसोबत हातमिळवणी करतात. त्यापैकी काही परदेशात असू शकतात. परंतु जर तुम्ही परदेशात राहूनच शिक्षण घेत असाल आणि आता इंटर्नशिप शोधत असाल तर तुमच्याकडे फार संधी असतील. त्याचसोबत तुम्हाला इंटर्नशिपसाठी विविध ऑप्शन ही परदेशात उपलब्ध होतील.