मोबाईल इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे कोणाचा ही मूड खराब होऊ शकतो. इंटरनेटच्या धीम्या स्पीडमुळे काही वेळेस महत्वाचे मेसेज सुद्धा तुमच्या पर्यंत पोहचू शकत नाही. युट्युबवरील व्हिडिओ ही पाहण्यास समस्या येते. या समस्येचा दररोज कोणी ना कोणी तरी सामना करत असतो. अशातच तुम्ही फोनच्या काही सेटिंग्समध्ये बदल करुन स्लो इंटरनेटच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. अशातच त्याच बद्दलच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Internet Speed Boost)
भारतात सध्या मोबाईल इंटरनेटसाठी ५जी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सला हायस्पी़ इंटरनेटचा फायदा घेत येत आहे. परंतु डेटासाठी टेलिकॉम कंपन्या काही वेळेस शुल्क घेतात. परंतु धीम्या इंटरनेटसाठी कंपन्यांवर आपण शुल्क लावू शकत नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या इंटरनेटचा स्पीड हा वाढला जाईल.
-क्लियर कॅशे
कॅशे केवळ तुमच्या फोनचे स्टोरेज भरते तर इंटरनेटच्या स्पीडवर ही परिणाम होतो. अधिक कॅशे असल्यास फोनच्या प्रोसेसिंगवर ही दबाव वाढतो. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी कॅशे क्लियर न केल्यास तर ते आधी करा.
-अॅप्स बंद करा
आजकाल फोनमध्ये काही अॅप्स आपोआप इंस्टॉल झाल्यानंतर उत्तम काम करतात. दरम्यान, याचा मोबाईल इंटरनेटच्या स्पीडवर ही प्रभाव पडतो. जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये स्लो इंटरनेट स्पीडची समस्या येत असेल तर अधिक वापर न करणारे अॅप्स बंद करा.
-अॅप्सचे ऑटो अपडेट बंद करा
स्मार्टफोनमध्ये अॅप अपडेट करण्यासाठी ऑटो अपडेटची सुविधा दिली जाते. फोनचे अॅप्स बॅकग्राउंडला आपोआप अपडेट होतात. जर तुम्हाला वाटत असेल फोनचा स्पीड उत्तम असावा तर तुम्ही अॅपचे ऑटो अपडेट बंद करा. (Internet Speed Boost)
-दुसरा ब्राउजर आणि हलके अॅप्स वापरा
यामुळे थेट रुपात फोन मधील इंटरनेटचा स्पीड वाढत नाही तर बँन्डविड्थ सुद्धा उत्तम होईल. बहुतांश अॅप हे लाइट वर्जनचे येतात. जे कमी डेटाचा वापर करतात. या व्यतिरिक्त काही ब्राउजर असे ही असतात की, मिनी वर्जनमध्ये येतात. यामुळे सुद्धा इंटरनेटचा वापर कमी होते.
हे देखील वाचा- इंस्टाग्राम पोस्ट करताना लिहिलेल्या माहितीचा फॉर्मेट ‘या’ सोप्प्या पद्धतीने बदला
-नेटवर्किंगची सेटिंग रिसेट करा
स्लो इंटरनेटची समस्या तुमच्या फोनमध्येच असते. फोनच्या नेटवर्क सेटिंग डिफॉल्ट रुपात ऑटोमॅटिक होते. यामुळे काही वेळेस समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इंटरनेटचा स्पीड उत्तम करण्यासाठी तुम्ही नेटवर्क सेटिंग्स रीसेट करा. नेटवर्क सेटिंग रिसेट केल्यानंतर फोन रिस्टार्ट करा.